Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने

ऑस्ट्रेलिया (टास्मानिया): अभिजीत, "काय करतेस?.... व्यवस्थित कर ना!... नसेल जमत तर मला सांग.... सोड तू... मीच बांधतो टाय."

गौरी, "असं का करता? मला कधी टाय बांधायला येणार?"

अभिजीत चेहरा पाडून रागाने म्हणतो, "पाऊन तास झाला टाय बांधतेस. मला ऑफिसला उशीर होत नसेल का?"

गौरी, "पाऊन तास बोलूच नका. पहिली वीस मिनीटं लाडात यायला कोणी सांगितलेलं? तेवढ्यात टाय बांधून झाली असती."

अभिजीत, "आणि नंतरची पंचवीस मिनिटं?"

गौरी, "तुम्ही लाडत आलात. मी नको का यायला?"

अभिजीत, "अगोदर नाही सांगायचं?"

गौरी, "इ... अंगावर येऊ नका.!"

अभिजीत, "का? काय झालं?"

गौरी, "सांगू?"

अभिजीत, "सांग."

गौरी, "खरंच सांगू?"

अभिजीत, "सांग ना!"

गौरी अजूनच लाडात येते आणि अभिजीतच्या शर्टाच्या बटना लावत, "तुम्हाला ना..."

अभिजीत, "मला..."

गौरी, "तुम्हाला..."

अभिजीत, "मला काय?"

गौरी, "तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय." मग अभिजीतला शुध्दीवर आणत, "शांतपणे ऑफिसला जा. नुसता टाईमपास करायला पाहिजे."

अभिजीत थोडा रुसतो आणि ऑफिसला जायला निघतो.

गौरी, "बरं, माहितीये ना! आपल्याला पिकनिकला जायचंय ते."

अभिजीत, "हो. थोडं काम आहे ऑफिसमध्ये. ते पूर्ण झालं की..."

नाकावर राग घेऊन गौरी लगेच निघून जाते. अभिजीत गालातल्या गालात हसतो. आपला मोबाईल, घड्याळ, गॉगल अशा सर्व वस्तू घेऊन तो घरातून बाहेर निघतो. टॉम तिथे गाडी घेऊन तयारच असतो. अभिजीतच्या उशिरा निघण्याची त्याला सवय झालेली असते. गाडीत बसून अभिजीत आपला लॅपटॉप उघडतो आणि कामाला सुरुवात करतो. येशूकडे प्रार्थना करुन कशीतरी हिंमत एकवटून टॉम अभिजीतला म्हणतो,

टॉम, Sir, I want to tell you something. "सर, एक सांगायचं होतं."

अभिजीत, "हं...."

टॉम, Sir, a baby boy born at my home. I kept his photo next to your Tab besides your file. "सर, माझ्या घरात एका गोंडस मुलाचा जन्म झाला. तुमच्या फाईलच्या बाजूला जो टॅब आहे, त्याच्यात तो फोटो आहे." अभिजीत लगेच तो टॅब उघडतो.

अभिजीत, Wow, That’s a good news. He looks very sweet.. Why you being so scared while telling me. "अरे वा! खूप गोड दिसतोय हा. ही तर आनंदाची गोष्ट आहे. असं घाबरत का सांगतोस?"

 टॉम, No Sir, This is my first time. That’s why I am confused and I don’t know what to do. "नाही सर, पहिल्यांदाच बाप झालोय. सूचत नाही काय करु ते."

अभिजीत, Silly man, A baby Boy born at your home and you came to the office? In our Maharashtra… "मुर्खा, बापझाला आहेस आणि कामावर काय येतो? आमच्या महाराष्ट्रात तर..." अभिजीत एकदम गप्प होतो.

टॉम, Where Sir? "कुठे सर?"

अभिजीत, Nothing, Stop the car. "काही नाही, गाडी थांबव."

टॉम, Any problem Sir? "काही प्रॉब्लेम आहे का सर?"

अभिजीत, I said stop the car. Who is the owner, you or me? "थांबव म्हणालो की थांबवायची गाडी. मालक तू आहेस की मी?"

