Get it on Google Play
Download on the App Store

स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे

सावरकरांचा जन्म 28 मे 1883 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. रँडच्या जुलुम जबरदस्तीमुळे चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. अन त्यांना फाशी झाली. तेव्हाच देशभक्तीची पहिली ठिणगी विद्यार्थी वयात असलेल्या सावरकरांच्या मनात प्रफुल्लित झाली. ह्याला प्रेरित होऊन सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारण्याची प्रतिज्ञा कुलदेवतेपुढे त्यांनी विद्यार्थी अवस्थेत असताना घेतली . तरूणपणी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते.

" माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी ह्या सशस्त्र युद्धात शत्रुस मारुन चाफेकरांप्रमाणे मरेन किंवा शिवरायांप्रमाणे विजयी होऊन माझ्या मरेन किंवा शिवरायांप्रमाणे विजयी होऊन माझ्या  मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याच्या राज्यभिषेक करेन " अशी प्रतिज्ञा केली.

सावरकरांचे स्फुर्तिस्थान होते इटालियन जोसेफ मेझिनी . त्यांचा उद्देशच होता " सशस्त्र क्रांती " हा अग्नी सावरकरांनी कधीही विझू दिला नाही. तर ह्या क्रांतीमुळे क्रांतीकारकांची मने त्यांनी पेटुन उठवली. व ते सशस्त्र क्रांतीचे अग्निहोत्री ठरले.

१९०२ साली त्यांनी " अभिनव भारत " ह्या सशस्त्र क्रांतीकारी संस्थेचे नामकरण करून त्या संस्थेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवुन दिले. तुझ्यासाठी "मरण ते जनन"  तुझ्याविना "जनन ते मरण" ही फक्त त्यांच्यासाठी कविता नव्हती तर ही कविता सावरकर जगले. हिंदुराष्ट्राचा सामाजिक विचार हा तत्वज्ञानाशी जोडला जावा हे ते सदैव सांगत राहिले.

शिवरायांची आग्र्याहुन सुटका ह्याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला. अन् बोटीतून उडी समुद्रात मारली. त्यांची ही उडी जगभर गाजली . परंतु त्यांनी सगळ्यांना बजावून सांगितले. "एकवेळ  तुम्ही मी समुद्रात मारलेली उडी विसरलात तरी चालेल पण माझा सामाजिक विचार आणि तत्त्वज्ञान कधीही विसरू नका कारण मी म्हणजे स्वतंत्र हिंदू राष्ट्राची किंकाळी आहे"  

ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात त्यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला.   उठावाचे ते विचारवंत सेनानी झाले.  हा वणवा  फक्त भारतीय क्रांतिकारकांना पुरताच मर्यादित नव्हता तर त्यात इजिप्त, आयलँड या देशातील नेते आणि क्रांतिकारक फक्त स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत तर त्यांनी भारतात समाविष्ट असलेले चुकीचे राजकारण, चुकीची जीवनसरणी, धर्म, तत्त्वज्ञान आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध सुद्धा  लढा दिला.  कारण त्यांच्यासाठी हा देश म्हणजे एखादी जमीन नव्हती तर ती एक भावना होती. हा भारत म्हणजे त्यांची माता होती.

तिला त्यांना ब्रिटीशांच्या बेडीतुन सोडवायचे होते.  इंग्रजांच्या शत्रूंचे सहाय्य घेऊन त्यांनी स्वदेशी बंड पुकारले.   तेथील सैन्यांमध्ये सुद्धा राजद्रोह पेटवला.  ह्या सशस्त्र क्रांतीच्या उठावाचा वनवा त्यांनी जगभर एवढा पेटवला की पुस्तकांबरोबर पुस्तकांच्या पानांमध्ये त्यांनी भारतात शस्त्रे आणि बॉम्बची विद्याही पोचवली.

त्यांचे सहकारी मदनलाल धिंग्रा ,लाला हरदयाळ, वीरेंद्र चटोपाध्याय, मॅडम कामा व  व्ही. व्ही.अय्यर हे होते.  १९११  जून मध्ये महाराजा बोटीने त्यांना काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानात सेल्युलर जेलमध्ये आणले गेलदंडा मृत्यूच्या जबड्यात त्यांनी प्रवेश केला.   "अनादि मी अवध्य मी" हे मृत्युंजय कवच त्यांनी धारण केले व तेथील यमयातना भारत मातेच्या संरक्षणासाठी सहन करण्यासाठी ते पुन्हा सुसज्ज झाले.  

