Android app on Google Play

 

प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी

 

स्टिफन विमानातील काचेतून बाहेर डोकावतो तेव्हा त्याला आकाशातून भारताच्या पवित्र भूमीचं दर्शन होतं. तो सतत बाहेरच पाहत असतो. हळूहळू पृथ्वी आणि विमान यांच्यातील अंतर कमी होतं आणि स्टिफन मुंबईला पोहोचतो. हॉटेल ताजमध्ये त्याच्या राहण्याची व्यवस्था होते. आपल्या रुममध्ये पोहोचल्यावर तो तिथल्या हाऊसकिपरला सहजच विचारतो,

स्टिफन, "Do you know Abhijeet?"

हाऊसकिपर, "Which Abhijeet Sir.?"

स्टिफन, "Abhijeet from Badmash Group"

हाऊसकिपर, "Oh… Abhijeet..? He was a Great Singer. That Group rocks the India. But since 5- 6 years nobody is having any information about that Group."

स्टिफन, "Ok. That's enough for me."

हाऊसकिपर गेल्यानंतर स्टिफन आपला लॅपटॉप उघडतो आणि प्रसाद, अजय, सागर, शरद, वृषाली, सुवर्णा ह्या सर्वांची माहिती इंटरनेटच्या माध्यमाने मिळविण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात तो सागर पासून करतो आणि त्याला कळतं की, सागर नाशिक येथे राहतो. गंमत म्हणजे तीन वर्षांपूर्वी सागरने स्टिफनला फेसबूकवर मैत्रीसाठी रिक्वेस्ट पाठविली होती. स्टिफनने ती स्विकारली देखील होती. म्हणूनच तो सागरपासून सुरुवात करतो. तो सागरला फेसबूकवर मेसेज करतो, I arrived in India. Right now I am in Maharashtra. Nobody knows me here. Can you help me?  'मी भारतात आलेलो आहे. सध्या महाराष्ट्रात आहे. इथे कोणीही माझ्या परिचयाचा नाही. तू मला काही मदत करु शकशील का?'

आता सागर त्यांना उत्तर देईल का? हा प्रश्न त्याच्या मनात येतो. भारतातील व्यक्ती फेसबूकवर सतत असतात का? तो खरंच सकारात्मक प्रतिसाद देईल का? त्याचे डोळे लॅपटॉपच्या स्क्रिनवरुन हटत नाही. दोन मिनिटांत सागरकडून मेसेज येतो, Sir, The great person like you send me a messge. This is very big thing for me. Now where are you Sir? I would like to help you. 'तुमच्यासारख्या व्यक्तीने मला मेसेज पाठवणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण सध्या कुठे आहात सर? मला आपली मदत करायला नक्कीच आवडेल.'

स्टिफन आपल्या लॅपटॉपवर गुगलची विंडो लगेचच ओपन करतो आणि Famous Spots near Nashik नावाने शोध घेतो. पंचवटी, त्रंबकेश्वर, वणी, शिर्डी अशी नावं त्याच्या समोर येतात. तो सागरला मेसेजवर सांगतो, Now I am in Mumbai. Living in Hotel Taj. I want to go Nashik. I already heard about Panchvati, Trambakeshwar, Vani, Shirdi. I would like to go there. 'आत्ता मी मुंबईला आलो आहे. हॉटेल ताजमध्ये आहे. मला महाराष्ट्रातील नाशिक ह्या ठिकाणी जायचंय. तिथे असलेल्या पंचवटी, त्रंबकेश्वर, वणी, शिर्डी ठिकाणांबाबत खूप काही ऐकून होतो. त्या ठिकाणी जायला मला नक्की आवडेल.'

सागर, Sir, very well. I am also from Nashik. I feel grateful to help you for visiting all these platonic places. 'हे तर उत्तमच झालं सर. मी स्वतः नाशिकमध्ये राहतो. आपल्यासारख्या व्यक्तीला अशा पवित्र ठिकाणी घेऊन जायला मला नक्की आवडेल.'

स्टिफन, Well, then how can I reached Nashik. "छान. मग मी नाशिकला कसा येऊ?'

