Get it on Google Play
Download on the App Store

आयसी खराब झाल्यावर येणार्‍या समस्या

·         पॉवर एम्पलीफायर

 

·         ऍन्टीना स्विच

 

·         आरएफ प्रोसेसर

 

·         पॉवर आयसी

 

·         सीपीयू

 

·         चार्जिंग  आयसी

 

·         फ्लॅश आयसी (रॉम किंवा ईईपीआरएम)

 

·         ओसीलेटर (व्हीसीओ

 

·         सिम आयसी

 

·         की पॅड आयसी

·         एलसीडी लाइट कंट्रोल आयसी

 

·         ऑडिओ आयसी 


 पॉवर एम्पलीफायर

आपल्या फोनमध्ये हे ट्रान्समिटिंग सिग्नल (टीएक्स) अतिशय महत्वाचे आहे.  ही आयसी एक TX अॅम्प्लाफायर म्हणून काम करते या आयसी ला

बॅटरीपासून थेट व्होल्टेज 3.7 इतके मिळते जेव्हा जेव्हा ही आयसी खराब होते तेव्हा आपण पुढील दोष पाहू शकतो.

·         सिग्नल ड्रॉप

·         नेटवर्क किंवा प्रवेश नाही

·         त्वरीत बॅटरी कमी

·         कॉल नाही (TX योग्यरित्या कार्य करत नाही)

·         फोन गरम होईल


ऍन्टीना स्विच


अँन्टीना स्विच चा उपयोग  900Mhz, 1800Mhz बँड चे सिग्नल फिल्टर करण्यासाठी होतो आणि Rx, TX  ट्रन्स्मिशिंग साठि होतो  म्हणून जेव्हा ही आयसी खराब होते तेव्हा आपण पुढील दोष पाहू शकतो.

·         सिग्नल ड्रॉप

·         कोणतेही नेटवर्क आढळले नाही

·         काही वारंवारता बँड व्यवस्थित काम करत नाही


    आरएफ प्रोसेसर 

आरएफ (रेडिओ फ्रीक्वेंसी) प्रोसेसर आपल्या फोनमध्ये असणारी  महत्वाची आयसी आहे. या आयसीचा वापर RX आणि TX सिग्नलवर प्रक्रिया करण्यासाठी होतो (या आयसी चे काम

मॉड्यूलेशन आणि डिमोडुलेट करणे आहे). काहीवेळा तो कमी फ्रेक्वेन्सी क्लॉक सिग्नल वापरतो ज्यामुळे CPU फंक्शन्स सुरू होतात.

जेव्हा ही आयसी खराब  होते तेव्हा आपण पुढील दोष पाहू शकतो.

·         सिग्नल ड्रॉप

·         नेटवर्क नाही

·         कॉलर ड्रॉप

·         RX किंवा TX किंवा दोन्ही व्यवस्थित कार्य करत नाहीत

·         पटकन बॅटरी रिक्त आणि फोन गरम होईल.


    पॉवर आयसी


पॉवर आयसी पीसीबीमध्ये असणार्‍या सर्व कॉम्पोनेंट आणि आयसी ला  डीसी सप्लाय प्रवाह वितरित करते. व व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करते

त्यामुळे योग्यरित्या फोनला हवा असलेला सप्लाय मिळत असतो ही आयसी जर खराब झाली असेल तर पुढील दोष पाहू शकतो.

 

·         फोन पुर्णपणे बंद असणे

·         त्वरेने रिकामी बॅटरी फोन गरम येईल

·         सिम घाला

·         चार्जिंग प्रोब्लम

·         स्वयं रीस्टार्ट


  सीपीयू


सेंट्रल प्रोसेस युनीट म्हणजे तुमच्या मोबाईल फोनमधील मेंदू आणि कंट्रोलर जे आम्ही दिलेल्या सर्व आज्ञा चे पालन करतो जेव्हा सीपीयू जर खराब झाला असेल तर खालील दोष दिसू शकतात.

