Android app on Google Play

 

धंदा करणाऱ्यांस थांबवणे आवश्यक

 

या चारही प्रकारच्या अंगात येण्यामागील "शास्त्रीय" कारणे एकदा समजली की त्यावरील उपचार करणे ही फारच सोपी गोष्ट असते. मुख्यतः ह्या सर्व प्रकारात ज्यांचे "हितसंबंध" गुंतलेले असतात त्यांना या "अंगात येणाऱ्या" पासून बाजूला करणे ही पहिली पायरी असते. धंदा म्हणून या सगळ्या प्रकाराचा वापर करणाऱ्यांना आणि मानसिक दडपणामुळे मनोविकाराचा बळी ठरणाऱ्या बायकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हा महत्वाचा उपाय आहे.