Get it on Google Play
Download on the App Store

द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई

(कल्पनारम्य कथांची माहिती देणारी ही लेखमाला या अंकापासून सुरु करत आहोत. त्याचा हा पहिला भाग!)

आरंभ मासिकांत आपण वाचकांना अतिशय नाविन्यपूर्ण असे लेख वाचायला मिळतात. ह्या लेखांत आम्ही विदेशी भाषांतील सुप्रसिद्ध कल्पनारम्य कथांचा वेध घेणार आहोत.  मराठी भाषेंत फेंटासि म्हणजे रम्य कथा इतर भाषांच्या तुलनेत जास्त नाहीत. नाथ माधवांचा वीरधवल हि कदाचित मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय अशी रम्यकथा होती. आम्हा भारतीयांना पण रम्यकथानची गरज सुद्धा नव्हती कारण आमच्या धर्मातील बहुतेक पुस्तके कल्पनाविलासाने नटलेली आहेत. मृत्युंजय सारख्या कादंबरींना जर आम्ही निव्वळ साहित्य प्रकार म्हणून पहिले तर त्या सुद्धा रम्यकथाच ठरतील.

आजच्या लेखांत आम्ही माहिती करून घेणार आहोत पोलिश भाषेतील अतिशय सुप्रसिद्ध अश्या पुस्तक मालिकांची ज्यांना लोक "विचर" म्हणून ओळखतात. १९९३ मध्ये अलेक्सएण्डर सॅपकोविस्की ह्या लेखकाने हे पहिले पुस्तक लिहिले आणि ते संपूर्ण युरोप मध्ये तुफान लोकप्रिय झाले. त्यांत २०१३ पर्यांत ह्या महाकथेची एकूण ८ पुस्तके प्रकाशित झाली. २०१६ मध्ये विचर ३ नावाची गेम सुद्धा निर्माण करण्यात आली आणि आज पर्यंत जगांतील सर्वाधिक लोकप्रिय गेम पैकी ती एक आहे. गेम ची लोकप्रियता पाहून नेटफ्लिक्स ने विचर ह्या नावाने मालिका सुद्धा बनवली आहे जी ह्या २० डिसेंबर ला प्रकाशित होईल. ह्यांत विचर नायकाचा रोल सुपरमॅन चा अभिनेता हेन्री कवील करणार आहे.

हि कथा एका काल्पनिक दुनियेत घडते. ह्या काल्पनिक दुनियेत सर्वांत प्रथम एल्फ येतात. एल्फ हि एक काल्पनिक प्रजाती आहे. आमच्या हिंदू धर्मांत ज्यांना आम्ही गंधर्व म्हणतो त्याच प्रकारची. एल्फ अतिशय सुंदर दिसतात. त्यांना गायन नृत्य इत्यादी येते पण त्याच वेळी हे लोक जवळ जवळ अमर सुद्धा असतात. एल्फ लोकांना जादू विद्या सुद्धा येते. एल्फ शिवाय ह्या दुनियेत बुटके आणि राक्षस म्हणजे (गनोम) सुद्धा असतात. बुटके आणि एल्फ ह्यांचे प्रचंड मोठे युद्ध होते ज्यांत एल्फ चा विजय होतो. बुटके लोक अवजारे बनवण्यात वकगबगार असतात ते डोंगरांत पळून जातात आणि तिथे डोंगर खणून गुप्त गुफा बनवून त्यांत राहतात. एल्फ लोक सुपीक जमीन आणि जंगलावर आपला कब्जा करतात.

मानवांचे आगमन कथेच्या कलमांच्या सुमारे ५०० वर्षे आधी होते. मानव आधी येऊन एल्फ कडून जादू वगैरे शिकून घेतात आणि नंतर एल्फ लोकांवर उलटून त्यांचा पराभव करतात. कथेच्या सुरवातीला ह्या दुनियेत दक्षिणेला नीलफगर्दीअन्स ह्यांचे राज्य आहे तर उत्तरेला विविध उत्तरीय राजांचे राज्य आहे. समुद्रांतील बेटांवर चाच्यांचे राज्य आहे. नीलफ राजाचे आणि ह्या उत्तरेच्या राजांचे वारंवार युद्ध होत असते. संपूर्ण कथेंत ह्या दोन्ही पक्षांत २ महायुद्धे होतात.

