आजचे इस्लामी जग
उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत जवळजवळ सर्व राष्ट्रे इस्लामी राष्ट्रे आहेत. यांशिवाय तुर्कस्तान,मलेशिया आणि इंडोनेशिया हेही इस्लामी देश आहेत. बांगला देश, पाकिस्तान तसेच इंडोनेशियात इस्लाम धर्मीय बहुसंख्येने आहेत. रशिया, चीन आणि भारत येथेही मुसलमान वस्ती बरीच आहे. पूर्व यूरोपातील इतर देश आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेतही मुसलमान आढळतात. जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्या ५५ कोटीच्या वर भरेल (१९६१). भारतातील मुस्लिम लोकसंख्या ६,१४,१७,९३४ असून महाराष्ट्रातील ४२,३३,०२३ (१९७१) आहे.