Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग-५

(नवरात्रीचे दिवस सुरू होतात. परंपरेनुसार त्या तिघींना उपवास धरणे, चप्पल पाळणे यांसारख्या इतर गोष्टी कराव्या लागतात. शीतलला अनवाणी पायाने चालण्याने भरपूर त्रास व्हायला लागलेला असतो; तेव्हा तिच्या आईसोबत तिचा हा संवाद घडतो.)

शीतल:- आई मला उपवास मोडू दे ना... खूप भूक लागलीये. 

शीतलची आई:- येडी झाली का कायं तू ?? असं अचानक मध्येच काय झालं तुला?

शीतल:-( कळकळीने ) आई दिवसभर अनवाणी पायाने चालण्याने त्रास होतोयं गं.... 

शीतलची आई:-  मग खिचडी खा फराळ करून घेत होता शितल आई जेवल्याशिवाय चेन्नई पडणार मला भाकरी खाऊ देणार 

शीतलची आई:- फराळ कर. नाहीतर जाऊन झोप. मला त्रास नको देऊ.....

शीतल:- मी चालले झोपायला. ( रागात खोलीत निघून जाते ) (शीतल घरात जाऊन न जेवता झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात येतं की, तिला ताप आला आहे; ती आईला तस सांगते.)

शीतल:- आई मला ताप आलायं बरं वाटत नाहीये.

शीतलची आई:-  थांब मी सरकारी दवाखान्यातून गोळ्या घेऊन येते.

(शीतल त्यादिवशी शाळेत न जाता घरीच आराम करते. दोन दिवस तिचं शाळेत जाणं काही होत नाही. मग प्रगती तिला भेटायला तिच्या घरी येते.)

प्रगती:- (दारातून आवाज देते) काकू शीतल आहे का घरात? 

शीतलची आई:-हो हायं पोर घरीच. ये आत. (प्रगती आत जाऊन शितल जवळ बसते.)

प्रगती:- शितल काय झालं? खूपच आजारी पडलीस बघू.... 

शीतल:- हो ना. तापाने काहीच कळना झालयं बघं.
(प्रगती शीतलला हात लावून बघते. तीला बबऱ्यापैकी ताप असतो.)

प्रगती:- काकू शीतलला दवाखान्यात घेऊन गेला होतात का?? 

शीतलची आई:- अगं नाही त्याची काही गरज नाही दोन-तीन दिवसात होऊन जाईल कमी. गोळ्या चालू हायत.

प्रगती:- बरं काकू मी निघते शाळेला जायला. पण तुम्ही एकदा दवाखान्यात तिला घेऊन जायला हवं.

शीतलची आई:- बरं मी सांगते तिच्या बाबांना तिला दवाखाण्यात घेऊन जायला.

(प्रगती निघूण जाते. तीन दिवस निघून जातात. शीतलच्या दुखण्याकडे कोणी खास लक्ष न दिल्याने तिचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर समजतं की, तिला "निमोनिया" हा आजार झाला होता; परंतु वेळीच उपचार न झाल्याने तिचा नाहक बळी जातो.)