पहिले अॅन्ड्रॉइड फोन
जगातील पहिले अॅन्ड्रॉइड फोन HTC या कंपनी ने 22 ऑक्टोबर 2008 रोजी लाँच केले. व त्याला HTC ड्रीम असे नाव
दिले जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
मध्ये टी-मोबाइल G1 म्हणून देखील ओळखले जाते. 23 सप्टेंबर
2008 रोजी HTC ड्रीम घोषणा करण्यात आली, त्यास टी-मोबाइलने 20 ऑक्टोबर 2008 रोजी अमेरिकेत टी-मोबाइल जी 1 म्हणून
प्रदर्शित केले. या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टम Android 1.6
आणि 192 एमबी रॅम, 256 एमबी रॉम आणि 16 जीबी बाह्य स्टोरेज
(मायक्रो एसडी) पर्यंत होते. HTC ड्रीम 1150 एमएएच
लिथियम-आयन बॅटरी आणि 528 MHz Qualcomm MSM7201A ARM11 प्रोसेसर द्वारे समर्थित होते. त्या मध्ये 3.15 मेगापिक्सेलचा रिअर
कॅमेरा ऑटो-फोकस होता. डिव्हाइसमध्ये 3.2 इंच कॅपेसिटिव टचस्क्रीन वापरले गेले.