सागर, Sir, if you have informed me about your tour then I maybe cancelled todays organized seminar and immediately would have reached Mumbai to meet you. Sir, can I come to meet you after two days later? In between you can see most famous places of Mumbai city and you will like that places also. You visit Mahalaxmi, Haji Ali, Siddhivinayak temple, Mumbadevi, Mount Merry and other important places. 'सर जर मला आपल्या ह्या दौऱ्याची कल्पना असती तर मी आजचा सेमिनार सोडून तातडीने मुंबईला भेटायला आलो असतो. मी दोन दिवसांनी आपल्याला घ्यायला आलो तर चालेल का सर? दोन दिवस राहून आपल्याला मुंबईतील काही प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील आणि आपल्याला ते नक्कीच आवडतील. तुम्ही महालक्ष्मी, हाजीअली, सिध्दीविनायक मंदिर, मुंबादेवी, माऊंट मेरी आणि इतर महत्त्वाच्या अशा ठिकाणी तोपर्यंत भेट देऊ शकता सर.'

स्टिफन, I will visit that places in next time. Now I am in hurry. After four days I must returned to Australia. You do one thing, please send your residential address by message. I will come tomorrow morning at your home. 'पुढच्या वेळेला येईन तेव्हा नक्कीच फिरेन. पण मी सध्या घाईत आहे. चार दिवसांनी मला परत ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. एक काम कर, तू तुझ्या घरचा पत्ता मला मेसेज कर. मी उद्या सकाळपर्यंत तुझ्या घरी येईन.'

सागर, I  am very  happy  that  a  great  person  like you  coming  to  my  home  to  meet  me. 'तुमच्यासारखी महान व्यक्ती माझ्या घरी येणार आहे यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असणार सर.'

सागर त्याच्या घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक स्टिफनला मेसेज करतो. स्टिफन हाऊसकिपरला बोलावतो आणि नाशिकबद्दल विचारतो. तेथे जायला किती वेळ लागतो? कसं जाता येईल? हाऊसकिपर हुशार असतो. तो स्टिफनला योग्य ती माहिती देतो आणि नाशिकला जाण्यासाठी एका खासगी गाडीची व्यवस्था करतो. आपल्या विश्वासातला ड्रायव्हर तो स्टिफनसाठी बोलावतो. सोबतच सुरक्षेसाठी तो आपला मोबाईल क्रमांक सुध्दा देतो.

जराशीही विश्रांती न करता स्टिफन नाशिकला रवाना होतो. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले असतात. आभाळ भरुन येत होतं, मात्र पाऊस पडत नव्हता. इथे सी-लिंक सुध्दा आहे आणि कसाऱ्याचा घाट सुध्दा. म्हणून तर विविधता असून देखील हा भारत एक आहे. नाशिकला पोहोचेपर्यंत त्याच्या मनात भारताबद्दल असे असंख्य सकारात्मक विचार येत असतात.

ड्रायव्हर, Sir, the distance of Nashik is only half hour. "सर, नाशिक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे."

स्टिफनच्या अंगावर शहारे येतात. एक वेगळीच उर्जा त्याच्या शरीरात संचारते आणि कोणताही विचार न करता तो सागरला फोन करतो,

स्टिफन, Good afternoon, Sagar. I am Steafen. "गुड आफ्टरनून सागर. मी स्टिफन."

सागर, Yes sir, tell me. "हो सर. बोला."

स्टिफन, Sagar, now I am in a range of half hours distance. Where can I stop. "सागर, मी नाशिकपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मी कुठे थांबायला हवं."

सागर, Sir, are you by train or bus? "सर तुम्ही कसे येताय रेल्वेने कि बसने?"

स्टिफन, I am coming by private vehicle. "मी खासगी वाहनातून येतोय."

सागर, Ok Sir, you do one thing. You stop on highway near S.T.Bus Stand. I will come there to receive you. "हो सर, तुम्ही एक काम करा. महामार्गाच्या एस.टी.स्टॅंडजवळ येऊन तिथे गाडी थांबवायला सांगा. मी तुम्हाला घ्यायला येईन तिथे."

स्टिफन, But what about your organized seminar! "परंतु तुझ्या नियोजित सेमिनारच काय !"

सागर, It's ok Sir, still there is one hour to start the seminar. "हो सर. त्याला अजून एक तास बाकी आहे."

