Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १६१ ते १६५

नमत्‌-एकोनपञ्चाशत्‌-मरुत्‌वर्ग-निरर्गल: ।
पञ्चाशत्‌-अक्षरक्षेणी पञ्चाशत्‌-रुद्रविग्रह: ॥१६१॥
९६०) नमदेकोनपञ्चाशन्मरुद्‌वर्गनिरर्गल---(एकोनपञ्चाशत्‌ =४९) (निरर्गल = अप्रतिहत) अप्रतिहत (कोणताही अडथळा नसलेली) गती असणार्‍या एकोणपन्नास मरुत्‌गणांकडून नमस्कार केला जाणारा. एकोणपन्नास मरुत्‌ संज्ञक देवता पुढीलप्रमाणे - प्राण-अपान-व्यान-उदान-समान-नाग-कृकल-कूर्म-देवदत्त-धनंजय-प्रवह-विवह-शंभू-संवह-परिवह-उद्वह-आवह-शंकू-काल-प्रावह-शास-अनिल-अनल-प्रतिभ-कुमुद-कांत-शिबी-श्वेत-रक्त-कृष्ण-जित-अजित-झंझाद्योत-क्रतू-सिद्ध-पिंग-शुची-सौम्य-काम्य-मारूत-हनू-कंपन-मंडूक-भीम-कपी-संवर्तक-जड-अतिजड-संतत. (श्रीतत्त्वनिधी)
९६१) पञ्चाशदक्षरश्रेणी---(पंचाशत्‌ =५०) पन्नास अक्षर-मालास्वरूप १६ स्वर आणि क-च-ट-त-प-य-श वर्ग व ळ अशा ५० अक्षरांच्या श्रेणी (१६ खडय़ा) स्वरूप.
९६२) पञ्चाशद्रुद्रविग्रह---श्रीकण्ठादी पन्नास रुद्र (शिव) रूप. ५० रुद्रविग्रहांची नावे पुढीलप्रमाणे - श्रीकण्ठ-अनन्त-सूक्ष्म-त्रिमूर्ती-अमरेश्वर-अधीश-भारभूती-अतिथीश-स्थाणुक-हर-झिण्टीश-भौतिक-सद्योजात-अनुग्रहेश्वर-अक्रूर-महासेन-क्रोधीश-चण्डीश-पञ्चान्तक-शिव-उत्तम-एकरुद्र-कूर्मैकनेत्राह्व-चतुरानन-अजेय-शर्व-सोमेश-लाङ्गलिदारूक-अर्धनारीश्वर-उमाकान्त-आषाढी-दण्डी-स्युरद्री-मीन-मेष-लोहित-शिखी-छगलण्ड-द्वरण्डेश-महाकाल-सवाली-भुजङ्गेश-पिनाकीश-खडगीश-बक-श्वेत-भृगू-ईशा-नकुलिशिव आणि संवर्तक (शारदातिलक पटल-२)
पञ्चाशत्‌-विष्णुशक्ति-ईश: पञ्चाशत्‌-मातृका-आलय: ।
द्विपञ्चाशत्‌-वपु:-श्रेणी त्रिषष्टि-अक्षर-संश्रय: ॥१६२॥
९६३) पञ्चाशद्विष्णुशक्तीश---केशवादी विष्णुरूपे व कीर्ती आदी शक्ती पन्नास आहेत. त्या सर्वांचा स्वामी. ईश्वर. ५० विष्णुशक्ती पुढीलप्रमाणे - कीर्ती-कान्ती-तुष्टी-पुष्टी-धृती-क्षान्ती-क्रिया-दया-मेधा-सहर्षा-श्रद्धा-लज्जा-लक्ष्मी-सरस्वती-प्रीती-रती-जया-दुर्गा-प्रभा-सत्या-चण्ड-वाणी-विलासिनी-विजया-विरजा-विश्वा-विनदा-सुनदा-स्मृती-ऋद्धी-समृद्धी-शुद्धी-भक्ती-बुद्धी-स्मृती-क्षमा-रमोमा-क्लेदिनी-क्लिन्ना-वसुधा-वसुदापरा-परा-परायणी-सूक्ष्मा-सन्ध्या-प्रज्ञा-प्रभा-निशा-अमोघा-विद्युता (शारदातिलक).
