श्लोक १६६ ते १७०
सहस्रपत्रनिलय: सहस्रफणभूषण: ।
सहस्रशीर्षापुरुष: सहस्राक्ष: सह्स्रपात् ॥१६६॥
९७९) सहस्रपत्रनिलय---ब्रह्मरन्ध्रगत सहस्रारचक्रात (सहस्रदल कमळात) राहणारा.
९८०) सहस्रफणभूषण---सहस्र फणाधारी नागांनी विभूषित.
९८१) सहस्रशीर्षापुरुष---विराट पुरुष. हजारो (असंख्य) मस्तके धारण करणारा. परमात्मा.
९८२) सहस्राक्ष---सहस्र नेत्र असलेला. असंख्य नेत्र असणारा.
९८३) सहस्रपात्---सहस्र पाय असलेला.
सहस्रनामसंस्तुत्य: सहस्राक्ष-बल-अपह:।
दशसाहस्र-फण-भृत-फणिराज-कृतासन: ॥१६७॥
९८४) सहस्रनामसंस्तुत्य---सहस्र नामांनी ज्याची स्तुती करावी असा.
९८५) सहस्राक्षबलापह---(सहस्राक्ष = इन्द्र) इंद्रसैन्याचा किंवा इंद्रबलाचा फडशा पाडणारा. विध्वंस करणारा.
९८६) दशसाहस्रफणभृत्फणिराजकृतासन---दहा हजार फणा धारण करणार्या नागराज वासुकीचे ज्याने आसन केलेले आहे असा.
अष्टाशीतिसहस्र-आद्यमहर्षि-स्तोत्र-यन्तित:।
लक्षाधीश-प्रियाधार: लक्ष्याधारमनोमय: ॥१६८॥
९८७) अष्टाशीतिसहस्राद्यमहर्षिस्तोत्रयन्त्रित---अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षीनी स्तवन केल्यावर वशीभूत झालेला. किंवा अठ्ठयाऐंशी हजार आद्यमहर्षिरचित स्तोत्रांनी वश होणारा.
९८८) लक्षाधीशप्रियाधार---धनवंतांचे आवडते अधिष्ठान असलेला किंवा सर्वश्रेष्ठ धनवान् असा जो कुबेर त्याचा आधार असलेला.
९८९) लक्ष्याधारमनोमय---लक्ष्यावर एकाग्र चित्त करणारा. लक्ष्यावर चित्त एकाग्र करण्यास आधार असणारा.
चतुर्लक्ष-जपप्रीत: चतुर्लक्ष-प्रकाशित: ।
चतुर्-अशीति-लक्षाणां जीवानां देह्संस्थित: ॥१६९॥
९९०) चतुर्लक्षजपप्रीत---चार लक्ष मन्त्रजपाने प्रसन्न होणारा.
९९१) चतुर्लक्षप्रकाशित--- चार लक्ष श्लोकसंख्या असणार्या १८ पुराणांनी ज्याचे वर्णन केले्ले आहे असा. चार लक्ष मन्त्रजपाने प्रकट होणारा.
९९२) चतुरशीतिलक्षाणां जीवानां देहसंस्थित---चौर्याऐंशी लक्षयोनी जीवांच्या देहांमध्ये विराजमान असणारा.
कोटिसूर्यप्रतीकाश: कोटिचन्द्रांशुनिर्मल: ।
शिवोद्भव-अध्युष्टकोटि-अष्टकोटि-विनायक-धुरन्धर ॥१७०॥
९९३) कोटिसूर्यप्रतीकाश---(प्रतीकाश=सारखा, सदृश) कोटीसूर्याप्रमाणे तेजस्वी.
९९४) कोटिचन्द्रांशुनिर्मल---कोटी चन्द्रकिरणांप्रमाणे निर्मल.
९९५) शिवोदभवाध्युष्टकोटिविनायकधुरन्धर---शंकर आणि पार्वती यांनी अधिष्ठित अशा कोटयावधी विनायकांचा धुरंधर नेता.