स्टिफन, No, it is wrong. You do one thing. "नाही. हे चूकीचं आहे. एक काम कर. (ड्रायव्हरकडे वळून) Take the car beside this road. 'गाडी रस्त्याच्या बाजूला घे' (ड्रायव्हर गाडी रस्त्याच्या बाजूला घेतो) Sagar please tell the driver how & where to take the car. 'सागर, माझ्या ड्रायव्हरला सांग गाडी कुठे न्यायची ते.'

सागर, "हो सर."

स्टिफन त्याच्या ड्रायव्हरला फोन देतो. "हा साहाब बोलिये"

ड्रायव्हर गाडी सुरु करतो. स्टिफन पाठीमागे बसून खिडकीबाहेर बघत विचारांमध्ये गुंतलेला असतो. ड्रायव्हर त्याला काय म्हणाला हे त्याच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. थोड्याच वेळात ते सागरने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतात.

ड्रायव्हर, "साहब, उसने कहा था, उसी पतेपर आए है हम ।"

स्टिफन पुन्हा एकदा फोन लावतो,

Sagar, I reached. Car is parked outside of your hall.  "सागर, मी पोहोचलो. गाडी हॉलच्या बाहेरच पार्क केली आहे." सागर सेमिनारच्या तयारीत असल्याने त्याने त्याचा फोन त्याच्या पत्नीकडे दिलेला असतो.

Sir, he is busy in arranging seminar. I am his wife. Please park your car inside the compound. I am standing near main door of hall. "सर ते सेमिनारची तयारी करताहेत. मी त्यांची पत्नी बोलतेय. गाडी कंपाऊंडच्या आत पार्क करा. मी हॉलच्या मुख्य दरवाज्याजवळ उभी आहे. "

गाडी गेटमधून आत आत जाते. समोर 25-26 व्यक्तींचा घोळका जमलेला असतो. त्यांपैकी एका स्त्रीच्या हातात बूके असतात. स्टिफन गाडीतून बाहेर येतो आणि आपल्या डोळ्यावर चश्मा लावतो. सगळे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. हातात बूके घेऊन उभी असलेली स्त्री पुढे येते आणि स्टिफनला बूके देत म्हणते,

Sir, Welcome in Nashik. "नाशिकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर."

I think I saw you somewhere, your introduction? "तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आपला परिचय?"

I am Vrushali Bhosale. Sagar's wife. "मी वृषाली भोसले. सागरची पत्नी."

स्टिफनचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो फक्त सागरला भेटायला आला होता आणि त्याला वृषाली सुध्दा भेटली. तो आनंदाने तिला आलिंगन देतो. तीला हे जरा विचित्रच वाटतं. पण मोठी व्यक्ती म्हणून ती काही बोलत नाही. स्टिफनसह सगळे हॉलमध्ये जातात.

सागर काम करीत असलेल्या मॅनेजमेंटमधील काही व्यक्तींसोबत स्टिफन पहिल्या रांगेत बसतो. काही हौशी व्यक्ती लांबून तर काही जवळ येऊन त्याचा फोटो काढतात. मध्येच कोणीतरी त्याच्यासाठी सॉफ्ट ड्रिंक घेऊन येतं. पण इंग्रजी पक्क नसल्याने कोणीही त्यांच्याशी काही बोलत नाही. फक्त नजरेला नजर भिडली की एकमेकांना स्मितहास्य देत. स्टिफनदेखील गोंधळला होता. नजर फिरवून त्याने पाहिलं तेव्हा त्याला कळलं की, व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. गडद निळा शर्ट, काळा कोट, लाल-निळ्या ठिपक्यांची टाय बांधलेला, जाड भिंगाचा चश्मा लावलेला सागर समोरुन चालत येतो. त्याला बघताक्षणी स्टिफन उठून उभा राहतो. थोडाफार पूर्वीच्या चेहऱ्यातील बदल बाजूला केला तर, अजयच्या कॅमेऱ्याने फोटोमध्ये उतरलेला सागर त्याच्यासमोर उभा होता. सागर स्वागतासाठी हात पुढे करतो तर स्टिफन त्याला सुध्दा मिठी मारतो. वृषालीला हा प्रकार जरा विचित्रच वाटतो. 'मी सुंदर आहे म्हणून ठिक आहे. माझ्या पतीला आलिंगन द्यायची गरजच काय या गोऱ्याला?'