टॉम, Sorry Sir.

टॉम गाडी थांबवतो. अभिजीत गाडीतून बाहेर निघतो आणि त्यालाही बाहेर निघायला सांगतो. टॉम घाबरतो. कारण पहिल्यांदाच तो अभिजीतसोबत इतक्या मोकळेपणाने बोलला होता आणि त्यावर अभिजीतची अशी प्रतिक्रिया आलेली असते. जीव मुठीत धरून तो बाहेर येतो.

अभिजीत, Take this 3,000 dollars. This is our tradition. You are going to see the face of your child at first time, you should give something to him. So while going to your home on the way go to my home, tell Gauri that I told to give your payment. "आजपासून पुढच्या आठवड्यापर्यंत तू कामावर यायचं नाहीस. हे घे, ३,००० डॉलर्स आहेत. आमच्यात पध्दत आहे. मुलाचा चेहरा पहिल्यांदा पाहिल्यावर त्याला काहीतरी द्यायचं असतं. आणि तुझ्या घरी जाता जाता माझ्या घरी जाऊन ये. गौरीला सांग, मी तुझं पेमेंट द्यायला सांगितलंय."

टॉम, But Sir, If I went who will drive the car? "पण सर, मी निघून गेलो तर गाडी कोण चालवणार?"

अभिजीत, I’ll. "मी आहे ना! मी चालवेन गाडी."

टॉम, Thank you sir. I misunderstand you. "मला खरंच माहित नव्हतं की तुम्ही इतके निर्मळ आणि प्रेमळ आहात. तुमच्याविषयी मी गैरसमजात होतो."

अभिजीत, Don’t waste your time here. Go immediately and take care of Barbara. She needed you. "इथेच बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. बार्बराकडे ताबडतोब जा आणि बघ. तिला तुझी गरज आहे." इतकं बोलून अभिजीत गाडी सुरु करुन निघून जातो.

टॉम तसाच स्तब्ध उभा राहतो. गेली चार वर्षे तो अभिजीतकडे नोकरीसाठी असतो. पण कधी त्याने अभिजीतचं असं रुप पाहिलं नव्हतं. क्षणभर त्याला आपण स्वप्न पाहत आहोत असंच वाटतं. तो पगार घेण्यासाठी गौरीकडे जातो.

अभिजीत गाडी चालवताना विचार करतो, ‘किती खूश असेल ना टॉम? पहिल्यांदाच बाप झालाय. बाप होण्याचा आनंद आणि माझ्या रागाची भिती एकत्र त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. बावळट. मी सुध्दा बाप झालो असतो, सुवर्णा अर्ध्यावर सोडून गेली नसती तर. अरे! हे काय भलतेसलते विचार करत बसलोय मी? भुतकाळापासून पाठलाग सुटता सुटत नाही. म्हणूनच गौरीला पूर्णपणे स्विकारु शकत नाही. टॉम तिच्याकडे पगार मागायला गेला आणि तिलासुध्दा त्याने ही गोष्ट सांगितली तर तिच्या मनात सुध्दा आई होण्याची इच्छा निर्माण होईल. तिची इच्छा असेल तरच मी तिला आई होण्याचा हक्क देईन. शेवटी तीच अशी आहे जिच्यामुळे मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. ती नसती तर आज मी सुध्दा या जगात नसतो.’ विचार करत करत अभिजीत ऑफिसमध्ये पोहोचतो. गेटवरील गार्डला गाडी पार्क करायला सांगून तो ऑफिसमध्ये शिरतो तेव्हा,

स्टिफन, "Good morning Abhi."

अभिजीत, "Good morning Stee. Is there any message for me from Youtube?"

स्टिफन, Forget the message of YouTube. I came to know that you are going on leave for a week. "यु-ट्युबचा मेसेज विसर. तू आठवडाभर सुट्टी घेत आहेस असं कळलं मला."

अभिजीत, "Yes, why you asking this question?"

