Get it on Google Play
Download on the App Store

सद्‍गुरु - जुलै ८

ज्या  गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते . ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहात नाही . ‘ अनुसंधान ठेवतो ’ असे म्हणताना ‘ मी ’ त्याच्याहून वेगळा असतो ; आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो . आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहातो . हे आपले अनुसंधान आहे ; कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच ! असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही . ‘ देहाचा विसर पाडा ’ म्हणून सांगावे लागते , ‘ देहाचे स्मरण ठेवा ’ म्हणून नाही सांगावे लागत !

आम्हांला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे . हा एक प्रकारचा अभ्यास आहे . भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल . परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरिता अभ्यास करणे जरुर आहे . यासाठी , जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षित्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे . आज आम्हांला नाना तर् ‍ हेचे उद्योग करावे लागतात . प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात ! त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे , हे आपले खरे कर्तव्य आहे .

सर्कशीमध्ये आपण पाहातो ना ! वाघ , सिंह , घोडे , हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात . घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो ! पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते . त्या घोड्याचे , त्या वाघाचे , त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना ? प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहात नाही . आणि आपण काय करतो ? भगवंत काय म्हणेल हे पाहातच नाही , जग काय म्हणेल हे पाहातो ! हे जर आम्ही सोडले ना , तर भगवंताला काय हवे आहे ते आम्हाला बरोबर कळेल . भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल . त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे . हे कशाने होईल ? अत्यंत प्रेमाने होईलच .

एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजविले , आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत होती . ते मूल थोडेसे कुठे रडले . घरात पुष्कळ माणसे होती , कुणाला ऐकू नाही गेले . ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली , आणि ‘ मूल उठलेले दिसते आहे ’ असे म्हणाली . काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते , तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे . याचे नाव अनुसंधान !

ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास

स्तोत्रे
Chapters
सद्‍गुरू - जुलै १ सद्‍गुरू - जुलै २ सद्‍गुरू - जुलै ३ सद्‍गुरू - जुलै ४ सद्‍गुरू - जुलै ५ सद्‍गुरु - जुलै ६ सद्‍गुरु - जुलै ७ सद्‍गुरु - जुलै ८ सद्‍गुरु - जुलै ९ सद्‍गुरू - जुलै १० सद्‍गुरू - जुलै ११ सद्‍गुरू - जुलै १२ सद्‍गुरू - जुलै १३ सद्‍गुरू - जुलै १४ सद्‍गुरू - जुलै १५ सद्‍गुरू - जुलै १६ सद्‍गुरू - जुलै १७ सद्‍गुरू - जुलै १८ सद्‍गुरू - जुलै १९ सद्‍गुरू - जुलै २० सद्‍गुरू - जुलै २१ सद्‍गुरू - जुलै २२ सद्‍गुरू - जुलै २३ सद्‍गुरू - जुलै २४ सद्‍गुरू - जुलै २५ सद्‍गुरू - जुलै २६ सद्‍गुरू - जुलै २७ सद्‍गुरू - जुलै २८ सद्‍गुरू - जुलै २९ सद्‍गुरू - जुलै ३० सद्‍गुरू - जुलै ३१