सागर, Sir, there is some problem. Todays seminar is organized in Marathi language, I can speak in English language but so many peoples are from rural areas. They will not able to understand English properly. Can you… "सर, जरा प्रॉब्लेम आहे. आजचा सेमिनार मी मराठी भाषेत ठेवला आहे. आपण आलात म्हणून इंग्रजी भाषेचा वापर केला असता. पण इथले भरपूर तरुण ग्रामीण विभागातले आहे. त्यांचा इंग्रजी भाषेचा जरा प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजू..."

स्टिफन त्याला अडवत, No… No my friend. You speak in Marathi. I have no objection. I can understand Marathi very well. You don't worry and best of luck for your success. "नो... नो माय फ्रेंड. तू मराठीतच बोल. मला काही हरकत नाही. मी समजू शकतो. काळजी करु नकोस. तुझ्या कामगिरीला माझ्या शुभेच्छा."

सागरला जरा धीर मिळतो. स्टिफनचे आभार मानून तो स्टेजवर जाऊन सगळ्यांचं स्वागत करतो. स्टिफनचा सत्कार करुन मग तो आपल्या सेमिनारची सुरुवात करतो.

"नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत 'गुगल' नावाच्या प्रख्यात संकेतस्थळाशी प्रत्यक्ष संबंधीत अशी खूप मोठी व्यक्ती उपस्थित आहे. खरंतर हे एक उदाहरण आहे यशस्वीतेचं. अशा आणखी काही व्यक्तींबाबत मी आपल्याला सांगू इच्छितो.

बिल गेट्स: हार्वर्ड युनिवर्सिटीमधला ड्रॉप आऊट. मायक्रोसॉफ्टची स्थापना.

लेरी अलीसन: युनिवर्सीटी ऑफ इलिनॉय आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागोमधला ड्रॉप आउट, ओरॅकलची स्थापना.

स्टीव जॉब्ज: रीड कॉलेजमधून ड्रॉप आऊट. अॅपलची स्थापना.

मार्क झुकेरबर्ग: हार्वर्डमधून ड्रॉप आऊट. फेसबूकची स्थापना.

जेरी यांग आणि डेव्हिड फिलो: दोघेही स्टॅनफोर्डमध्ये पी.एच्.डी. करत होते. शिक्षण अर्ध्यावर  सोडून याहूची स्थापना.

सर्जी ब्रिन आणि ल्यारी पेग: स्टॅनफोर्डमध्ये पी.एच्.डी. करत होते. शिक्षण अर्ध्यावर सोडून गुगलची स्थापना.

या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत. त्यातील काही जणांकडे डिग्री आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिद्धीझोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे. आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होत आहे. हे कसं शक्य झालं? शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसं जमलं?

मित्रांनो, आपल्या समाजात पहिल्यापासूनच शिक्षणाला महत्व आहे. शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस, विशेषतः मराठी स्त्रीया नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. ही खरं तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्री मिळविणे आणि डिग्रीची सर्टिफिकेट्स गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असे वाटते. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानांपेक्षा डिग्रीला नको इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्री तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्री तो कमी हुशार असे समिकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी माणूस अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्ये अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्रीची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.

एखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे दहावी किंवा बारावीचे सर्टिफिकेट्स नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवी. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कुठलीही सर्टिफिकेट्स असल्याचे अजूनपर्यंत आढळून आलेले नाही. पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली 'ज्ञानेश्वरी', तुकारामांची 'गाथा', रामदास स्वामींचे 'दासबोध व मनाचे 'लोक' ही ग्रंथे गेली शेकडो वर्षे प्रसिध्द असून, आजही पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत. अजूनही हे ग्रंथ मराठीतील 'बेस्ट सेलर' या कॅटेगरीतले आहेत. हे कशाचं प्रतिक आहे?

फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमानपत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन जगातला मोठा व नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटूंबात जन्मलेला हेन्री फोर्ड नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनू शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटार कंपनी ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. साईचीरो होंडा हा जपानमधला एका गॅरेजमध्ये काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला. त्याने स्थापन केलेली होंडा मोटार कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. इंजिनिअरींगच्या क्षेत्रात या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनिअरींगची कुठलीही डिग्री, डिप्लोमा किंवा कोणतेही सर्टिफिकेट नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टिफिकेट नाही म्हणून एडिसन शेवटपर्यत वृत्तपत्र विकत बसला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते. आणि नोकरी करुन निवृत्त झाले असते.

भारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिकपर्यंत शिकलेला धिरुभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया  घातला,  तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट शिवाय. प्रसाद नावाचा माझा एक जूना मित्र होता. त्याने असं म्हटलं आहे की डिग्री म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही काही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परिक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरुवात शाळा कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.

शिक्षणाच्या क्षेत्रात मागे पडलेल्या या लोकांनी अपरंपार धनसंपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली. त्यातील कित्येक जण तर तुमच्या-माझ्यासारख्या गरीब मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कुठल्याही तऱ्हेची कौटूंबिक पाश्र्वभुमी नव्हती. आर्थिक परिस्थिती पण कधीच सक्षम नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले? त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून? त्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्च व अनूकुल होते म्हणून? का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून? नाही मित्रांनो, त्यांचा स्वतःवर विश्वास होता. आपल्या कर्तृत्वावर, आपल्या गुणवत्तेवर त्यांचा विश्वास होता. आणि आमच्या कंपनीला पूर्ण खात्री आहे की, तुमच्यात ती क्षमता आहे. तुम्ही आमच्या संस्थेमध्ये सामील होऊन नक्कीच तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यामध्ये चांगला  बदल घडवू शकता."

स्टिफन आपल्या जागेवर बसून सागरचे ते शब्द ऐकत असतो. सागरचं बोलून झाल्यावर तो स्टिफनला स्टेजवर आमंत्रित करतो आणि उपस्थितांना दोन शब्द मार्गदर्शन करावयास सांगतो. स्टिफन माईक हातात घेतो. वृषाली स्टेजच्या पाठीमागे उभी असते. ती सागरला इशाऱ्याने हळू आवाजात बोलावते. सागर तिच्याजवळ जातो तेव्हा,

वृषाली, "त्या गोऱ्याला कशाला माईक दिलात तुम्ही?"

सागर, "आपलाच फायदा आहे यात. तो काय बोलतो हे समोरच्यांना कळणार नाही आणि समोरचे काय प्रश्न विचारताय हे त्यांना कळणार नाही. जेव्हा वाटेल तेव्हा मी त्यांच्याकडून माईक परत घेईन. तू काळजी करु नकोस. बॉसला बोललोय. त्या गोऱ्याला स्टेजवर घेण्याचे ५,००० रूपये जास्त घेईन म्हणून."

वृषाली सागरशी सहमत होते आणि सागर पुन्हा स्टेजवर जातो. स्टिफन त्याच्या इंग्रजीमध्ये काय बोलतोय हे बहुतेकांना कळत नव्हते. तरीही तो बोलतच असतो. सागर आणि त्याच्या वरिष्ठांनाच कळतं की तो सागरच्या वक्तृत्वाबद्दल बोलतोय. त्यांचचं बोलून झाल्यानंतर सागर उपस्थितांना विचारतो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारु शकता. टेक्नॉलॉजीबाबत काहीमुलं त्याला इंग्रजीमध्ये अनेक प्रश्न विचारतात. स्टिफनदेखील तत्काळ त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची समर्पक उत्तरे देतो. शेवटी एक जिज्ञासू मुलगा विचारतो,

Sir there is so much competition in Yahoo, Facebook and Google, then what is your target or new ideas or planning to face this competition. Please explain in detail in our language.  "तुमच्या गुगलला स्पर्धा द्यायला याहू, फेसबूक यांसारखे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. मग स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण कोणती नवीन कल्पना, योजना आखली आहे हे आम्हाला कळेल अशा शब्दांत सांगितलं तर बरं होईल." सागरला घाम फुटतो, सर्वांना प्रश्न पडतो, स्टिफन आता नक्की काय बोलेल? हा अपमान तो सहन करेल का? पण जेव्हा स्टिव्ह तोंड उघडतो तेव्हा चमत्कार होतो.

स्टिफन, "नक्कीच. मी तुझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचीच वाट पाहत होतो."

