बंजी जंपिंग
पेसिफिक द्वीपसमूहावर स्थित बनलेप गावामध्ये एक अगदीच विचित्र परंपरा आहे. कोल नावाच्या या परंपरेला लैंड डायव्हिंग किंवा बंजी जंपिंग म्हटले जाते. ग्रामीण लोक ड्रम वाजवतात, नाचतात आणि गातात. ते लाकडाच्या उंच टॉवर वरून पायांना दोरी बांधून उडी घेतात. कित्येक वेळा यामध्ये हाडे मोडण्याची शक्यता असते. त्यांची अशी कल्पना असते की जेवढ्या उंचावरून ते उडी घेतील, तेवढे जास्त आशीर्वाद देवाकडून मिळतील.