स्टिफन, I don’t believe are you really thinking about going on holiday? "विश्वास बसत नाही. हे तू स्वतः बोलतोस?"

अभिजीत, "Stee, see, Gauri wants to…" थांबून तो आजुबाजूला बघतो तर सगळे आपलं काम थांबवून त्याच्याकडेच बघत असतात.

अभिजीत, All of you have any work or not? If not then tell me, I will declare a holiday. "तुम्हाला काही कामं आहेत की नाही? नसेल तर तसं सांगा. म्हणजे तुम्हाला सुट्टी द्यायला बरं होईल."

सगळे लगेच कामाला लागतात. अभिजीत स्टिफनसोबत आपल्या कॅबिनकडे जायला निघतो. स्टिफनकडे वळून, Listen, Gauri wants to go somewhere with me. After five years of my marriage, at the first time she requested me for something. So I must do something for her. "हा तर स्टी. गौरीची इच्छा आहे की मी तिला कुठेतरी बाहेर  घेऊन  जावं.  लग्नाला  पाच  वर्ष  झाली  आणि  आत्ता  तिने  हक्काने  माझ्याकडे  काहीतरी मागितलं. एवढंतरी  मी तिच्यासाठी केलं पाहिजे."

स्टिफन, Very well, But don’t tell this thoughts to my wife. "खूपच छान. फक्त तुझे हे नवरोबाचे विचार माझ्या पत्नीला कळू नको देऊस. कधी चाललास?"

अभिजीत त्याला डोळा मारतो.

स्टिफन, Then? Second honeymoon? "मग? दुसरं हनिमून म्हणायचं का?" अभिजीत त्याच्याकडे बघतच राहतो. Just kidding yaar. "गंमत केली रे मित्रा."

अभिजीत, First I will complete my important work and remaining work will hand over to you, then I leave tomorrow. "बस्स. आज महत्त्वाची कामं आटपतो आणि बाकीचा भार तुझ्यावर सोपवून उद्यापर्यंत निघतो."

स्टिफन अभिजीतकडे बघतच राहतो. मनात शंका येते आणि तो विचारतो, Is this you, Abhi? "नक्की अभीच आहेस ना तू?"

अभिजीत, "Come on, Stee."

दिवसभरात फाईल्स, ग्राफिक्स, डिझाईन्स सगळ्या गुंतागुंतीत असताना सुध्दा पहिल्यांदाच त्याचं कामात लक्ष लागत नाही. टॉमच्या मुलाचा चेहरा सतत त्याच्या डोळ्यासमोर येतो. मग गौरीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो. थोड्या वेळाने दोन्ही चेहरे त्याच्या डोळ्यासमोर येतात. तरीही सर्व काम करुन तो संध्याकाळी थोडा उशीरा ऑफिसमधून निघतो.

स्टिफन, Hey buddy, you are leaving or not? "निघायचं की नाही?"

अभिजीत आपल्या सगळ्या वस्तू घेत, Just wait. I am coming with you in your car, just drop me at my home. I sent Tom on leave from today. "थोडं थांब. मला तुझ्या गाडीने घरी जायचंय. टॉमला मी आजपासूनच सुट्टीवर पाठवलंय."

स्टिफन, Why today?  "आजपासून का?"

अभिजीत, He become a father. "तो बाप झालाय."

स्टिफन, You are strongly affected by Gauri’s magic. "गौरीने चांगलाच जादू केलेला दिसतोय तुझ्यावर."

अभिजीत, Let’s Go. "चल."

दोघे स्टिफनच्या गाडीत बसतात. अभिजीत स्टिफनच्या ड्रायव्हरला त्याची गाडी घरी न्यायला सांगतो. स्टिफन गाडी चालवत असतो. अभिजीत त्याच्या शेजारी बसतो.

अभिजीत, Listen. In my absent you take my all letters and fax. "बरं, मी नसताना मला आलेले सर्व लेटर्स, फॅक्स तू घेत जा."

स्टिफन, How can I read your letters? "मी तुझे लेटर्स कसे वाचणार?"

