मर्मबंधातली आठवन
मर्मबंधातली आठवन साचलेली,
मन-मस्तिष्कामधे धुंद ही दाटलेली,
जनू दाट धुक्यामधे आहे गोठलेली,
मर्मबंधातली आठवन साचलेली
जगलो जेव्हा तिला मी अर्थाविना,
कळलाच नाही तिचा भाव माझ्या मना,
भूतकाळामधे जनू ती हरवलेली,
मर्मबंधातली आठवन साचलेली
जशी नाजुक कळी, खुले परी सुमना,
दरवळे गंध हा गुंग करतो मना,
रोज तुटते मनी पाकळी ही कोमेजलेली,
मर्मबंधातली आठवन साचलेली
आज दीसली मला पाकळी ती पुन्हा उमलताना,
अर्थ समजला मला तिचा आज जगताना,
मनामधे ती पुन्हा जागलेली,
मर्मबंधातली आठवन साचलेली
शैलेश आवारी
07/09/2020