प्रसंग- ७
(अंजली व वाघ्या यांच प्रेम प्रकरण अंजलीच्या घरी समजतं. त्यानंतर अंजलीवर फार बारीक नजर ठेवल्या जाऊ लागते. तिच्यावर घरच्यांचा दबाव प्रचंड वाढत चाललेला असतो.)
अंजलीचे बाबा:- हे बघं चुकून जरी त्या वाघ्याची सावली तुझ्यावर पडली तरी त्याचे हातपाय तोडून ठेवेन....
अंजली:- नाही बाबा. सॉरी....! चुकले मी.
अंजलीचे बाबा:- ते सॉरी बिरी आम्हाला कायं समजत नायं. (रागात)
अंजलीची आई:- पोरीला जास्तच लाडावली तुम्ही जरा. आधीच धाकात ठेवली असती तर आज हा दिस नसता आला.
अंजली:- अगं आई....
अंजलीची आई:- एक शब्द बोलू नकोस...