A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionmu97vbiu9lqa149fou6a7squ5renomds): failed to open stream: No such file or directory

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /tmp)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

आरंभ : मार्च २०२० | एक स्त्री – प्रिया भांबुरे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play

 

एक स्त्री – प्रिया भांबुरे

"आई,आज खूप कंटाळा येतोय ग काहीही करण्याचा" असं लग्नाआधी म्हणणारी मुलगी लग्नानंतर कितीही कंटाळा आला, थकवा आला तरीही मन लावून ते काम पूर्ण करत असते.सोपा नसतो तिचा हा प्रवास.... लहानपणीची आई-बाबाची लाडकी परी राणी, राजकन्या मोठी झाल्यावर कुण्या अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देते, जन्मोजन्मीची गाठ बांधते, त्याच्या मनाची राणी होते आणि बदलत जाते एका परिपुर्ण स्त्री मध्ये!! जोपर्यंत ती लहान असते तोपर्यंत तिचे आयुष्य एका फुलाच्या कळीप्रमाणे असते. लग्न झाल्यानंतर फुलाच्या पाकळ्या प्रमाणे तिचे वेगवेगळे नाते  फुलू लागतात. पत्नी, सून, आई, वहिनी, काकू आणि कितीतरी! प्रसंगी काही झालं तर केविलपणे रडणारी ती खंबीर व्हायला शिकते, कठीण वेळी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. लग्नानंतर स्वतःचे घर,नाते मागे ठेवून ती नवीन घरात प्रवेश करते त्यामुळे तडजोड हा नैसर्गिक गुण तिच्यामध्ये असतोच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नवीन नात्यामध्ये सगळ्यांची मन जिंकून घेण्याची जबाबदारी ही तिची असते. जमेल का मला सगळं अशी धाकधूक तिच्या मनात असते. मग हळूहळू नवीन लावलेल्या रोपट्याप्रमाणे तिच्या आपुलकीची मुळे सासरच्या घरामध्ये खोलवर रुजू लागतात अन् तिचे स्वतंत्र असे अस्तित्व तयार होऊ लागते. मग तीसुद्धा आपली मतं मांडायला शिकते,चूक-बरोबर गोष्टींची पारख करून व्यक्त करायला शिकते. बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की तिला राग येतो ,स्वाभाविक आहे ते मात्र तेंव्हाही ती राग नियंत्रित करून शांत राहते. नवीन घरचे रीति-रिवाज, संस्कृती, व्रतवैकल्ये सगळं कसं समरसून करते. कलह, मतभेद हे घरामध्ये होतातच मात्र त्यातूनही जी ते कुशलतेने हाताळते ती निश्चितच लाडकी होऊन राहते. घर एकसंध ठेवण्यात यश आले की मिळणारे समाधान निराळेच!  निसर्गाने मातृत्व बहाल केल्यावर तर ती अजून उजळते, तिच्यातील सुप्त गुण, स्वभावाचा निराळा पैलू बाहेर येतो. तोपर्यंत असणारी राणी आता समजदार झाली असते किंबहुना राणीपेक्षा पूर्णवेळेची माता झालेली असते. वयानुसार अनुभवाची शिदोरी वाढत जाते, स्थैर्यता येत जाते .घरातील सगळे नकळत तिच्यावर विसंबून राहू लागतात. छोटी छोटी कामही मग तिच्यावाचून अडायला लागतात. घरात जणू काही जादूची कांडी फिरवल्यागत तिचे कार्य सुरू असते. कधी नवीन खाण्याचा पदार्थ करायचा असो वा कधी घरात नवीन प्रकारची सजावट करायची असो ती ते करण्यास उत्सुक असते ,तत्पर असते. वर्षे सरत गेली की घरच्यांशी ती खूप एकरुप झालेली असते. संसाररूपी मुकुटावर समाधानाचा, सुखाचा हिरा विराजमान झालेला असतो.अन् एके  दिवशी तो सहज म्हणतो, काय आजीबाईसारखी वागतेस ग!!! मग ती खुदकन गालातल्या गालात हसते कारण ती आता परिपुर्ण स्त्री झालेली असते.️

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक
संपादकीय (निमिष सोनार)
संपादकीय (मैत्रेयी पंडित)
बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर
अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले
शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर
रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा
अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा
२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार
नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार
द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई
टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई
|| प्रवासवर्णन ||
हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे
गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित
मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर
|| लेख विभाग ||
माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर
स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे
सकारात्मक विचार - सविता कारंजकर
मायमाखली नजर – प्रसाद वाखारे
आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार
आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर
एक स्त्री – प्रिया भांबुरे
वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर
|| कथा ||
आगंतुक – सविता कारंजकर
|| कविता विभाग ||
तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे
भाव अंतरीचा – छाया पवार
स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर
आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड
सून माझी लाडाची – नीला पाटणकर
शोध – मंगल बिरारी
लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर
सुख – भरत उपासनी
चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे
|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||