सागरला अजून एक धक्का बसतो. स्टिफन चक्क मराठीत बोलत होता. सभागृहात उपस्थित वृषालीसह इतर सर्वजण चकित होतात. स्टिफन पुढे म्हणतो, "छान प्रश्न विचारलात! जगात कोणत्याही गोष्टीला प्रतिस्पर्धी नसेल तर त्या गोष्टीची मजाच येत नाही. त्याप्रमाणे आम्हालाही प्रतिस्पर्धी आहे, असायलाच हवा. त्यामुळे आपली आपल्या चाहत्यांना कशाप्रकारे उत्तम व सुलभरित्या सेवा देता येईल, मार्केटमध्ये नावारूपाला राहता येईल याबाबत मोठ्या कुशलतेने हाताळणी केली जाते. जो स्पर्धक ही गोष्ट ध्यानात घेतो तो चाहत्यांची आवड म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे आमच्या कंपनीवर असलेल्या चाहत्यांची संख्या कमी न होता उलट वाढतच आहे याचा अर्थ इतरांची संख्या कमी झाली असे मला म्हणायचे नाही. चाहते सर्व बाबींचा अभ्यास करीत असतात.

उदाहरणच द्यायचे तर हल्ली आपलं आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे ऑफिसमध्ये एक कॉम्प्युटर, दुसराघरी किंवा मग लॅपटॉप, एखादा स्मार्टफोन. आणि या प्रत्येकावर एक खजिना आपण साठवलेला असतो. आणि मग यातील एखादी गोष्ट दुसऱ्यावर कॉपी करायची असेल, तर मग हजार कटकटी. घरी काम करायला बसावं आणि लक्षात येतं, ज्या फाईलवर काम करायचं ती तर इथे स्टोअर केलेलीच नाही. किंवा मग आपल्याला जी फाईल एका डिव्हाइसवरुन दुसरीकडे कॉपी करायची आहे ती खूपच मोठी आहे. या सगळ्यांवर  गुगलने एक सोल्युशन काढलं आहे, ज्याला आपण 'क्लाऊड कॉम्युटिंग' म्हणू शकतो. म्हणजे आपल्या सगळ्या फाईल्स इंटरनेटवर सेव्ह करायच्या आणि आपल्याला हव्या तेव्हा अॅक्सेस करुन आपण त्या परत ठेवू शकतो.

'गुगल डिव्हाईस अॅप्लिकेशन' डाउनलोड केल्यावर तुमच्या कॉम्प्युटरवर एक फोल्डर तयार होईल. इथे तुम्हाला ज्या फाईल्स ड्राइव्हवर सेव्ह करायच्या आहेत त्या ड्रॅग करा. या फोल्डरवर तुम्ही जे काही साठवलं ते तुमच्या हार्ड डिस्कवरही राहील आणि क्लाऊडवरही सेव्ह होईल. या फाईल्स तुम्हाला मग अगदी तुमच्या मोबाईलवरुनही अॅक्सेस करता येईल. या ड्राइव्हवर पाच जीबीचं स्टोअरेज फ्री मिळेल. आणि जास्त स्पेस विकतही घेता येईल. हा ड्राइव्ह तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, एन्ड्रॉइड फोन, टॅबलेट कशावरही इन्स्टॉल करु शकता.

आता तुम्ही या सेव्ह केलेल्या फाईल्समध्ये बदल केलात तर तो फक्त एका ठिकाणी न होता प्रत्येक ठिकाणी होईल.याशिवाय गुगलचे 'गुगल डॉक्स' देखील आता या 'गुगल ड्राईव्ह' मध्ये आहेत. शिवाय ही नवी सेवा गुगल ने 'गुगल प्लस'ला देखील जोडलेली आहे. क्लाऊड कंप्युटिंगची सेवा देणाऱ्या सध्या अनेक वेबसाईट्स आहेत. 'ड्रॉप बॉक्स' सारखी सेवा तर खूप आधीपासूनच आहे. पण या सगळ्यांच्या तुलनेत गुगलचे विकत घ्यायचे दरसुध्दा सर्वात स्वस्त आहेत. हा 'गुगल ड्राईव्ह' वापरायला सोपा आहे आणि आता क्लाऊड कंप्युटिंग हेच भविष्य असणार आहे. म्हणून माहिती स्टोअर करण्याचा हा नवा पर्याय आम्ही लवकरात लवकर आपल्या सेवेत आणत आहोत."

