पंचमुखी हनुमान
हनुमान जेंव्हा समुद्र उल्लंघून जात होता तेंव्हा त्याला घाम आला आणि त्याचे काही बिंदू समुद्रांत सोडले जिथे एका भयानक मोठ्या सुसरीने ते गिळंकृत केले. ह्यापासून सुसरीला मकरध्वज नावाचा अर्धवानर अर्ध मगर अश्या प्रकारचा मुलगा निर्माण झाला.
रामाला अहिरवानाने पाताळांत कैद करून ठेवले तेंव्हा हनुमान त्यांना वाचविण्यासाठी गेला. द्वारावर मकरध्वज पहारेकरी म्हणून होता त्याला हनुमानाने परास्त केले.
आंत अहिरवानाला मारण्याचा फक्त एक मार्ग होता तो म्हणजे पंच दिशांत ठेवलेले पांच दिवे एकाच वेळी मालविणे. हे अशक्यप्राय काम करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले.
हनुमान (पूर्व)
वराह (दक्षिण)
गरुड (पश्चिम)
नरसिंह (उत्तर)
हयग्रीव (वर)
ह्या चेहऱ्यांनी सर्व दिवे मालवून हनुमानाने अहिरवानाचा वध केला.