९६४) पञ्चाशन्‌मातृकालय---५० मातृकावर्णांचे आलय अथवा लयस्थान. नादस्वरूप.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं अ:,
क्‌, ख, ग्‌, घ्‌, ङ, च्‌, छ्‌, ज्‌, झ्‌, ञ्‌, ट्‌, ठ्‌, ड, ढ‌, ण्‌,
त्‌, थ्‌, द्‌, ध्‌, न्‌. प्‌, फ्‌, ब्‌, भ्‌, म्‌,
य्‌, र्‌, ल्‌, व्‌, श्‌, ष्‌, स्‌, ह्‌, क्ष्‌, ज्ञ्‌, अ ते ज्ञ या ५० वर्णांचे स्थान.
९६५) द्विपञ्चाशद्‌वपु:श्रेणी---लिङ्ग पुराणात वर्णन केलेल्या पञ्चपर्व अविद्यारूप पाशांनी (नाम क्र. ५४५पाहा) बद्ध केले जाणारे बावन्न शरीरधारीस्वरूपी.
९६६) त्रिषष्टयक्षरसंश्रय---अक्षरवर्णांची संख्या त्रेसष्ट अथवा चौसष्ट मानली जाते. यात २१ वर्ण स्वर + २५ स्पर्शवर्ण + ८ यादिवर्ण + ४ यमवर्ण + २ अनुस्वार व विसर्ग, २ पराश्रितवर्ण आणि दुःस्पृष्ट ‘ल’ कार असे ६३ वर्ण अधिक प्लुतलकार = ६४. (अशा त्रेसष्ट अक्षरांचा आधार.)
चतु:षष्टि-अर्ण-निर्णेता चतु:षष्टि-कलानिधि: ।
चतु:षष्टि-महासिद्ध-योगिनी-वृन्द-वन्दितः ॥१६३॥
९६७) चतु:षष्टयर्णनिर्णेता---चौसष्ट वर्णांचा निर्मय करणारा.
९६८) चतु:षष्टिकलानिधि---वात्स्यायन कामसूत्रांच्या आधारे ६४ कलांचे वर्गीकरण असे - वाङमयात्मक क्ला - वाचन व पठन - शब्दकोशविद्या व पद्यरचना - गूढकाव्यज्ञान-समस्यापूरी-न पाहिलेल्या वस्तू व अक्षरे ओळखणे - सांकेतिकभाषाज्ञान -अनेकभाषाज्ञान - कूटप्रश्न सोडवणे - तोंडी कूटप्रश्र सोडविणे - नकला करणे - गृह्यकला - शिवणकला - धनुष्यबाण वगैरे करणे - शय्या तयार करणे. पाकशास्त्रकला - विविध भोजनप्रकार - विविधपाकरचना - विविध पेये तयार करणे. स्नानवेषभूषा वगैरे कला - चंदनाची उटी - अलंकार घालणे - सुगंधी द्रव्ये तयार करणे - फुलांचे दागिने  - पुष्पमाला बनविणे - दात, वस्त्रे रंगविणे-केशरचना - शिरोवेष्टनप्रकार - वस्त्रांवर कशिदा करणे - हस्तव्यवसायकला - नकाशा काढणे - चित्रकला - विविध दृश्ये दाखविणे - मूर्तिकला - लाकडावरील खोदकाम - रांगोळ्या - पुष्पशय्या तयार करणे - दोर्‍याची कृत्रिम फुले तयार करणे - फुलांच्या गाडया तयार करणे - करमणुकीच्या कला - कारंजे तयार करणे - जादुगिरि - तर्ककर्म - कोंबडे वगैरेंची लढत लावणे - पोपटांना शिकविणे - विविधरीतींनी एकच गोष्ट करणे - हातचलाखी - विविध खेळ - वशीकरणविद्या - विविध वेष धारण करणे - कुचुमाराने शिकवलेली जादू करणे.
