क्षणभर सुख
असच क्षणभर सुख, क्षणभर सुखच मला मिळाव,
अन, ते का मिळाल ह्याच कारण शोधताना,
माझ्या सुखाच् कारण त्यानंतरच्या क्षणातच बदलून जाव,
क्षणा क्षणाला एका वेगळ्याच कारणाने सुखाने माझ्याकडे पाहून खुदकन हसाव,
असच क्षणभर सुख, क्षणभर सुखच मला मिळाव,
मनभर दुःखाचा डोंगर अचानक अंगावर पडावा ,
दुःखात माझ्या त्या अख्खा संसारच बहावा,
पन त्याच डोंगराच्या कुश्याशी गोड सुखाचा इवलासा झरा खळखळून वहावा,
अन झर्यातून त्या मला पुन्हा क्षणभर सुखाचा श्वास मिळावा,
माझ्या क्षणभर सुखाच देवालाही नवल वाटावं,
अनुभवन्यासाठी माझ्या क्षणभर सुखाला त्याने मला त्याच्याकडे बोलवाव,
अन, मीही त्याच्याकडे हसत हसत जावं,त्यालाही जे मिळवायला जमलं नाही,
ते क्षणभर सुख मी त्याला मिळवून द्याव,
असच क्षणभर सुख, क्षणभर सुखच मला मिळाव,
असच क्षणभर सुख, क्षणभर सुखच मला मिळाव.
शैलेश आवारी
22/10/2013