अभिजीत, What’s the problem? Everything is official. Personal life only after going home. Once left the door, then all is professional. "काय प्रॉब्लेम आहे? सगळं ऑफिशियलच असतं. पर्सनल लाईफ फक्त घरात प्रवेश केल्यानंतर. दरवाजातून बाहेर निघालो की सगळं प्रोफेशनल."

स्टिफन, Actually, I was planning to go on leave after two days. "खरं तर दोन दिवसांनी मीच सुट्टी घेणार  होतो."

अभिजीत, Why? "का?"

स्टिफन, You are the person who enjoying professional life for 24 hours. Do you even know? After 2 days there is a T-20 match with India. "तू तर चोवीस तास प्रोफेशनल लाईफ जगणारा माणूस आहेस. तूला काय माहित? दोन दिवसांनी आपली आणि इंडियाची ट्वेंटी-२० मॅच आहे."

अभिजीत, Hmm… we will won… "हं... आपणच जिंकू."

स्टिफन, No, I’m interested in India. "नाही रे. मी भारताच्या बाजूने आहे."

अभिजीत, Why? "कां?"

स्टिफन, Very funny to hear? I think I will be the only person who is against his own country, Where I born, brought up and educated but supporting other country. "विचित्र वाटतं ना ऐकायला? मीच असा असेन जो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशाला पाठिंबा देतोय. ज्या देशात आपण जन्म घेतला, वाढलो, ज्या देशात आपलं शिक्षण झालं. तो देश सोडून दुसऱ्या देशाला पाठिंबा देतोय."

अभिजीत मनातल्या मनात म्हणतो, ‘जगात तूच असा एकटा नाहीस. तुझ्यासारखाच एक तुझ्या बाजूला बसलेला आहे.’

अभिजीतचं घर आल्यावर स्टिफन गाडी थांबवतो. अभिजीत उतरल्यावर तो म्हणतो, First time you are going out of country for enjoyment. Enjoy at all and come back soon. "एन्जॉय करण्यासाठी पहिल्यांदाच देशाबाहेर चालला आहेस. मस्त एन्जॉय कर आणि लवकर परत ये."

अभिजीत, "Thanks."

अभिजीत घरी आल्यावर, रुपाली सोफ्यावर झोपून गाणे ऐकत असते. इकडे तिकडे नजर फिरवून गौरी कुठे आहे ते बघतो. मग रुपालीला विचारतो, "तुझी ताई कुठे आहे?"

रुपाली गाणे ऐकण्यातच गुंग असते. ती बेडरुमकडे बोट दाखवते. तो बेडरुमकडे वळतो. मनात फक्त एवढाच विचार असतो, टॉमने त्याच्या मुलाबद्दल सांगितल्यावर तिला कसं वाटलं असेल? कदाचित वाईट वाटलं असेल म्हणून ती बेडरुममध्ये शांत बसली असेल. बेडरुममध्ये गेल्यावर त्याला उलटं चित्र दिसतं. गौरी पिकनिकचं सामान भरत असते. अभिजीतला आलेलं पाहून, "बरं झालं आलात. तुमचा लॅपटॉप कुठे ठेवायचा?"

"का?"

"काम करायला."

"मी पूर्ण आठवडाभर सुट्टी घेतलीय कारण तूला पूर्ण वेळ देऊ शकेन."

"मग लॅपटॉप नाही घ्यायचा?"

"नाही घ्यायचा."

गौरी आणखी खूश होते. ती म्हणते, "मग तुमचे ऑफिसचे कपडे सुध्दा काढून टाकते. फक्त माझ्या आवडीचे कपडे घेते."

"मी पिकीनिकला ऑफिसचे कपडे का घालणार?"

"काय म्हणालात?"

"काही नाही. कर काय करायचं ते. अगदी तुझ्या मनासारखं."

"माझ्या मनासारखं?"

"हो."

"मग माझ्या मनासारखं अजून एक कराल?"

"बोल."

"वॉशरुममध्ये जा आणि फ्रेश होऊन या लवकर. नुसत्या गप्पा मारायला पाहिजे."