पण आता विचर हा प्रकार काय आहे ? ह्या काल्पनिक दुनियेत अनेक प्रकारच्या जादुई गोष्टी आहेत. विविध राक्षस, भुते, महाभयानक जनावरे, चेटकिणी, हडळ, ब्राह्मसमंध  इत्यादी ह्या दुनियेत सोकाळली आहेत. अत्यंत प्राचीन अश्या ह्या गोष्टी असून मानवांना ह्या सर्वांची प्रचंड भीती वाटते. ज्या एल्फ लोकांना ह्या सर्वांची माहिती होती ते बहुतेक करून मारले गेले आहेत किंवा अज्ञातवासांत आहेत. ह्या दुनियेत येऊन ५०० वर्षे झाली तरी मानवाने अजून ह्या सर्व अतींद्रिय आणि पारलौकिक शक्तीवर विजय प्राप्त केला नाही.

ह्या दुनियेत मेज म्हणजे पुरुष तांत्रिक आहेत आणि सॉसेरेस म्हणजे स्त्री तांत्रिक आहेत. ह्यातील काही विद्वान तंत्रिकांनी मंत्रशक्तीने मानवी जनुकांत बदल कसा करायचा ह्यांचे ज्ञान संपादन केले आणि एक शाळा स्थापन केली. ह्या शाळेंत ते अनाथ किंवा आई वडिलांनी सोडून दिलेल्या मुलांना घेत असत आणि त्यांच्यावर मंत्रप्रयोग करून त्यांना साधारण मानवापासून शक्तिशाली अश्या "विचर" ह्या प्रजातींत बदलत असत. फक्त पुरुष मुलेच विचर बनू शकतात. विचर बनण्यासाठी अतिशय खडतर असे शिक्षण घ्यावे लागते. मंत्रसिद्धी शिवाय विचर ला प्राणि जगत, भूत जगत आणि वनस्पती जगताबद्दल इत्यंभूत माहिती शिकावी लागत असे. त्याशिवाय घोडेस्वारी, शस्त्र प्रयोग आणि इतर खडतर असे शारिरीक व्यायाम सुद्धा करावे लागत असत. बहुतेक मुलांचा ह्या शिक्षणाच्या दरम्यान मृत्यू होत असे. ह्या शिक्षणामुळे विचर लोकांच्या जनुकांत बदल होऊन त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होतात. कुत्र्याप्रमाणे तीक्ष्ण घाणेंद्रिये, गरुडा प्रमाणे नजर, संमोहन शक्ती, इत्यादी. पण ह्याचा एक परिणाम म्हणून विचर लोकांना भावना अजिबात नसतात त्याच प्रमाणे विचर मुलांना जन्म देण्यास असमर्थ असतात. त्याच प्रमाणे विचर हे कधी म्हातारे होत नाहीत. बहुतेक विचर ४० वर्षांचे वाटतात. ह्या वयांत ते तरुण तसेच प्रगल्भ वाटतात.

कथेच्या ९० वर्षे आधी अनेक पारलौकिक शक्तींनी ह्या शाळेवर हल्ला केला आणि सर्व तंत्रिकांना आणि जवळ जवळ सर्व विचर ना मारून टाकले. ह्या हल्ल्यांत फक्त ४ विचर वाचले आणि सर्व तंत्रिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आणखीन नवीन विचर निर्माण होण्याचा मार्ग सुद्धा बंद झाला.

आमच्या कथेचा नायक आहे विचर गेराल्ट ऑफ रिव्हिआ. गेराल्ट १०६ वर्षांचा आहे पण आपल्या शक्तीमुळे तो फक्त ४० वर्षांचा वाटतो. गेराल्ट संपूर्ण दुनियेत फिरून विविध शक्तींशी लढून त्यांच्या नायनाट करतो. चेटकिणी, हडळ, भूतानी ग्रस्त अशी घरे, पाण्यातील भुते इत्यादी शक्तींना मारण्यासाठी लोक त्याला पैसे देतात. हे पैसे गेराल्ट नंतर विविध सुंदर वेश्या, दारू तसेच आपल्या साठी हत्यारे इत्यादींवर खर्च करतो. विचर लोकांचे केस आणि डोळ्याचे रंग हे इतर माणसा प्रमाणे असत नाहीत म्हणून सामान्य माणूस त्यांना घाबरतात. अनेक राज्यांत जादू करण्यावर बंदी असते इथे त्यांना विचर लोक आवडत नाहीत. एल्फ लोकांना सुद्धा विचर आवडत नाहीत. त्यामुळे नाईलाज म्हणून विचर ला लोक काम देत असले तरी त्यांच्यावर प्रेम आणि आपुलकी कोणीही दाखवत नाही.

