प्रसंग-८
( अंजलीवर कडक पहारा असूनही ती एके दिवशी गुपचूप वाघ्याची भेट घेते.)
अंजली:- मला नाही सहन होत रे घरच्यांचा वागणं.
वाघ्या:- म्हणजे ?
अंजली:- फार घालून-पाडून बोलतात मला आजकाल.
वाघ्या:- अगं तू दुर्लक्ष करत जा.
अंजली:- किती वेळा करायचं दुर्लक्ष. मला पण याच घरात जन्माला यायचं होतं कुणास ठाऊक....?
वाघ्या:- आपण घर सोडून निघून गेलो तर.
अंजली:- मग मनमोकळं जगता येईल ना.... सर्व स्वप्न करता येतील.
वाघ्या:- आणि तुझ्यावर कोणी अधिकारही गाजवणार नाही.
अंजली:- चल मग पुढच्याच रविवारी निघूया.
वाघ्या:- हो निघूया.... चल येतो मी.
( अंजली व वाघ्या पळून जातात. वाघाच्या मनातल्या पापी विचारांची अंजलीला किंचितही कल्पना नसते त्यामुळे परिणाम असा होतो की, अंजली सोबत गैरव्यवहार करून वाघ्या तिला सोडून निघून जातो. अंजलीला नव्या ठिकाणी जिणं अगदीच अस्वस्थ होतं. आणि ती आत्महत्या करून घेते.)