Android app on Google Play

 

सद्‍गुरु - जुलै ७

 

या  जगात कर्माशिवाय कोण राहातो ? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण , आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला . अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही . मालक पाठीशी असला की कर्म करणार् ‍ याला जोर येतो . काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात . भक्तिमार्गाने जो राहातो तो दुसर् ‍ याला नावे ठेवीत नाही . ‘ मी कोण ’ हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच ; तसेच , ‘ ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ’ म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते . उपासना , भगवंताला ओळखून करावी . लहान मूल आईकडे डोळे करुन मुकाट्याने दूध पिते , त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे . डोळे मिटून जितके काम होईल , अंधश्रद्धेने जे होईल , ते अभिमानाने , ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार . मूल होऊन भगवंताला ओळखावे . याला अडचण एकच असते ; माझे ‘ शहाणपण ’ आड येते . भक्त मुलांसारखे वागतात , म्हणून त्यांचे लाड देव पुरवितो . कुणी असे म्हणतील की , " भगवंताची आणि आमची ओळख नाही , तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ? " ‘ त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही " हे म्हणणे वेडेपणाचेच आहे . भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल . पांडूरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरुर आहे . संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला ; तो असा की , देहाने प्रपच करा , पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा . मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करुन उपयोग नाही .

ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही ; पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे . प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे . ‘ देव माझा आहे ’ असे म्हणण्याऐवजी ‘ मी देवाचा आहे ’ असे म्हणावे , म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते . समुद्राचा तरंग असतो , तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे . साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे ; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे . जशी श्रद्धा तशी फळे . आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे . प्रपंचात कधीच धीर सोडू नये . ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरुन हलवली की तिच्यामागे असणार् ‍ या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात , त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून काढून टाकली , की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात . या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात . असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय .

 

ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास

स्तोत्रे
Chapters
सद्‍गुरू - जुलै १
सद्‍गुरू - जुलै २
सद्‍गुरू - जुलै ३
सद्‍गुरू - जुलै ४
सद्‍गुरू - जुलै ५
सद्‍गुरु - जुलै ६
सद्‍गुरु - जुलै ७
सद्‍गुरु - जुलै ८
सद्‍गुरु - जुलै ९
सद्‍गुरू - जुलै १०
सद्‍गुरू - जुलै ११
सद्‍गुरू - जुलै १२
सद्‍गुरू - जुलै १३
सद्‍गुरू - जुलै १४
सद्‍गुरू - जुलै १५
सद्‍गुरू - जुलै १६
सद्‍गुरू - जुलै १७
सद्‍गुरू - जुलै १८
सद्‍गुरू - जुलै १९
सद्‍गुरू - जुलै २०
सद्‍गुरू - जुलै २१
सद्‍गुरू - जुलै २२
सद्‍गुरू - जुलै २३
सद्‍गुरू - जुलै २४
सद्‍गुरू - जुलै २५
सद्‍गुरू - जुलै २६
सद्‍गुरू - जुलै २७
सद्‍गुरू - जुलै २८
सद्‍गुरू - जुलै २९
सद्‍गुरू - जुलै ३०
सद्‍गुरू - जुलै ३१