Get it on Google Play
Download on the App Store

शेतकर्‍याचा असूड - पान ८

ती अशी कीं " प्रश्न.--तुमचा गांव कोण आणि तुमचें आडनांव काय ? उ -- आमचा गांव पुणें आणि आमचें आडनांव जगताप. प्र-- तर मग सास्वडचे जगताप तुमचे कोण ? उ -- सासवडचे जगताप आणि आम्ही एकच, सुमारें साताआठ डोपा झाल्या, शेराचे काळांत आमची मूळ पाटी सासवडाहून पुण्यास आली व हल्लीं आम्ही आपल्या मुलाबाळांचीं जावळें सासवडास जाऊन करितों. कारण त्यांची आणि आमची सठवाई एक व त्यांचें आमचें देवदेवकही एक प्र -- तर मग तुमचा व आमचा सोईरसंबंध सहजासहज जमेल; कारण सासवडचे जगताप आमचे सोयरेधायरे आहेत ; तुम्ही तिकडचा पदर मात्न जुळवून द्या म्हणजे झालें, मग तुमची आमची इतर बोलाचाली एका क्षणांत करून लग्नचिठया ताबडतोब काढतां येतील." याप्रमाणें खरी हकीगत असून जर एखादा प्रश्न करील कीं, तुम्ही हें जें म्हणतां याला आधार तरो कोणत्या शास्त्नाचा ? तर त्यास माझें असें उत्तर आहे कीं, सुवर्ण-लोभास्नद इराणांतील आर्य लोकांनीं मागाहून जेव्हां या देशांतील सर्व मूळच्या स्थाइक अस्तिक, राक्षस वगैरे लोकांचा विध्वंन केला, त्यांपैकीं उरलेल्या मुगुटमणी द्स्यु लोकांवर लागोपाठ अनेक स्वार्‍या करून अखेरीस त्यांस आपले दास करुण नानाप्रकारचे त्नास देण्याची सुरवात केली ; त्यावेळी विजयी झालेल्या आर्य लोकांच्यानें आपल्या शास्त्नांत, पराजित केलेल्या शूद्रांची पूर्वीची खरी मूळ पीठिका कशी लिहववेल ? पुढें बराच काळ लोटल्यानंतर त्या सर्व गांवच्या वनांतील फळांवर जेव्हां जिर्वाह होईना. तेव्हां ते मासे. पशू व पशी यांच्या शिकारीवर आपलें उदरपोषण करूं लागले असतील; त्यांजवरही त्यांचा जेव्हां बरोबर निर्वाह होईना; तेव्हां त्यांनीं थोडीशी शेती करण्याचा उद्योग सुरू ह्त्यारेंपात्यारें. औतकाठया वगैरे सामानसुमान नवीन करण्याची त्यांस जसजशी युक्ति सुचूं लागली, तसतशी त्यांनीं प्रांताचे प्रांत लागवड केली असेल व त्या मानानें लोकसंख्याही वाढूं लागल्यामुळें एकंदर सर्व प्रांतांतील वनचराईच्या व सरहद्दोच्या वगैरे संबंधानें सर्व देशभर लढे पडून, त्यांच्यांत मोठमोठाल्या हाणामार्‍या होऊन खूनखराब्या होऊं लागल्य़ा असतील. त्या सर्वांचा बंदोबस्त करण्याकरितां एकंदर सर्व प्रांतांतील लोकांस एके ठिकाणीं जमून सर्वानुमते त्या सर्व कामांचे निकाल सहज करण्याचें फार कठीण पडूं लागलें असेल. यास्तव सर्वानुमतें अशी तोड निघाली कीं, एकंदर सर्व प्रांतांतील गांवोगांवच्या लोकांनी आपआपल्या गांवांतील एकेक शहाणा माहितगार निवडून काढावा आणि त्या सर्वांनीं एके ठिकाणीं जमून