डोळ्याची पापणी न हलवता दोन्ही ओठांमध्ये दोन सेंटिमीटरचं अंतर ठेवून 'आ' करुन सगळे शांतपणे बसलेले असतात. जणू काही पुतळेच आहेत. सागरच्या बाबतीत वेगळं सांगायला नको. स्टिफन सर्वांकडे बघतो आणि परिस्थितीचा अंदाज आल्याने तो स्वतः टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा काय सगळे शुध्दीवर येतात. मग सगळे उभे राहून टाळ्या वाजवू लागतात.

स्टिफन फक्त 'थॅंक्स' म्हणतो. कार्यक्रम संपल्यावर सागर आणि वृषाली स्टिफनच्या गाडीमध्ये बसून त्यांच्या घरी ओझर येथे जातात. सागरच्या घरी पोहोचल्यावर वृषाली स्टिफनने आणलेलं सामान घरात नेते. सागर आणि स्टिफन दोघेही फ्रेश होऊन समोरच्या हॉलमध्ये बसतात.

सागर, "सर, मला माहित नव्हतं, आपल्याला इतकी चांगली मराठी येते."

स्टिफन, "आमच्या ऑस्ट्रेलियामध्ये महाराष्ट्रातून खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती आल्या आहेत. त्यांच्याच सहवासात राहून मला मराठी भाषा चांगल्याप्रकारे शिकता आली."

सागर, "भारतात कसं येणं केलं?"

स्टिफन, "काहीतरी ठरवलं होतं. ते पूर्ण व्हावं हीच इच्छा आहे."

सागर, "आपण इतक्या पवित्र ठिकाणी आला आहात. नक्कीच तुमचं काम पूर्ण होईल. भारतामध्ये महाराष्ट्रात नाशिकला खूप वैभवशाली इतिहास आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात प्रभु श्री रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग इथे त्रंबकेश्वरला आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेलं सप्तश्रुंगी मातेचं मंदिर येथे जवळच आहे. त्यामुळे नाशिक हे भारतीय भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे. अलीकडच्या काळातही तात्या टोपे, स्वातंत्रवीर सावरकर, अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे देशाला भेट देणारी ही भूमी. इथे पंचवटीला दहा मिनिटे उभं राहिलो तर काशीला गेल्यासारखा भास होतो."

स्टिफन, "अरे वा...! पहिल्यांदाच भारतात येऊन इतक्या पवित्र ठिकाणी थांबलोय याचा आनंद होतोय मला."

वृषाली घरचं काम आवरुन येते आणि स्टिफनला विचारते,

"सर तुम्ही नॉनव्हेज खाणार का?"

स्टिफन, "का? काय झालं?"

वृषाली, "नाही, म्हणजे आता जेवण बनवायला घेतेय. तुम्हाला काय आवडतं ते विचारायचं होतं."

स्टिफन, "मला काहीही चालेल."

वृषाली, "पण सर तुम्ही सांगाल तर तुमच्या आवडीचं जेवण बनवता येईल."

स्टिफन, "डियर ऑस्ट्रेलियामध्ये जे बनतं ते मी तिथे खातो. भारतात आल्यावर भारतातलंच खाणार ना! दुसऱ्या प्रदेशात जाऊन आपल्याच प्रदेशातलं खाल्लं तर आपल्याला त्यांची संस्कृती कशी कळणार?"

वृषाली, "मग ठिक आहे सर, मी जे बनवेन ते तुम्हाला खावं लागेल."

स्टिफन स्मितहास्य करतो. वृषाली निघून जाते. कोणीही नसल्याने सागर कामाचं बोलतो.

सागर, "सर, तुमच्याकडे काही वॅकेन्सी आहे का?"

स्टिफन, "कसली?"

सागर, "कोणतीही चालेल. परदेशात जाऊन काम करण्याची मजाच वेगळी असते."

स्टिफन, "सध्या तरी नाही. आणि नोकरी करायची असेल तर इंटरव्युह घेण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. तिथे माझ्यापेक्षा सुध्दा एक सिनियर आहे."

