Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ९६ ते १००

दन्तप्रभिन्न-अभ्रमाल: दैत्यदारणवारण: ।
दंष्ट्रालग्न-द्विपघट: देवार्थ-नृ-गज-आकृति: ॥९६॥
५१८) दन्तप्रभिन्नाभ्रमाल---केवळ मस्तक हलवून दन्ताघाताने मेघपंक्ती छिन्नभिन्न करणारा. (अभ्रमाल = मेघपंक्ती)
५१९) दैत्यदारणवारण---दैत्यांच्या हत्तींचे (वारण) किंवा दैत्यरूपी हत्तींचे विदारण करणारा किंवा दैत्यांचा विध्वंस करणारा हत्ती.
५२०) दंष्ट्रालग्न द्विपघट---ज्याच्या दाढेच्या एकाच भागात शत्रूच्या ह्त्तींचा समुदाय राहतो असा.
५२१) देवार्थनृगजाकृति---देवतांच्या कार्यसिद्धीसाठी ज्याने नरदेह व गजमुख धारण केले आहे. असा.
धनधान्यपति: धन्य: धनद: धरणीधर: ।
ध्यानैक-प्रकट: ध्येय: ध्यानं ध्यानपरायण: ॥९७॥
५२२) धनधान्यपति---धन आणि धान्याचा स्वामी.
५२३) धन्य---धनसम्पन्न वा पुण्यसंपन्न.
५२४) धनद---धनदाता.
५२५) धरणीधर---शेषनाग तसेच आदिवराहरूपात पृथ्वीला मस्तकावर धारण करणारा.
५२६) ध्यानैकप्रकट---केवळ ध्यानानेच प्रकट होणारा.
५२७) ध्येय---ध्यानात पाहावा असा. ज्याचं ध्यान करावं असा.
५२८) ध्यानम्‌---ध्यानस्वरूप.
५२९) ध्यानपरायण---ध्यानातच रमणारा. आत्मानन्दलीन.
नन्द्य: नन्दिप्रिय: नाद: नादमध्यप्रतिष्ठित: ।
निष्कल: निर्मल: नित्य: नित्यानित्य: निरामय: ॥९८॥
५३०) नन्द्य---आनंददायक, आनन्दनीय.
५३१) नन्दिप्रिय---नन्दीला प्रिय असणारा.
५३२) नाद---ओंकार. नादानुसंधानाने प्राप्त होणारा. नादस्वरूप.
५३३) नादमध्यप्रतिष्ठित---नादामध्ये प्रतिष्ठित असणारा. नादानुसंधान राखणारा.
५३४) निष्कल---अवयवरहित. निर्दोष. निरुपाधिक.
५३५) निर्मल---परमशुद्ध. मल म्हणजे माया. मायारहित. निर्मल.
५३६) नित्य---शाश्वत.
५३७) नित्यानित्य---शाश्वत आणि अशाश्वत रूपातही नटलेला.
५३८) निरामय---अविद्यारूपी रोगापासून मुक्त. रोगरहित
परं व्योम परंधाम परमात्मा परंपदम्‌ ।
परात्पर: पशुपति: पशुपाशविमोचक: ॥९९॥
५३९) परंव्योम---अव्याकृत आकाशरूप. व्योम म्हणजे आकाश.
५४०) परंधाम---परम विश्रांतीचे स्थान. शांतिस्थान. ज्योतीचेही ज्योतिस्वरूप.
५४१) परमात्मा---सर्व जीवश्रेष्ठातील परमरूप. परमात्मा।ब्रह्म.
५४२) परंपदम्‌---पदम्‌ म्हणजे स्थान. सर्वोच्च स्थान.
५४३) परात्पर---त्रिमूर्तिंहूनही श्रेष्ठ. श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ.
५४४) पशुपति---आब्रह्मकीटकादी पशूंचा पालनकर्ता. जीवरूपी पशूंचा स्वामी.
५४५) पशुपाशविमोचक---समस्त जीवांना विविध पाशांपासून मुक्त करणारा. सांख्यतंत्रामध्ये ५२ प्रकारचे पाश सांगितले आहेत. त्यांच्यापासून ब्रह्मादिकांनाही सोडविणारा. सांख्यादिक दर्शने व तन्मात्र आब्रह्मकीटकादी ‘पशु’ संज्ञितांना बद्धु करणारे विविध पाश सांगितले आहेत. त्यापासून त्यांना सोडविणारा, मुक्त करणारा. दिक्‌-काल-मृत्यू-षड्‌रिपू-ईषणात्रय-जन्म-त्रिविधपाप-त्रिविध पुण्य-त्रिविध कर्मे-देव-राक्षस-गन्धर्व-किन्नर-चारण-खग-उरग-यक्ष-चतुर्दशभुवने-त्रिगुण-पञ्चभूते असे विविध पाश आहेत.
पूर्णानन्द: परानन्द: पुराणपुरुषोत्तम: ।
पद्‌मप्रसन्ननयन: प्रणताज्ञानमोचन: ॥१००॥
५४६) पूर्णानन्द---कर्ता, कर्म, क्रिया इत्यादी भेदांनी मर्यादित नसणारा. परिपूर्ण सुखरूप.
विष्णु-लक्ष्मींनी तपश्चरण केल्यावरून, त्याचे फळ देण्यासाठी ‘पूर्णानंद’ नामक अवतार झाला. तो विष्णूचा पूत्र होय. सगुण निर्गुणादी एकानेकप्रचुर उपाधींनी संपन्न अशा ब्रह्माच्या ठिकाणी व्यापून असणारे व त्यांना खेळविणारे ब्रह्म, आनंदब्रह्म होय. तद्रूपसंपन्न असा हा पूर्णानन्द-ब्रह्मणस्पति-विष्णूचा आत्माच होय. असा अर्थ ‘पूर्णानन्द’ नामावरून प्रतीत होतो.
५४७) परानन्द---भूमानन्दपासून ब्रह्मानन्दापर्यंत शंभराच्या पटीत वाढत जाणारे आनन्द उपनिषदात वर्णिले आहेत. त्याहूनही श्रेष्ठ कोटीचा आनन्द.
५४८) पुराणपुरुषोत्तम---क्षर-अक्षराहूनही अधिक उत्तम आणि अनादि होण्याच्या कारणामुळे पुराणपुरुषोत्तम. अनादि पुरुषोत्तम.
५४९) पद्‌मप्रसन्ननयन---प्रफुल्लित कमळाप्रमाणे उल्हासयुक्त असे प्रसन्न नेत्र असणारा.
५५०) प्रणताज्ञानमोचन---शरणागत सेवकांना तत्त्वज्ञान सांगून त्यांच्या अज्ञानाचे  निवारण करणारा.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५