त्यांना तेलाच्या कोलुसाला जुंपले गेले दंडाबेडीत अडकवून टांगण्यात आले. फक्त भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले . कोणीही पाहू न शकणारे असे तेजपुंज सूर्यबिंब होते ते मग त्या सूर्यबिंबाला सूर्यकिरणांची काय गरज म्हणूनच एवढ्या मोठ्या अंधारकोठडीत त्यांना प्रत्यक्षात सरस्वती देवी प्रसन्न झाली. आणि पायात बोचणार्‍या काट्यांची त्यांनी लेखणी केली आणि भिंतींचा कागद केला आणि मनात साठलेले काव्य त्यांनी कारावासाच्या भिंतीवर लिहून काढले.

जवळ काहीही लेखन सामग्री उपलब्ध नसतानाही अंधारकोठडीत साहित्याची निर्मिती करणारे पहिले आणि शेवटचे साहित्यिक म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर.  ब्रिटिशांनी एवढे छळुन सुद्धा त्यांनी तेथील कैद्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार केला स्वतःचे धोरणे त्यांच्या अंगीकृत केली बाबाराव सावरकर यांना मृत्यूशय्येवर पाहताच त्यांनी " स्वातंत्र्य लक्ष्मी की जय " ही क्रांती घोषणा केली.


अहिंसा व चरखा या मार्गाने स्वातंत्र्य संपादन करणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात राहून स्वतःचा सदसदविवेकबुद्धीशी अप्रामाणिक राहण्यापेक्षा स्वतःच्या साहसी व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी त्यांची त्यांनी हिंदू महासभा निर्माण केली व ती एक स्वतंत्र राजकीय शक्ती आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.  हा अखंड भारत म्हणजे माझी माता आहे त्यातले प्रांत आणि भाषा म्हणजे माझ्या भगिनी आहेत ह्या माझ्या देशाकडे कोणीही वाईट नजरेने पाहू नये त्यासाठी ह्या भारतमातेच्या संरक्षणासाठी एक मर्द मराठा पुरेसा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

देशभक्ती, स्वातंत्र्य, प्रीती, साहस, प्रतिभा, प्रज्ञा, पराक्रम, यज्ञ भावना , वकृत्व यांचे दुर्मिळ रसायन म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर पण एक गुण दुसऱ्या कुणाशी स्पर्धा करणारा आणि मुख्य म्हणजे कुठलाही गुण अपेक्षेने आणि हितसंबंध याने दूषित झाला नव्हता.   
ह्या हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांनी स्वतःच्या आयुष्याचा होम केला.

मातृभूमीसाठी सावरकरांनी स्वतःचे आयुष्य, वकृत्व, लेखन एवढेच समर्पित केले नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या असीम त्यागाची आणि बलिदानाची आहुती धगधगत्या यज्ञकुंडात दिली. आणि त्या यज्ञकुंडाच्या ज्वाळा  जगभर एवढ्या पसरल्या की स्वातंत्र्ययुद्धाचा वनवा पेटला यातून भारत माता बंधन मुक्त होताना दिसली.

एकदा  स्वातंत्र्यवीर सावरकर गर्वाने म्हटले होते, " माझे कान भरण्याचा अधिकार फक्त शिवाजी महाराजांना आहे"  माझे विचार लोकांना दहा वर्षांनी पटतील दहा वर्षे वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे.


"झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा" या अर्थाने सिद्ध करणारा नरशार्दुल म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर ! "

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक संपादकीय (निमिष सोनार) संपादकीय (मैत्रेयी पंडित) बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई || प्रवासवर्णन || हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर || लेख विभाग || माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे सकारात्मक विचार - सविता कारंजकर मायमाखली नजर – प्रसाद वाखारे आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर एक स्त्री – प्रिया भांबुरे वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर || कथा || आगंतुक – सविता कारंजकर || कविता विभाग || तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे भाव अंतरीचा – छाया पवार स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड सून माझी लाडाची – नीला पाटणकर शोध – मंगल बिरारी लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर सुख – भरत उपासनी चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||