मी एकटा होतो
मी एकटा होतो, सुख शोधत होतो,
शोधात सुखाच्या, अनन्त दुखान्च घर बांधताना, उज्वल भविष्याचा पाया रोवत होतो,
मी एकटा होतो, सुख शोधत होतो
दीन गेले, वर्ष सरले, तारूण्यातले सर्व क्षण हरवले,
रण-रणत्या उन्हात अन वाळूच्या रानात शेती करत होतो,
मी एकटा होतो, सुख शोधत होतो
दिवसा दमलो, रात्री जागलो,
सूर्याशी भीडलो, चन्द्रा संग गुजलो,
तार्यानच्या संगतीत नन्तर अडखळलो,
टीम-टीमनार्या तार्यानचा प्रकाश सूर्याच्या उजेडात शोधत होतो,
मी एकटा होतो, सुख शोधत होतो
मीच लेखक, मीच दिग्दर्शक होतो,
माझ्या जीवनपटाचा मीच नट अन मीच प्रेक्षक होतो,
माझा अभिनय मी डोळ्यात भरत होतो अन मनात उतरवत होतो,
मी एकटा होतो, सुख शोधत होतो
शैलेश आवारी
17/10/2020