शास्त्रीय कला - सोने वगैरेत हिरे बसविणे - गृहशिल्प - सोने वगैरेची परीक्षा - विविध धातूंचे ज्ञान - रत्ने रंगविणे - खाणी कोठे आहेत ते ओळखणे - बागबगीचा - धातूवरील कोरीव काम - मणी, रन्ते वगैरेंना भोके पाडणे.
संगीत कला - गायन - वादन - जलतरंग - शरीर गोंदणे
शारीरिक व्यायाम कला - मुलांचे खेळ - विविध व्यायामांचे ज्ञान - नृत्य आणि युद्धकलांचे ज्ञान.
नाटयकला - अभिनय
शिष्टाचार कला - विविध शिष्टाचारांचे ज्ञान.
(थोडयाफार फरकाने शिवतत्त्वरत्नाकर, भारत शूद्रकमलाकर ग्रंथात ही ६४ कलांचा नामनिर्देश आढळतो.)
९६९) चतु:षष्टिमहासिद्धयोगिनीवृन्दवन्दित---महासिद्ध आणि योगिनी समूहांकडून नन्दिला जाणारा. (वृन्द=समूह, समुदाय) ६४ मिथुने म्हणजे सशक्तिक देवता. ती मिथुने अशी-ब्राह्मी-नारायणी-माहेश्वरी-चामुण्डा-कौमारी-अपराजिता-वाराही-नारसिंही यांनी होणारी ८. असिताङ्ग-रुरू इत्यादी भैरवांचे आठा-आठाचे ४ गट (नाम ९५६ पाहा) यांनी होणारी ३२. मङ्गला-पिङ्गला-धन्या-भ्रामरी-भद्रिका-उल्का-सिद्धा-सङ्कटा यांनी होणारी, ८.अक्षोभ्य-वामदेव-घोर-सदाशिव-पंचवक्त्र यांनी होणारी १०.रमा-शची-रोहिणी-स्वाहा-प्रभा-भद्रकाली यांनी होणारी ६.अशी सर्व मिळून ६४ योगिनी - गजानना-सिंहमुखी-गृध्रास्या-काकतुंडिका-उष्ट्रग्रीवा-हयग्रीवा-वाराही-शरभानना-उलूकिका-शिवारावा-मयूरी-विकटानना-अष्टवक्त्रा-कोटराक्षी-कुब्जा-विकटलोचना-शुष्कोदरी-ललज्जिह्वा-स्वदृष्टा-वानरानना-रुक्षाक्षी-केकराक्षी-ब्रह्मतुण्डा-सुराप्रिया-कपालहस्ता-रक्ताक्षी-शुकी-सेनी-कपोतिका-पाशहस्ता-दण्डहस्ता-प्रचण्डा-चण्डविक्रमा-शिशुघ्नी-पापहन्त्री-काली-रुधिरा-पापिनी-वसाधया-विद्युत्प्रभा-बलाकास्या-मार्जारी-गर्भभक्षा-शवहस्ता-अन्वमालिका-स्थूलकेशी-बृहत्कुक्षी-सर्पास्या-प्रेतवाहना-दन्दशूककरा-क्रौञ्ची-वसानना-व्यातास्या-धूमनिश्वासा-योमैकचा-रणोर्ध्वदशा-तापनी-शोषणदृष्टी-कोटरी-स्थूलनासिका-कटपूतना-अट्टाट्टहास्या-कामाक्षी-मृगाक्षी, (भागवत) यांचा संबंध श्रीचक्रातील दोन वा तीन रेखा ज्या बिन्दूत मिळतात त्या बिंदूंच्या संख्येशी आहे. मध्यस्थ बिंदूच्या ठिकाणी गणेश नादरूपाने स्थित असून हे सर्व त्याला वंदन करतात.
