Android app on Google Play

 

दुष्ट शक्ती

 

मांत्रिक, साधू, महाराज किंवा बाबा त्या दुष्ट शक्तींकडे अचूक बोट दाखवतात. "मन आजारी पडलं" ही कल्पना फारशी रुचत नाही. पण "दुष्ट शक्तीने मनावर कब्जा केला" हे म्हणणे अगदी पटण्याजोगे असते आणि त्यावर उपाय करायला तज्ञ मांत्रिक केंव्हाही उपलब्ध असतात. एखाद्या व्यक्तीला भुताने झपाटले आहे म्हटले की ती व्यक्ती स्वतः दोषी नाही असे आपोआपच सर्वांना पटते.

तुझ्या भ्रमिष्ठ वागण्यात तुझा काहीच दोष नाही, हा देवीचा कोप होता, कुंडलीचा त्रास होता असे समर्थनही त्या व्यक्तीला बरे वाटते. असे सांगणारा "गुरु" म्हणजे तर आपल्या संस्कृतीचा आधारच असतो. दवाखान्यात "वेटिंग" मध्ये तासंतास बसून ढीगभर फी देऊनही अशा रोगांचा कायमचा नायनाट होईल की नाही अशी शंका असते. त्याऐवजी "भूतबाधा" उतरविण्याची दैवी उपचारपद्धती प्रभावी ठरते. पोथीवाचन, यज्ञकुंड, धीरगंभीर पठण आणि अगम्य भाषेतील मार्गदर्शन याचाच रुग्णाला फार आधार वाटत असतो.