तेथें वहुमतानें सर्व कामांचे उलगडे करून निकालास लावण्याची वहिवात सुरूं केलीं. यावरून आपले सर्व लोकांत हा काळपावेतों निवडून काढलेल्या पंचाचेमार्फत मोठमोठाल्या कज्जांचे निवाडे करून घेण्याची वहिवाट जारी आहे. पुढें कांहीं काळानें जेव्हां अटक नदीचे पलीकडे जाऊन कित्येक कुळांनीं तेथें लागवड करून वसाहत केली व त्या मानानें चहूंकडे खानेसुमारी अफाट वाढली, तेव्हा आवर्पणामुळें कित्येक ठिकाणीं पिकास अजिवात धक्का वसून सर्व नदीनाले व तळीं उताणीं पडलीं, यामुळे अरण्यांतील एकंदर सर्व पशपक्षी जिकडे पाणी मिळेल तिकडे निघून गेले. जिकडे पहावें तिकडें उपासामुळें मनुष्यांच्या लोथीच्या लोथी पडलेल्या पाहून कित्येक देशांतील धाडस पुंडांनीं बहुतेक वुभुक्षित कंगालांस आपल्या चाकरीस ठेवून त्यांस आपल्याबरोबर घेऊन, आरंभीं त्यांनीं आसपासच्या अवाद देशांत मोठमोठाले दरोडे घालतां चालतां, त्यांचे हाताखालचे लोकांवर त्यांचा पगडा बसतांच त्यांनीं इतर लोकांचे राजे होण्याचे घाट घातलें ( याविषयीं आतां आपण शोध करूं लागल्यास त्यांपैकों वहुतेक पिढीजादा राजांचे घराण्यांतील मूळ पुरुष याच मालिकेंतील शिरोमणि निघतील. ) त्यांचा बंदोवस्त करावा म्हणून एकंदर सर्व देशांतील गांवकरी, यांच्या हातून हुशार प्रतिनिधीची निवडणूक करून त्याच्या संमतीनें एकंदर सर्व देशाचें संरक्षण करण्यापुरती फौज ठेवून, तिचा खर्च भागण्यापुरता शेतसारा बसवून त्याची जमाबंदी करण्याकरितां. तहशीलदारांसहित चपराशांच्या नेमणुका करून व्यवस्था केली. त्यामुळें एकंदर सर्व देशांतील लोकांस आराम झाला असेल. नंतर कांहीं काळानें चहूकडे सुवता झाल्यामुळें वळीचें स्थान म्हणजे बलूविस्थानचे पलीकडील कित्येक डोईजड लोभी प्रतिनिधोंनों, सदरील चोरटे लोकांचें वैभव पाहून ते आपआपल्या देजावे राजे बनतांच,पुर्वीचे लोकसत्तात्मक राज्यांचा बोज उडून तीं लयास गेल्यामुळें, इराणचे आलीकडील छप्प देशांत शाहण्णव कुलाचे प्रतिनिधींनीं मात्न आपआपलीं निरनिराळीं राज्यें स्थापून, त्या सर्वांनीं एकमेअकांचे सहायानें वर्षे वाध न येतां द्स्यू, आस्तिक, अहीर, असूर, उय्र, पिशाच मातंस वगैरे लोकांच्या राज्यांत सर्व प्रजा सुखी होऊन चहूंकडे सोन्याचा धूर निघूं लागला. इतकेंच नव्हें परंतु ह्या सर्वामध्यें दस्थू लोक महा बलवान असल्याकारणानें त्यांचें एकंदर सर्व यवनांवर इतकें वजन बसलें असावें कीं, त्यापैकीं बहुतेक यवन. द्स्यू लोकांबरोबर नेहमीं स्नेहभाव व सरळ अंतःकरणानें वर्तन करीत, त्यामुळें दस्यू लोक हरएक प्रकारें त्यांस मदत करून त्यांच्या परामर्श करीत. यावरून यवन लोकांत द्स्यू