अष्टषष्टिमहातीर्थक्षेत्र-भैरवभावन: ।
चतुर्नवतिमन्त्रात्मा षण्णवति-अधिक-प्रभु: ॥१६४॥
९७०) अष्टषष्टिमहातीर्थक्षेत्रभैरवभावन---शिवाच्या अडुसष्ट महातीर्थ क्षेत्री असणार्‍या भैरवांना पूज्य असणारा. त्यांच्यात शिवभावना किंवा त्यांना उत्पन्न करणारा. ६४ भैरव - असिताङ्ग-विशालाक्ष-मार्तण्ड-मोदकप्रिय-स्वच्छन्द-विघ्नसंतुष्ट-खेचर-सचराचर-रुरू-क्रोडदंष्ट्र-जटाधर-विश्वरूप-विरूपाक्ष-नानारूपधर-पर(महाकाय)-वज्रहस्त-चण्ड-प्रलयान्तक-भूमिकम्प-नीलकण्ठ-विष्णू-कुलपालक-मुण्डपालक-कायपाण्डक-क्रोध-पिङ्गलेक्षण-अभ्ररूप-धारापाल-कुटिल-मन्त्रनायक-रुद्र-पितामह-उन्मत्तबटुकनायक-शङ्कर-भूतवेताल-त्रिनेत्र-त्रिपुरान्तक-वरद-पर्वतवास-शुभ्रवर्ण-कापाल-शशिभूषण-हस्तिचर्माम्बरधर-योगीश-ब्रह्मराक्षस-सर्वज्ञ-सर्वदेवेश-सर्वंगतहृदिस्थित-भीषण-भयहर-सर्वज्ञ-कालाग्नी-महारौद्र-दक्षिणमुखर-अस्थिर-संहार-अतिरिक्ताङ्ग-प्रियङ्कर-घोरनाद-विशालाक्ष-योगीश-कालाग्नी-दशसंज्ञित-क्षेत्रभैरव (स्कन्दपुराण-काशीखण्ड अध्याय)
९७१) चतुर्नवतिमन्त्रात्मा---३८ कलामन्त्र + ५० मातृकाकलामन्त्र + हंस, शुचि, प्रतिद्‌विष्णू, विष्णुर्योनी आणि त्र्यंबक आणि तद्‌विष्णो: असे सहा. विष्णुमूलविद्या मन्त्र मिळून चौर्‍याण्णव मूलमन्त्रस्वरूप.
९७२) षण्णवत्यधिकप्रभु---तन्त्रराजतन्त्रात श्रीचक्राच्या शहाण्णव देवता सांगितल्या आहेत. त्या देवता गणेशसंयोगाने अधिक होतात म्हणून त्यांचा ईश. शहाण्णवाहून अधिक चक्रदेवता होतात. त्या सर्व देवतांचा अधिपती.
शतानन्द: शतधृति: शतपत्र-आयत-ईक्षण: ।
शत-अनीक: शतमख: शतधारा-वरआयुध: ॥१६५॥
९७३) शतानन्द---मानुष आनन्दापेक्षा शतगुणोत्तर वाढत जाणारे ब्रह्मानन्दापर्यंतचे आनन्द तैत्तिरीय उपनिषदात वर्णिलेले आहेत ते असे - मानुषानन्द गन्धर्वानन्द-चिरलोकानन्द-देवानन्द-कर्मदेवानन्द-आजानजानानन्द-इन्द्रानन्द-बृहस्पत्यानन्द-प्रजापत्यानन्द-ब्रह्मानन्द हे सर्व आनंद गणेशस्वरूप आहेत.
९७४) शतधृति---अनन्त (शेकडो) ब्रह्माण्डांना धारण करणारा.
९७५) शतपत्रायतेक्षण---शतपत्र म्हणजे कमळ, आयत म्हणजे मोठे, दीर्घ, ईक्षण म्हणजे डोळे, कमळाप्रमाणे प्रफुल्लित डोळे असणारा.
९७६) शतानीक---अनीक म्हणजे सैन्य. पुष्कळ सैन्यबल असणारा.
९७७) शतमख---मख म्हणजे यज्ञ, शेकडो यज्ञांचे अनुष्ठान करणारा.
९७८) शतधारावरायुध---तीक्ष्ण धार असलेल्या शेकडो वज्रांपेक्षाही उत्तम (वर) आयुधे धारण करणारा.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५