डिजिटल मल्टिमिटरने मोबाईलफोनचे भाग कसे तपासायचे ?
रिंगर: एखाद्या मोबाईल
फोनचा रिंगर खराब आहे किंवा नाही
हे तपासन्यासाठी
मल्टिमिटरला बीपमोडमध्ये ठेवा आणि रिंगर तपासा मूल्य 8 ते 10 ओहम दरम्यान
असणे आवश्यक आहे. मूल्य या श्रेणी दरम्यान असेल तर रिंगर चांगला आहे आणि
बदलण्याची आवश्यकता नाही. जर मल्टिमीटर्स चे मूल्य 4-5 किंवा 12-14 असेल तर रिंगर बदला.
व्हायब्ररेटर: बीप मोडमध्ये मल्टीमीटर ठेवा आणि
व्हायब्रेटर तपासा, रेडिंग 8 ते 16 ओहम असणे
आवश्यक आहे. जर रेडिंग 8 ते 16 ओहाच्या दरम्यान असेल तर वायब्रर चांगला आहे. जर
कुठलेही रेडिंग दाखवत नसेल तर व्हायब्ररेटर तो ओपेन किवा खराब झाला आहे.
मायक्रोफोन
किंवा माइक: बीप मोडमध्ये मल्टीमीटर ठेवा आणि
मायक्रोफोन तपासा. मल्टि मीटरवर 600 ते 1800 ओहम च्या श्रेणीत असणे आवश्यक आहे.
टीप: मायक्रोफोनच्या फक्त एक बाजू रेडिंग दर्शवेल जर कुठलेही रेडिंग दाखवत नसेल तर तो माइक
ओपेन किवा खराब झाला आहे.
रेजिस्टर: रेजिस्टर
हे चेक करण्याकरिता मल्टीमीटर वर
ओहम ची रेंग निवडा व रेजिस्टर च्या मूल्य प्रमाणे सेट करून चेक
करा जर योग्य ते रेडिंग मिळत असेल तर रेजिस्टर ओके आहे व कुठेले हे
रेडिंग मिळत नसेल तर रेजिस्टर ओपेन आहे त्याचा जागी योग्य मूल्य चा नवीन रेजिस्टर
लावा.
कॅपेसिटर: कॅपेसिटर बीपमोडवर चेक करताना कॅपेसिटर जर ओके असेल तर मल्टिमीटर कोणतेही बीप देणार नाही जर कॅपेसिटर
हे बीप देत
असेल तर ते शॉर्ट आहे त्याचा जागी नवीन कॅपेसिटर
लावा.
एलईडी: बीप मोडमध्ये
एलईडी ला चेक
करते वेळी एलईडी प्रकाशमय होईल तर एलईडी ओके आहे नाही तर नवीन एलईडी लावावी
बूस्ट कॉइल: मोबाइल फोन च्या
डिसप्ले लाइट विभागात लागलेला अत्यंत महत्ववाचा असा पार्ट आहे हा खराब झाला असेल
तर मोबाइल च्या डिसप्ले वर कुठे ही लाइट लागणार नाही याला चेक करते वेळी
मल्टिमीटरला 200 Ω सेट करा जर बूस्ट कॉइल 0.2 ते 4 Ω च्या
दरम्यान रेडिंग देत असेल तर ओके आहे नाही तर त्याचा जागी नवीन बूस्ट कॉइल लावा.
बॅटरी: बॅटरीला चेक करते वेळी मल्टीमीटर
20v डीसी वर मल्टीमीटर ठेवा आणि
रेडिंग 3.7v डीसी किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असणे आवश्यक
आहे जर रेडिंग कमी मिळत असेल किवा काहीच रेडिंग मिळत नसेल तर बॅटरी ला बॅटरी बूस्टर च्या मदतीने बूस्ट करा बॅटरी
बूस्टर ला 12v वर सेट करून थोड्या थोड्या वेळाने + वर + आणि – वर – प्रोब ठेवून 5 ते 10 सेकंड बूस्ट करा बूस्ट केल्यावर ही जर बॅटरी
कार्य करत नसेल तर नवीन बॅटरी लावा.