Get it on Google Play
Download on the App Store

भावनामयी सरिता

ती एक नजर, तीरा सारखी सरली,

ह्रदयात भरली,तिच्यात मला स्वप्नं चाहूल दीसली,

 

ह्रदयातील भावनांची तिने सरिता केली,

भावनांची सरिता ती वाहत गेली ओघाने,

वायूच्या वेगाने,

मिळाली ती कल्पनेच्या सागरास,

 

तो वेग आता वाढला होता,

भावनांचा पूर तिला आला होता,

मात्र कल्पनेच्या सागराने आधार तिला दिला होता,

 

तेवढ्यात विचार आला डोक्यात,

आवरायचा.........................,

भावनामयी सरितेला,

जर पातळी तिची वाढत राहिली,

अन, वेगाने ती धावत राहिली,

 

बुडवीन ती कल्पनाधारी सागराला,

अन जन्म देइल महासागराला,

 

ओघाला तिच्या  आवरायला,

स्वप्नांना मी हात दिला,

करून निच्छय घेउन यायचा त्यांना जीवनात,

हात देता स्वप्नांना आवरल मी त्या  सरितेला,

कल्पनेचा सागर भावनाधारी सरितेने आता गमावला होता,

परंतु, जगन्यातील खरा अर्थ मी त्या नजरेतील स्वप्न प्राप्ती करता कमावला हेता.

 

शैलेश आवारी

2007