सागर, "अच्छा. काही हरकत नाही. मी आपलं सहजच विचारलं होतं. (थोडा थांबून) पण सर जेव्हा जागा निघतील तेव्हा मला नक्की सांगाल."

स्टिफन, "हो. नक्कीच सांगेन. (स्टिफन सुध्दा थोडावेळ थांबतो) तुझ्याबद्दल, वृषालीबद्दल काही सांग."

सागर, "सर आम्ही दोघे एकाच कंपनीमध्ये काम करत होतो. बॉससोबत भांडण करुन वृषाली नोकरी सोडून गेली. पण तोपर्यंत आमचं प्रेम जुळलं होतं. नंतर तिने तिच्या मित्रांसोबत स्टेज शो करणं सुरु केलं. खूप लांब लांब दौरे होत होते तीचे. सगळं तीच सांभाळायची. मी माझ्या कंपनीमध्ये नोकरीवर खूश होतो. कधी कधी तिच्या मित्रांना सल्ला द्यायला जायचो. तिच्या मित्रांसोबच चांगलंच ट्युनिंग जूळलं होतं माझं. नंतर माझी ट्रान्सफर इथे नाशिकला झाली. आम्ही दोघे जवळजवळ सहा-सात महिने भेटलोच नाही. फक्त फोनवरच बोलत असायचो. शेवटी काय? तिचा तो ग्रुप जास्त काळ टिकला नाही. त्यांच्यात सतत वाद होत होते. मी इथे सेटल झालो होतो म्हणून तिच्या आणि माझ्या घरातल्यांनी आमचं लग्न करायचं ठरवलं. ग्रुपमधली भांडणं वाढल्याने तिने तो ग्रुप सोडला आणि माझ्यासोबत लग्न करुन ती इथे राहू लागली. पुढे मग...."

स्टिफन, "ग्रुपबद्दल अजून काही सांगू शकतोस?"

सागर, "तेवढं आठवत नाही. काहीतरी बदमाश ग्रुप म्हणून नाव होतं त्या ग्रुपचं. तीन मुली आणि पाच मुलांचा ग्रुप होता तो. बस्स."

वृषाली, "चला आता जेवणाचं झालंय."

स्टिफन सोफ्यावरुन उठत सागरला विचारतो, "वृषाली काही सांगू शकेल का मला?"

सागर, "सांगेल ना ती. त्यात काय? या ना, जेवता जेवता बोलू आपण."

तिघे डायनिंग टेबलावर बसतात. स्टिफनसाठी वृषालीने खीर बनवलेली असते. पालकची भाजी, चपात्या, डाळ, भात, कोशिंबीर, भजी आणि लोणचंदेखील ताटात असतं. तिघे जेवायला सुरुवात करतात. स्टिफनने खूप वाट पाहिलेली असते. त्याला राहवत नाही.

स्टिफन, "वृषाली?"

वृषाली, "हा सर, काय वाढू?"

स्टिफन, "पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोघे मला सर बोलणं बंद करा. आल्यापासून बघतोय, मी मित्रासारखा वागतो आणि तुम्ही दोघे प्रत्येक वाक्याच्या अगोदर सर, सर लावता."

वृषाली, "सॉरी सर, परत नाही बोलणार."

स्टिफन, "बघ, परत सर म्हणालीस."

सागर, "तुम्हाला काही हवंय का?"

स्टिफन, "नाही. (वृषालीकडे वळून) बदमाश ग्रुपबद्दल मला काही सांगू शकशील का?"

वृषाली जरा दचकते. अचानक याने हा प्रश्न कां केला? असा विचार तिच्या मनात येतो.

वृषाली, "कोणता बदमाश ग्रुप?"

स्टिफनला राग येतो, "तू बदमाश ग्रुपमध्ये होतीस ना!"

सागर, "सर, आपण जेवण झाल्यानंतर बोलू. प्लीज सर."
 

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका
मनोगत
मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’
प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात
प्रकरण २ : विरहातील पहिला भाग
प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग
प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग
प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे
प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने
प्रकरण ७: अंधूक आशा
प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये
प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी
प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी
प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन
प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात
प्रकरण १३: विवाहाचं रहस्य
प्रकरण १४: वडीलांचा आधार
प्रकरण १५: देशप्रेम
प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात