कर्ण आणि भानुमती
कर्ण आणि दुयोधनाची पत्नी भानुमती ह्यांची फार चांगली मैत्री होती. एक दिवस धुर्योधनाच्या भेटीला आला असताना भानुमतीने कर्णाला द्यूत खेळण्याचे आव्हान दिले. ढुर्योधन यायला अवकाश असल्याने कर्णाने ते स्वीकार केले. पण खेळता खेळता कर्ण जिंकू लागला. इतक्यानं दुर्योधन त्यांचा खोलीत आला. कर्णाची पाठ असल्याने त्याला तो दिसला नाही पण पतीला पाहून भानुमती उभी राहिली. कर्णाला वाटले कि हार होतेय म्हणून ती शरमेने पळत आहे. त्याने सहज भावनेने तिचा पदर पकडला आणि त्या पुरुषी झटक्याने तिच्या उत्तरियाला बांधलेली मोत्यांची माल तुटली.
इतक्यांत कर्नाळा सुद्धा लक्षांत आले कि काही तरी गडबड आहे आणि त्याने वळून पहिले तर तिथे दुर्योधन उभा होता. अश्या अवघड स्थितींत भानुमती आणि कर्ण दोघांनाही शरम वाटली. दुर्योधन आता रागावून आपल्याला काहीतरी शिक्षा करेल असे कर्णाला वाटले.
पण दुर्योधनाने हसत प्रश्न केला की "देवी, मी फक्त मोती गोळा करून दिले तर चालतील कि गुंफून सुद्धा द्यावे लागतील ?"
दुर्योधनाचा आपल्या पत्नीवर आणि मित्रावर खूप खूप विश्वास होता.