लोकांस दोस्त म्हणण्याचा प्रचार पडला असावा व त्याचप्रमाणें बाकी उरलेले यवन आर्यादि लोक द्स्यू लोकांबरोबर मनांतून कृत्निमानें वागत व वेळ आल्याबरोबर त्यांच्याशीं उघड गमजा करीत, तेव्हां द्स्यू लोक त्यांच्या खोडी मोडून त्यांस ताळयावर आणीत असतील, यावरून यवन व आर्य लोकांत दस्यू लोकांस वैरभावानें दुशमन व दुष्ट म्हणण्याचा परिपाठ पडला असावा; कारण दोस्त, दुश्मन आणि दुष्ट या शब्दाच्या अवयवांसहित त्यांच्यांतील भावार्थाचा मेळ द्स्यू शब्दाशीं सर्वांशीं मिळतो. शेवटीं एकंदर सर्व इराणी ( आर्य ), तुर्क वगैरे यवन लोकांस दस्यू लोकांचा बोलबाला सहन होईना, तेव्हां त्यांपैकीं अठरा वर्णांतील अठरा तर्‍हेच्या पगडया घालणार्‍या " अठरा पगड जातीच्या लोकांनीं " सुवर्ण लूट करण्याच्या आशेनें द्स्यू लोकांच्या मुलखांत वारंवार हल्ले करण्याची सुरवात केली. परंतु बळीचे पदरच्या काळभैरव व खंडेरावासारख्या महावीरांनीं त्यांची बिलकुल डाळ मळूं दिली नाहीं. इतक्यांत इराणांतील आर्य लोकांत तिरकमटयाची नवीन युक्ति निघाल्याबरोबर तेथील इराणी क्षेत्न्यांपैकीं बहुतेक वराहासारख्या धाडस दंगलखोरांनीं, अलीकडील छपन्न देशांतील लहानमोठया संपत्तिमान राजेरजवाडयांचा नाश केल्यानंतर नरसिंह आर्य क्षेत्न्यानें दस्यू लोकांचा तरूण राजपुत्न प्रल्हाद याचें कोवळें मन धर्मभ्रष्ट करून, त्याच्या सहाय्यानें त्याच्या पित्याचा कृत्निमानें वध केला. नंतर वामन आर्य क्षेत्न्यनें येथील महाप्रतापी द्स्यूपैकीं बळीराजास रणांगणीं पाडतांच, त्यानें तिसरे दिवशीं बळीचे राजधानींतील एकंदर सर्व अंगनांचे अंगावरील सुवर्णालंकारांची लूट केली, यामुळें द्स्यू लोकांनीं आपल्या देशांतून, आर्य ब्राह्यण लोकांस हांकून देण्याविषयीं पुष्कळ लढाया केल्या; परंतु अखेरीस परशुराम आर्य क्षेत्न्यानें येथील एकंदर सर्व क्षेत्नवासी द्स्तू लोकांवर लागोपाठ एकवीस वेळां स्वार्‍या करून त्यांची शेवटी इतकी वाताहत केली कीं, त्यापैकीं कित्येक महावीरांस त्यांच्या परिवारासह हल्लींच्या चीनदेशाजवळ एक पायमार्ग होता, ( ज्यावर पुढें कांहीं काळानें समुद्र पसरला व ज्यास हल्लीं बेहरिंगची सामुद्रधुनी म्हणतात ) त्या मार्गानें पाताळीं अमेरिकेंतील अरण्यांत जावें लागलें. कारण तेथील कित्येक जुनाट लोकांचा व तेथील द्स्य़ू ( शूद्र ) लोकांचा देवभोळपणा, रीतिभाती, क्रिया वगैरे बर्‍याच अंशीं एकमेकांशीं मिळतात. मूळच्या " अमेरिकन " लोकांत येथल्यासारखीं सूर्यवंशी, राक्षस व आस्तिक कुळें सांपडतात. तेथील मुख्य " काशीक " नांवाशीं येथील " काशीकरांशी " मेळ मिळतो. " कोरीकांचा " शब्द " कांचन " शब्दाशीं मिळतो. ते येथल्यासारखे शकुनापशकून मानीत. त्या लोकांत येथील शूद्रांसारखे मेल्या मनुष्यावर पोषाक घालून प्रताबरोबर सोनें पुरण्याची क्रिया सांपडते. हल्लीं सर्व शूद्र द्रव्यहीन जरी झाले, तथापि ते ( अमेरिकन ) शूद्रासारखें मीठ न घालतां मौल्यवान मसाला घालून पुरीत. त्यांच्यांत येथल्यासारखीं " टोपाजी, माणकू, अर्तिल यल्लपा व अर्तिल बाळप्पा " अशीं नांवें सांपडतात. तेथें " कानडा " नांवाचा प्रांत सांपडतो. परंतु, कांहीं काळानें मागाहून चिनी अथवा आर्य लोकांनीं तेथील लोकांवर स्वार्‍या करून त्यांस हस्तगत केलें असावें; कारण त्यांनीं हिंदुस्थानांतील आर्य लोकांसारखें, अमेरिकेंतील पूर्वीच्या लोकांस " विद्या देण्याची बंदी क्‌रून त्यांचे एकंदर सर्व मानवी अधिकार हरण करून त्यांस अति नीच मानून आपण त्यांचे " भूदेव " होऊन, आकाशांतील ग्रहांसह पांच तत्त्वांची पूजा करीत होते असें आढळतें. असो, परंतु येथें आर्य नाना पेशवे याचे दालीबंद जातबंधू परशु-रामाच्या धुमाळींत, रणांगणीं पडलेल्या प्रमुख महा अरींच्या एकंदर सर्व निराश्रित विधवा स्त्नियांपासून जन्म पावलेल्या अर्भकांचा त्यानें ( परशुरामानें ) सरसकटीनें वध करून द्स्यू लोकांच्या कित्येक कुळांची त्यानें ( परशुरामानें ) सरसकटीनें वध करून द्स्यू लोकांच्या कित्येक कुळांची दाणादाण करून, बाकी उरलेल्या एकंदर सर्व क्षेत्नवासी द्स्यू लोकांचे शूद्र ( दास ) व अतिशूद्र ( अनुदास ) असे दोन वर्ग करून आर्य ब्राह्यणांनीं त्यांस नानाप्रकारचे त्नास देण्याविषयीं अनेक मतलवी व जुलमी " कायदे " केले. त्यांपैकीं कांहीं कांहीं लेखी मुद्दे मनूसारख्या कठोर व पक्षपाती ग्रंथांत सांपडतात. ते असें कीं, " ज्या ठिकाणीं शूद्र लोक राज्य करीत असतील, त्या शहरांत आर्य ब्राह्यणानें मुळींच राहूं नये, शूद्रास ब्राह्यणानें कोणत्याच तर्‍हेचें ज्ञान देऊं नये, इतकेंच नव्हे, परंतु आपला वेदघोष शूद्राचे कानीसुद्धां पडूं देऊं नये. शूद्राबरोबर आर्यांनीं अवशीपहाटेस प्रवास करूं नये. शूद्राचा मुरदा फक्त दक्षिणेकडच्या वेशींतून नेण्य़ाविषयीं परवानगी होती. आर्य ब्राह्यणांच्या मढयास शूद्रास स्पर्श करण्याची मनाई असेराजा भुकेनें व्याकुळ होऊन मेला तरी त्यानें ब्राह्यणापासून कर अथवा शेतसारा घेऊं नये. परंतु राजानें विद्वान ब्राह्यणास वर्षासनें करून द्यावींत. विद्वान ब्राह्यणास ठेवी सांपडल्यास त्यानें एकटयानेंच त्यांचा उपभोग घ्यावा. कारण ब्राह्यण सर्वांचा धनी आहे. परंतु राजास ठेवी सांपडल्यास त्यानें त्यांतील अर्धे द्रव्य ब्राह्यणास द्यावें.