अभिजीतला थोडं बरं वाटतं. टॉमच्या मुलाची बातमी गौरीने मनावर घेतली नाही, यामुळे त्याचं मन जरा हलकं झालं. फ्रेश होऊन आल्यावर तो, गौरी आणि रुपाली. तिघे जेवायला बसतात. अभिजीत रुपालीच्या डावीकडे आणि गौरी उजवीकडे बसतात.

अभिजीत, "बेटा, सॉरी."

रुपाली, "का?"

अभिजीत, "तूला एकटीला सोडून आम्ही दोघे बाहेर चाललोय."

रुपाली, "माझे प्रोग्रामिंगचे क्लासेस सुरु झालेत. तसंही मला यायला जमलं नसतं."

गौरी, "तुझ्यासोबत घरी कोण असेल मग?"

रुपाली, "सेरेना आणि प्रेस्तिका."

अभिजीत, "त्या दोघींच्या घरी सांगितलस ना!"

रुपाली, "हो."

गौरी, "कधी येतील त्या दोघी?"

रुपाली, "उद्या, कॉलेज सुटल्यावर."

अभिजीत, "त्या दोघींच्या घरी सांगितलस ना!"

रुपाली, "हो. आणि एक-एक करुन मला प्रश्न विचारायचं बंद करा. एकतर ताई तू बोल, नाहीतर तुम्ही बोला. दोन्ही बाजूला बघून बघून माझी मान दुखते."

गौरी आणि अभिजीत एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसतात. आणि पुढे काही विचारत नाही. जेवण करुन रुपाली तिच्या बेडरुममध्ये, गौरी आणि अभिजीत त्यांच्या बेडरुममध्ये झोपतात. झोपण्याआधी,

गौरी, "फ्लाईट कितीची आहे?"

अभिजीत, "सकाळी ७:३७"

गौरी, "मस्तच. मग आपण रुपालीला कॉलेजला ड्रॉप करुन जाऊ."

अभिजीत, "नाही. रुपालीला जाऊ दे. आपल्याला सोडायला स्टि. येतोय."

गौरी, "अरे हा. तो टॉम आलेला पेमेंट घ्यायला."

अभिजीत, "मग दिलसं त्याला पेमेंट?"

गौरी, "हो. तसे माझ्याकडे काही डॉलर्स होते. आजपासूनच त्याला सुट्टीवर का पाठवलं?" एवढं बोलून ती अभिजीतच्या हळूच कुशीत शिरते.

अभिजीत, "तो अजून काही नाही म्हणाला का?"

गौरी, "नाही. कां? काय झालं?"

अभिजीत, "काही नाही. झोप."

गौरी तो विषय सोडून देते. तिला जर्मनीला जायची घाई झालेली असते. ती त्याच विचारांत असते, पण तिला हे माहित नसतं की त्यांच्या जर्मनीला जाण्याने काय होणार ते. ती झोपी जाते. मात्र अभिजीत जागाच असतो. त्याच्या डोळ्यासमोर सतत टॉमच्या मुलाचाच चेहरा येत असतो. नंतर गौरीचा निरागस चेहरा बघत तो सुध्दा झोपी जातो.

सकाळी स्टिफन गाडी घेऊन येतो. अभिजीत आणि गौरी बाहेर येतच असतात.

गौरी, Hi Stee. Good morning.

स्टिफनला जरा धक्काच बसतो.

अभिजीत, "या पृथ्वीतलावर फक्त मीच त्याला स्टी. बोलतो."

गौरी, "मग? काय नाव आहे त्यांचं?"

अभिजीत, "स्टिफन."

गौरी, "Oh…! Hi Steafen."

स्टिफन, "Hi. Are you ready for your journey?"

गौरी गाडीमध्ये त्याच्या शेजारी बसत, "Yesss…"

अभिजीत गाडीच्या डिक्कीमध्ये सामान भरतो आणि मागच्या सीटवर जाऊन बसतो. गाडी विमानतळाकडे जाते. गौरीच्या प्रवासाची सुरुवातच डोकेदुखीने होते, कारण पुर्ण रस्त्यात अभिजीत आणि स्टिफन ऑफिसच्या कामांबद्दलच बोलत असतात. विमानतळावर उतरल्यानंतर स्टिफन त्या दोघांना त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा देतो आणि निघून जातो.

