ब्रम्हसरोवर, कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्र शहराच्या हृदयस्थानी असलेले ब्रम्हसरोवर पूर्ण विश्वात आपले विशाल सरोवर आणि महाभारताच्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे. ब्रम्हसरोवराच्या विशाल परिसरात कित्येक मोठी, विशाल आणि प्राचीन मंदिरे आहेत. इथे अनेक धर्मशाळा देखील आहेत. ब्रम्हसरोवराशी महाभारताची एक कथा निगडीत आहे ती अशी की अर्जुनाद्वारे जयद्रथाशी युद्धाच्या वेळी जेव्हा सूर्यास्ताची वेळ टळत आली होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या मायाशक्तीने सूर्य ढगांमध्ये झाकला होता ज्यामुळे सुर्यास्ताचा भास निर्माण झाला. त्यावेळी अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की अभिमन्यूच्या वधाचा दोषी जयद्रथाला जर आपण सूर्यास्ताच्या पूर्वी मारू शकलो नाही तर आपण अग्निसमाधी घेऊ. दुर्योधनाने जयद्रथाला अभेद्य व्युहामध्ये लपवले होते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी हे सोंग रचले गेले होते. प्रत्यक्षात त्या दिवशी सूर्यग्रहण होते म्हणूनच असे वाटले की सूर्यास्त झाला आहे.