अपरिचित भाषा बोलणे
अंगात देवी संचारली की त्या व्यक्तीला पूर्णपणे अपरिचित "भाषा" बोलता येते हा गैरसमज त्यातूनच तयार होतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती कधीमधी ऐकलेल्या भाषेतलेच काही शब्द बोलत असते. कानडी, संस्कृत, गुजराथी, शब्द कानावर पडलेले असतात तेच तिच्या तोंडी येतात. ही व्यक्ती जर्मन, स्पानिश, इटालियन भाषा का बरे बोलत नाही?