श्लोक २१ ते २५
गणाधिराज: विजयस्थिर: गजपतिर्ध्वजी ।
देवदेव: स्मरप्राणदीपक: वायुकीलक: ॥२१॥
११३) गणाधिराज---गणांचा अधिराज. पद्यातील म, य, र, स इत्यादी गणांमध्ये विराजमान असणारा.
११४) विजयस्थिर---कायम विजयी होणारा. भक्तांच्या विजयामध्ये स्थिर (निश्चित) असणारा.
११५) गजपतिध्वजी---ध्वजावर गजश्रेष्ठाचे चिन्ह असणारा.
११६) देवदेव---देवांचाही देव. देवांचाही देव असणार्या इंद्रादी देवांकडून ज्याची उपासना केली जाते तो.
११७) स्मरप्राणदीपक---मदनाचा प्राणरूप असणारा. शंकराने जाळल्यावर ज्याच्या कृपेने अनंगाला म्हणजे अंगरहित मदनाला अस्तित्व प्राप्त झाले तो.
११८) वायुकीलक---नवद्वार देहात (दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुडया, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार) प्राणांचे स्तंभन करणारा. ज्याच्या कृपेने प्राण-अपानांचे स्तंभन होऊन प्राणवायू अन्तरात्म्यात विलीन होतो तो.
विपश्चित्-वरद: नाद-उन्नाद-भिन्न-बलाहक: ।
वराह-रदन: मृत्युजय: व्याघ्र-अजिन-अम्बर: ॥२२॥
११९) विपश्चिद्वरद---राजा विपश्चिदास चतुर्वर्गांचा (धर्म-अर्थ-काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ) वर देणारा. विपश्चित् म्हणजे विद्वान, ज्ञानी; अशा माणसास वर देणारा.
१२०) नादोन्नादभिन्नबलाहक---बलाहक म्हणजे मेघ. आपल्या मंद आणि उच्च नादघोषाने मेघांना छिन्नभिन्न करणारा. मेघ हे आवरणाचे प्रतीक. मेघाने सूर्य़ आच्छादला जावा तसे अज्ञानाने, अविद्येने, मायेने आत्मतत्त्व झाकले जाते. ते मायापटल उध्वस्त करणारा किंवा बलाहकदैत्याचा नाश करणारा.
१२१) वराहरदन---महावराहाच्या दाताप्रमाणे दात असणारा.
१२२) मृत्युञ्जय---काळावर विजय मिळवणारा.
१२३) व्याघ्राजिनाम्बर---वाघाचे कातडे धारण करणारा.
इच्छा-शक्ति-धर: देव-त्राता दैत्य-विमर्दन: ।
शम्भु-वक्त्र-उद्भव: शम्भुकोपहा शम्भुहास्यभू: ॥२३॥
१२४) इच्छाशक्तिधर---जगत्सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाल्यावर इच्छेप्रमाणे शक्ती धारण करणारा.
१२५) देवत्राता---देवांचे दैत्यभयापासून रक्षण करणारा.
१२६) दैत्यविमर्दन---दैत्यांचे पारिपत्य करणारा.
१२७) शम्भुवक्त्रोद्भव---श्रीशंकरांना श्रीगणेशज्ञान प्रथम झाले. वक्त्र म्हणजे. मुख. शम्भुमुखातून प्रकट झालेला.
१२८) शम्भुकोपहा---आपल्या बाललीलांनी शंकराचा क्रोध हरण करणारा.
१२९) शम्भुहास्यभू---आपल्या खटयाळपणाने शंकरास हसविणारा.
शम्भुतेजा: शिवा-शोक-हारी गौरीसुखावह: ।
उमा-अङ्ग-मलज: गौरीतेजोभू: स्वर्धुनीभव: ॥२४॥
१३०) शम्भुतेजा---कल्याणकारी तेजाने युक्त. शंकराच्या तेजापासून उत्पन्न झालेला. किंवा शंकराप्रमाणे तेजस्वी.
१३१) शिवाशोकहारी---पार्वतीच्या शोकाचे निरसन करणारा.
१३२) गौरीसुखावह---तपस्या करणार्या पार्वतीस सुख देणारा.
१३३) उमाङ्गमलज---पार्वतीच्या अंगावरील मळापासून निर्माण झालेला किंवा पार्वती म्हणजे बुद्धी किंवा वृत्ती. त्यावर साचलेला अहंता आणि ममतारूप मळ दूर झाल्यावर प्रकट झालेला.
१३४) गौरीतेजोभू--- गौरीच्या तेजापासून उत्पन्न झालेला.
१३५) स्वर्धुनीभव---स्वर्धुनी म्हणजे गंगा, तिच्या उत्पत्तीस कारणीभूत झालेला किंवा ज्याला प्रदक्षिणा घालताना पायाच्या धक्याने कमंडलू उडून त्या स्वर्गीय जलाने ब्रह्मकमंडलू नामक श्रीमोरेश्वरीची कर्हा नदी प्रकटली असा तो.
यज्ञकाय: महानाद: गिरिवर्ष्मा शुभानन: ।
सर्वात्मा सर्वदेवात्मा ब्रह्ममूर्धा ककुप्श्रुति: ॥२५॥
१३६) यज्ञकाय---यज्ञ हेच ज्याचे शरीर आहे असा. यज्ञस्वरूप.
१३७) महानाद---उच्च स्वरात गर्जना करणारा. उच्च स्वरात वषट्श्रौषट्कार (आहुती देताना करावयाचे उच्चार) ऐकविणारा.
१३८) गिरिवर्ष्मा---पर्वतरूपी शरीर धारण करणारा. (गणपतिपुळ्याचा संपूर्ण पर्वतच गणेशस्वरूप आहे. म्हणून त्याच्या स्तोत्रात ‘गिरिवर्ष्मवन्तम्’ असे त्या गणेशाचे एक नाव येते.) वर्ष्म = शरीर
१३९) शुभानन---आनन म्हणजे मुख. ज्याचे मुख शुभ म्हणजे जो शुभदर्शन आहे असा.
१४०) सर्वात्मा---सर्व चराचराचा आत्मा.
१४१) सर्वदेवात्मा---सर्व देवांचा आत्मा.
१४२) ब्रह्ममूर्धा---ब्रह्म हेच ज्याचे मस्तक आहे असा.
१४३) ककुप्श्रुनि---ककुप् म्हणजे दिशा आणि श्रुति: म्हणजे कान. दिशा हेच ज्याचे कान आहेत असा.