Android app on Google Play

 

मंदोदरी आणि सीतेचा संबंध

 

रावण अनेक साधूंना मारून त्यांचे रक्त एका भल्या मोठ्या पातेल्यांत टाकत असे. एक दिवस रावणाने ग्रितासंबंध नावाच्या ऋषीला मारून टाकले. हा ऋषी लक्ष्मीने आपल्या घरी जन्म घ्यावा म्हणून एका दर्भाच्या पातेल्यांत दूध ठेवून मंत्रित करत होता. रावणाने ऋषींच्या रक्तासोबत हे दूध सुद्धा आपल्या रक्ताच्या पातेल्यांत फेकून दिले.

एक दिवस रावणाच्या पापांना कंटाळून मंदोदरीने जीव द्यायचे ठरवले. पातेल्यांतील रक्त हे भयानक विष मानले जात होते. मंदोदरीने हे विष प्राशन केले पण मारण्याच्या ऐवजी ती गरोदर राहिली आणि तिने लक्ष्मी रुपी सीतेला जन्म दिला. घाबरून तिने ते बालक कुरूक्षेत्रांत फेकून दिले जिथे जनक राजाला ती सापडली.