Get it on Google Play
Download on the App Store

पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर

जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी
बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये        राहिल कसे टिकूनी
चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात      मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या     तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी     काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा    पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते    कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,     मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही       प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले     काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता     पूर्णेच्या परिसरांत

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत अतिथी संपादकिय अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६ अणुक्रमणिका BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील) अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई 'श्रेय'स - अभिषेक ठमके संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील) नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे आहुती - अशोक दादा पाटील गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर चवंडकं - अशोक भिमराव रास्ते अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर बाल मजूर... - अदिती जहागिरदार कविता - वैष्णवी पारसे पाऊस - किरण झेंडे कविता - सुरेश पुरोहित ओळख - प्रशांत वंजारे शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर कविता - स्नेहदर्शन कविता - स्नेहदर्शन कविता - संतोष बोंगाळे कविता - संतोष बोंगाळे