Android app on Google Play

 

ज्योतिसर तीर्थ, कुरुक्षेत्र

 


हरियाणा च्या कुरुक्षेत्र शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील ज्योतिसर तीर्थ ते स्थान आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोह झाल्यावर गीतेचा उपदेश दिला होता. ज्या वटवृक्षाच्या खाली भगवान कृष्णाने गीतेचा उपदेश केला होता तो वटवृक्ष ५००० वर्षांपासून आजही उभा आहे. आजही इथले संपूर्ण क्षेत्र पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. इथे महाभारत काळाशी निगडीत कित्येक कलाकृती, शिलालेख आणि अन्य प्रमाणे आहेत.