·         पुर्णपणे बंद

·         स्वयं रीस्टार्ट

·         आदेश स्वीकारला नाही

·         की पॅड कार्यरत नाही

·         बॅटरी रिक्त आहे

·         फोन गरम होईल

·         फोन अडखळेल


     चार्जिंग  आयसी


ही  आयसी फोनमधील सामान्य आयसी  नाही ही आयसी मोबाइल फोन मध्ये असलेल्या बॅटरी ला चार्ज करते काही मोबाइल मध्ये ही आयसी पॉवर आयसी (यूईएम) मध्ये समविस्ट केलेली असते ही आयसी खराब झाल्या वर  खालील दोष दिसू शकतात

·         चार्जिंग नाही,

·         ऑटो चार्जिंग

·         चार्जर समर्थन देत नाही


  फ्लॅश आयसी (रॉम किंवा ईईपीआरएम)

ही आयसी फ्लॅश किंवा बुटींग माहिती (प्रोग्राम) धारण करते जेव्हा ही आयसी खराब होते त्या वेळेस आपणास खालील दोष दिसू शकतात.

·         बूटिंग दोष. (केवळ स्क्रीन बूट करणे)

·         फोन अडखळेल

·         पटकन बॅटरी रिक्त

·         काही अनुप्रयोग कार्यरत नाहीत (कॅमेरा, MP3, व्हिडिओ Bluetooth ... इ)


       ओसीलेटर (व्हीसीओ)


VCO हे आरएफ सिग्नल जनरेटर आहे. ते डिजिटल कंपोनेंट्स ला चालविण्यासाठी वापरली  जाणारी क्लॉक फ्रिक्वेंसी बनवितात. जेव्हा ही आयसी खराब  असेल आपणास खालील दोष दिसू शकतात

·         सिग्नल फॉल्ट

·         एमर्जन्सि कॉल ओन्ली


      सिम आयसी

या आयसी चा उपयोग सिम कार्ड डेटा नियंत्रित करण्यासाठी केला जाते.ही एक क्रिस्टल आयसी आहे  ही जेव्हा ही आयसी खराब होते आपण पुढील दोष पाहू शकता.

·                  ·    सिम नाही 


      की पॅड आयसी


  ही आयसी की पॅड सर्कीटच्या नियंत्रणासाठी असते ही आयसी खराब झाल्यास आपण पुढील दोष पाहू शकता

 ·    की पॅड ऑर्डर मध्ये कार्य करत नाही

·          ·     की पॅड अडकले

·          ·    ऑटोमॅटिक वर्किंग

   एलसीडी लाइट कंट्रोल आयसी


या आयसीचा वापर कीपॅड आणि एलसीडी लाईट नियंत्रित करण्यासाठी केला जातो. आम्ही या आयसीला क्रिस्टल आणि सामान्य प्रकारात पाहू शकतो. ही आयसी खराब झालेली असेल तर आपण पुढील दोष पाहू शकता

·         ·    की पॅड लाइट्स कार्य करत नाहीत

·          ·     एलसीडी लाइट्स काम करत नाहीत

·          ·       व्हाईट डिस्प्ले


 ऑडिओ आयसी 


ही आयसी आपल्या फोन मध्ये आवाजाला अम्ल्प्यफाय करते ही आयसी खराब झालेली असेल तर आपण पुढील दोष पाहू शकता.

·         रिंगर मध्ये आवाज नाही.

·         MP3. विडियो मध्ये आवाज नाही.

·         रिंगटोन मध्ये आवाज नाही.


टीप:  वरील समस्यांवर उपाय सर्वप्रथम ज्या विभागाचा दोष असले॰ त्या विभागाला कूल टेस्टिंग व हॉट टेस्टिंग ने तपासून घ्या जर कुठली ट्रॅक मिस असेल तर जंपर करून ती ट्रॅक बनवा. एखादी कॉम्पोनेंट निकामी झाला असेल तर त्या जागी नवीन कॉम्पोनेंट लावा. आयसी खबर असेल तर आयसी चेंज करावी.