विमान वेळेवर एयरपोर्टवर दाखल होतं. दोघे आपला पासपोर्ट दाखवून, सामानाची तपासणी करुन विमानात बसतात आणि जर्मनीला रवाना होतात. जर्मनी (दॉइचलॅंड) हा जगातल्या औद्योगिक आणि प्रगत देशांपैकी एक देश, जो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. तिथे लोहमार्गाचे जाळे अत्यंत विकसित आहे. लोहमार्ग हा जर्मनीतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक प्रामुख्याने स्थानिक भूमिगत रेल्वेमार्गांनी (यु-बान) तर शहरांदरम्यान वाहतूक उपनगरीय रेल्वेमार्गांनी (एस-बान) होते. लांब पल्ल्याची आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आय.सी.ई. (इंटरसिटी एक्सप्रेस) ही गाडी आपल्या वेगासाठी प्रसिध्द आहे. साधारणपणे ताशी १६० ते ३०० किमी वेगाने पळणाऱ्या या गाडीचा समावेश जगातील मोजक्या अतिवेगवान रेल्वेगाड्यांमध्ये होतो.

रस्ते आणि रेल्वे यांच्या कार्यक्षम जाळ्यांमुळे जर्मनीमध्ये देशांतर्गत विमानप्रवास फारसा होत नाही. विमानप्रवासाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होतो. बहूतेक विमानतळे रेल्वेमार्गांनी जोडली आहेत. लुफ्तान्सा ही जर्मन विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी आहे. त्याखालोखाल जर्मन विंग्स, रहाइन एर या स्थानिक विमान कंपन्या युरोपांतर्गत सेवेसाठी प्रसिध्द आहे. फ्रॅन्कफुर्ट विमानतळ हा जर्मनीतला सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असून जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांमध्येयाचा समावेश होतो. अभिजीत आणि गौरी त्या विमानतळातून बाहेर येऊन जर्मनीमध्ये प्रवेश करतात. गाडी समोरच असते. फ्रॅन्कफुर्ट शहरातून ते गाडीने हांबूर्ग शहरात जातात. त्या दोघांना घ्यायला आलेला ड्रायव्हर ताशी १३० च्या वेगाने गाडी चालवत असतो.

गौरी, "हा इतक्या वेगाने गाडी का चालवतोय? मला भिती वाटतेय."

अभिजीत, "जगातील अत्यंत प्रगत वाहतूक व्यवस्था असलेल्या देशांमध्ये जर्मनीचा समावेश होतो. युरोपातल्या आपल्या मध्यवर्ती स्थानामुळे इतर युरोपीय देशांच्या मानाने जर्मनीत गाडी चालवायला स्कोप आहे. इथल्या खास वेगवान वाहतुकीसाठी बनवलेल्या या महामार्गांना ऑटोबान म्हणतात. इथली सगळी शहरं ऑटोबानमुळे जोडली गेली आहे. आता आपण ज्या रस्त्यावरुन चाललोय हा रस्तासुध्दा ऑटोबानच आहे. इथे गाडी चालवण्यासाठीस्पीड लिमिटेशन नाही. म्हणूनच बाहेरच्या देशातले लोक इथे येऊन आपली भरधाव गाडी चालवण्याची हौस पूर्ण करुन घेतात."

गौरी, "आणि अॅक्सिडंट झालं तर?"

अभिजीत, "युरोपमध्ये सगळ्यात कमी अॅक्सिडंट या देशात होतात."

गौरी, "मस्तच ना! खूप दिवसांपासून इच्छा होती युरोपमध्ये एका देशात तरी पिकनिकला जायचं."

अभिजीत, "हं... आलो आपण जर्मनीला. आता तरी खूश ना!"

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात