Android app on Google Play

 

हनुमानाचा जन्म

 

हनुमान हा अंजनी आणि केसरी ह्यांचा पुत्र आहे हे सर्वानाच ठाऊक आहे पण हे खूप कमी जणांना ठाऊक आहे कि राम जन्म आणि हनुमान जन्म ह्यांचा जवळचा संबंध आहे.

दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभला होता ज्यातून त्यांना दिव्य प्रसाद मिळाला. हा प्रसाद राजाने सर्व राणींना वाटून दिला. कौसल्याचा हातातून ह्या प्रसादाचा एक वाटा एक घारीने चोरून नेला. वायुदेवाने घारीच्या पकडीतून हा प्रसाद उडवून लावला आणि जथे अंजना ध्यानात बसली होती तिच्या हातावर टाकला.

अंजनाने हा दैवें प्रसाद समजून खाल्ला आणि तिला हनुमान झाला.