Get it on Google Play
Download on the App Store

बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर

(गेल्या तीन महिन्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा)

डिसेंबर २०१९:
१) पुण्याचे जनरल मुकुंद नरवणे भारताचे २८ वे लष्करप्रमुख(भूदल)
२) स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला 'टाईम' मासिकाकडून 'टाईम पर्सन ऑफ द इयर' चा बहुमान
३)रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट आणि सूर्य पाहिलेला माणूस डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड
४)महाराष्ट्राने नोंदवला संपूर्ण देशात सर्वाधिक 4443 स्टार्टअप्स सुरू करण्याचा विक्रम
५) तेलंगणातील डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणारे आरोपी पोलीस चकमकीत ठार; चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना
६)नागरिकत्व(दुरुस्ती)विधेयक, २०१९ लोकसभा व राज्यसभेत मंजूर; देशभरातून कायद्याला तीव्र विरोध
७) ई सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ देशभरात लागू
८) जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या  QRSAM (Quick Reaction surface to air missile) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
९) संयुक्त राष्ट्रसंघाची २५वी जागतिक हवामान बदल परिषद COP25 स्पेनमधील माद्रिद येथे संपन्न
१०) महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण

जानेवारी २०२०:
१) मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; बीजमाता राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री, मेरी कोमला पद्मविभूषण पुरस्कार
२) चीनमध्ये कोरोना विषाणूचा धुमाकूळ; जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी घोषित
३) भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांची भरातभेट
४) महाराष्ट्र सरकारकडून शिवभोजन योजनेला सुरुवात; १० रुपयात मिळणार पोटभर जेवण
५) भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूचा पहिला बाधित सापडला; उपचार सुरू
६) महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांत मराठीचे शिक्षण केले सक्तीचे
७) गुवाहाटीमध्ये खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवात
८) केंद्र सरकारकडून 'एक राष्ट्र, एक रेशनकार्ड' योजना महाराष्ट्रासह १२ राज्यात लागू

फेब्रुवारी २०२०:
१) दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मते 'झाडू'न मते घेतली; भारतीय जनता पक्षाचा जोरदार पराभव
२) कीर्तनकार इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत; सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी
३) ९२व्या ऑस्कर पुरस्कारावर कोरियन 'पॅरासाईट'ची मोहोर; 'जोकर'नेही गाजवला सोहळा
४) सामाजिक कार्यकर्त्या व स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ यांचे पुण्यात निधन
५) अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर; गुजरातमधील मोटेरा स्टेडियमवर'नमस्ते ट्रम्प!'
६) उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये आढळल्या सोन्याच्या खाणी
७) 'सीमारहित भाषा' या थीमवर मातृभाषा दिवस देशभरात साजरा
८) नृत्य गोपाळ दास राम मंदिर ट्रस्टचे नवे चेअरमन

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक संपादकीय (निमिष सोनार) संपादकीय (मैत्रेयी पंडित) बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई || प्रवासवर्णन || हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर || लेख विभाग || माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे सकारात्मक विचार - सविता कारंजकर मायमाखली नजर – प्रसाद वाखारे आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर एक स्त्री – प्रिया भांबुरे वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर || कथा || आगंतुक – सविता कारंजकर || कविता विभाग || तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे भाव अंतरीचा – छाया पवार स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड सून माझी लाडाची – नीला पाटणकर शोध – मंगल बिरारी लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर सुख – भरत उपासनी चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||