Android app on Google Play

 

फक्त स्त्रियांच्या बाबतीत का ?

 

जसाजसा मनाची शक्ती, मनाचे व्यापार यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास वाढू लागला तसतशा या वेडगळ समजुतीमागील शास्त्रीय तथ्ये उलगडू लागली आहेत. यात पहिली लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे अंगात येण्याचा हा प्रकार बायकांच्याच बाबतीत घडतो. तरुण व पोक्त स्त्रियांच्या बाबतीत बहुदा हे घडते. लहान मुली, वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत नव्हे. याचे कारण असे की मनावरचे ताण, चिंता व यातून बाहेर पडण्याची तीव्र पण अबोध इच्छाच त्या व्यक्तीला पछाडत असते. शिवाय स्त्रियांवर पारंपारिक मतांचा, संस्काराचा पगडा जास्त असतो. आपल्या विचारांना वाट करून देऊन मोकळेपणाने बोलण्याचीही त्यांना चोरी असते. अशा सर्व कारणांमुळे अंगात येण्याचे प्रकार बायकांच्याच बाबतीत घडताना दिसतात.