प्रसंग:-१
(अनिकेत व प्रगती जे अत्यंत चांगले मित्र असतात, त्यांच्यात हा संवाद सुरू असतो. शाळा भरण्याआधीच हे दोघे लवकर येऊन वर्गात बसलेले असतात.)
अनिकेत:- तुला वाटतं आपलं गाव बदलेल?
प्रगती:- माहित नाही. खूप अवघड आहे. आपल्या लोकांची वैचारिक क्षमता फार फार तर वाद घडवून आणण्यापर्यंतच.
अनिकेत:- हो आपल्या लोकांना कधी समजणार की, मुलांना थोडं मनमोकळं जगू द्यायला हवं. मी घरी क्रिकेटच नाव जरी काढायचं म्हटलं ना तरी कल्याण....
प्रगती:- मी ठरवलयं या गावातून आणि भुरसटलेल्या विचारसरणी असलेल्या दुनियेतून बाहेर पडायचयं.
अनिकेत:- हो. किमान आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत; असं वाटणाऱ्या जगात प्रवेश करायचायं मला.
प्रगती:- तुला सांगू कधीकधी घरातले वाद इतके असह्य होतात की, जीव द्यावासा वाटतो. पण नंतर प्रश्न पडतो जीव कोणत्या लोकांसाठी द्यायचा; ज्यांच्यावर फार फार तर चार दिवस फरक पडेल.
अनिकेत:- हे बघं, एकदा आपली दहावी होऊन जाऊ दे. मग आपण नक्कीच येथून बाहेर पडू. आणि मला खात्री आहे तू पुढील भविष्यात नक्कीच उत्तम गोष्टी करशील.
प्रगती:- तुझा विश्वास असाच ठेव.
अनिकेत:- हो.