श्लोक १ ते ५
॥ श्री ॥
गणेशपुराणातून घेतलेले श्रीगणेशसहस्रनाम
(श्रीभास्कररायदीक्षितप्रणीतखद्योतभाष्यसङ्ग्रहयुतम् ।)
श्रीगणेशाय नम:।
व्यास उवाच---
कथं नाम्नां सहस्रं स्वं गणेश उपदिष्टवान् ।
शिवाय तत् मम आचक्ष्व लोकानुग्रह-तत्पर ॥१॥
व्यास म्हणाले---लोकांवर कृपा करण्यास तत्पर असलेल्या ब्रह्मदेवा, गणपतीने आपल्या एक हजार नावांचा शंकरास कसा उपदेश केला ते मला सांगा.
ब्रह्मोवाच---
देव एवं पुराराति: पुरत्रय-जय-उद्यमे
अनर्चनाद् गणेशस्य जातो विघ्नाकुल: किल ॥२॥
ब्रह्मदेव म्हणाले - पूर्वी म्हणे पुरांचा शत्रू (अराति:) असलेले शंकर, त्या असुराची तीनही नगरे जिंकण्याच्या वेळी, गणेशाचे पूजन न केल्यामुळे विघ्नांच्या योगाने अनेक संकटांनी गांजून गेले.
मनसा स: विनिर्धार्य तत: तद् विघ्नकारणम् ।
महागणपतिं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधि ॥३॥
नंतर विघ्नांचा कारणांविषयी मनात विचार करून, भक्तीने महागणपतीचे यथाविधि पूजन करून,
विघ्न-प्रशमन-उपायम् अपृच्छत् अपराजित: ।
संतुष्ट: पूजया शम्भो: महागणपति: स्वयम् ॥४॥
दुसर्यास अजेय असलेले शंकर विघ्ननाश करण्याचा उपाय त्यास विचारू लागले, शंकरांनी केलेल्या पूजेमुळे संतुष्ट झालेल्या महागणपतीने स्वत: ।
सर्वविघ्नैकहरणं सर्वकामफलप्रदम् ।
तत: तस्मै स्वकं नाम्नां सहस्रम् इदम् अब्रवीत् ॥५॥
सर्व विघ्नांचे निश्चयाने हरण करणारे आणि सर्व कामना पूर्ण करणारे, आपल्या सहस्र नावांचे हे स्तोत्र त्यांना सांगितले.