विचर गेराल्ट चे दोन मित्र आहेत. एक आणि मानव कवी दांडेलीन. दांडेलीन हा सुंदर आवाजाचा शीघ्र कवी आहे. तो आपल्या बोलण्याने कुणालाही भुरळ पडतो आणि कुठलीही ललना त्याला सहज वश होते. दांडेलीन गेराल्ट च्या अनेक साहसावर कथा कविता लिहितो. त्यामुळे  गेराल्ट सर्व दुनियेत प्रसिद्ध झाला आहे. गेराल्ट चा बुटका मित्र आहे झोलतान. हा प्रचंड शक्तिशाली बुटका आहे आणि अनेक वेळा विविध साहसांत गेराल्ट ला मदत करतो.

गेराल्ट चे आयुष्य बदलणारी एक घटना घटते. सिरी हि लहान मुलगी गेराल्ट च्या आयुष्यांत येते आणि भावना नसलेल्या ह्या विचर ला तिच्यावर एका पित्याप्रमाणे प्रेम जडते. सिरी एक राजकन्या असते पण गेराल्टच्या सानिध्यांत येऊन ती सुद्धा एक पहिली स्त्री विचर बनते. ह्या दोन्ही विचर च्या आयुष्यांत अनेक संकटे येतात आणि आपल्या परीने दोन्ही त्यांचा सामना करतात. सिरी च्या जन्माचे रहस्य, तिचा गेराल्ट शी असलेला संबंध आणि येनेफर नावाची सुंदर सोसरेस ह्याच्या बद्धल अनेक उलगडे ह्या कथेत येतात.

अर्थांत सर्वच कथा सांगून रसभंग करण्याचा माझा इरादा नाही. पण मूळ कथानका बरोबर ह्या कथेंत अनेक छोट्या कथा सुद्धा आहेत. गेराल्ट एखाद्या डिटेक्टिव्ह प्रमाणे विविध अतींद्रिय शक्तींची रहस्ये शोधून काढतो. कधी कधी तो निर्दय पणे त्यांचा संहार करतो तर कधी कधी तो दया सुद्धा दाखवतो. कधी कधी शक्ती इतक्या शक्तिशाली असतात कि त्याला हार पत्करावी लागते. तर कधी कधी कुठल्याही राक्षसापेक्षा अधिक क्रूरता दाखवणार्या मानवाशी सुद्धा त्याला लढावे लागते.

गेराल्ट ऑफ रिव्हिया ची साहसे कदाचित मराठीत अजून उपलब्ध झाली नाहीत परंतु ह्या पुस्तकांची तुफान लोकप्रियता लक्षांत घेता लवकरच ती मराठी सुद्धा उपलब्ध होतील ह्यांत मला शंका नाही.

पोलिश भाषेतील ह्या कथेने सर्व जगावर आपले गारुड केले आहे. हि एक अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. जगांतील सुमारे ५ कोटी लोक पोलिश भाषा बोलतात. त्याच्या तुलनेत सुमारे ९ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेतून सुद्धा असे दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे आणि संपूर्ण जगात ते प्रसिद्ध व्हावे अशी आशा करण्यास हरकत नाही.

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक संपादकीय (निमिष सोनार) संपादकीय (मैत्रेयी पंडित) बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई || प्रवासवर्णन || हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर || लेख विभाग || माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे सकारात्मक विचार - सविता कारंजकर मायमाखली नजर – प्रसाद वाखारे आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर एक स्त्री – प्रिया भांबुरे वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर || कथा || आगंतुक – सविता कारंजकर || कविता विभाग || तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे भाव अंतरीचा – छाया पवार स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड सून माझी लाडाची – नीला पाटणकर शोध – मंगल बिरारी लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर सुख – भरत उपासनी चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||