Get it on Google Play
Download on the App Store

गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर

गाव म्हटले म्हणजे मातीची घर, शेती, जनावरे इ. बरेच असे घटक गावात येतात अर्थात ग्रामीण खेड्यात सरकाराची नस ही खेड्यातच असते खरे राजकारण खेड्यातच होते असे बहुतेक वेळा जाणवते व समजते पण आज २१ व्या शतकात खर बघितले तर खेड्यांचा विकास होत आहे का मग म्हणणार विकास म्हणजे काय नुसते सिमेंट बिल्डिंग, कारखाने, रस्ते, बंगले, गाडी नाही तर सरकार दरबारी असणार्याक योजनेच्या योग्य पध्दतीने वापर व शेतीला पुरक उद्योग करुन उदरनिर्वाह करण्यास सक्षम करणे पण असे खरच होतांना दिसत नाही महात्मा गांधी नेहमी म्हणत खेड्या कडे चला पण आज चित्र उलटे दिसते

आपण म्हणतो शहराकडे चला हे सर्व होतांना प्रत्येकाला दिसते पण शहरात आल्या नंतर गाव विसरुन जायचे का आपली जबाबदारी आपले संबंध यांची नाळ ही तिथेच रुजलेली असते गावातील ग्रामपंचायत म्हणजे छोटे संसद आहे आज किती तरी योजना आहे ज्यामुळे खेडे विकसीत होऊ शकतात पण ज्यांचा हातात सत्ता असते त्यांची तर मक्तेदारीच झालेली दिसते निवडणूक आल्या तर आपल्या सरकारी दुकाना मधून लपवलेले पैसे काढायचे आणि वाटायचे जेवढे विधानसभा व लोकसभेला वाटले जात नाही तेवढे जास्त पैसे एखाद्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत वाटले जातात हिशोब मात्र कागदावर वेगळा ही सत्य परिस्थिती कोणला कधी न उमजणारे कोडे

सरकार क्षेत्रात यांची मक्तेदारी आणि काय तर आम्ही तुमच्या विकासा साठी आहोत मग एक कळत नेमका जनतेचा विकास करतात की शहरात जाऊन स्वताचा विकास करतात आपली जनता विश्वास आशेने काही तरी परिर्वतन घडेल या आशेवर जीवन जगते...!

एक योजने बद्दल जे बघितले त्यावर नजर दृष्टीक्षेप टाकू महाराष्ट्र सरकारची योजना हागणदारी मुक्त गाव आज किती गाव हागणदारी मुक्त खर झाली आहे असती तर मग विद्या बालनला जाहिरात करावी लागली नसती या योजनेतुन गावातील नागरिकाला अनुदान दिले जाते संडास बाधण्यासाठी मग काय तर गावात ग्रामसभा बोलवायची निर्णय ठरवायचा आणि अनुदान मिळव्याचे पण नुसते अनुदान मिळून उपयोग नाही तर त्यांचे निकष ठरवले गेले पाहिजे

योजनेचे मुल्यमापन नुसते कागदावर नाही तर प्रत्यक्ष भेट देऊन केले पाहिजे पण वेळ कोणाला लावला शेरा की झाले काम आणि मग काय आर्दश ग्राम पुरस्कार मिळव्याचा अशा किती तरी योजना आहे ज्यांची कल्पना गावकरीना देखील कदाचित नसते आणि कागदावर दाखवून भ्रष्टाचारा सारखे प्रकार घडतांना दिसतात तसेच "तंटामुक्ती गाव" म्हणजे काय गावात कधीच वाद होत नाही असे म्हणतात का मग आजही दलित अस्पृशय लोक गावाच्या बाहेर एका विशिष्ठ जागी राहतांना का दिसतात मला असे म्हणायचे नाही सगळेच खेडी असे असतात पण सर्वक्षण केले तर नक्कीच असे चित्र बघायला मिळते समाजातील काही ठराविक वर्ग हा श्रीमंत होत आहे आणि गरीब हा गरीब बनत चालला आहे

केवळ शहरीकरणा मुळे आपण खुप मोठ्याने व आभिमानाने सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनच्या महाराष्ट्रात राहतो मग आपण हे का विसरतो त्यांचे स्वराज्य मिळवले कष्ट मेहनत श्रम कोणासाठी रयते साठी एकवेळी राजे स्वता उपाशी राहायचे पण रयत सुखी असली पाहिजे मग आपण कुठला आर्दश बाळगतो सर्वाना वाटते जे काम आहे ते सरकारच, नेतेचे,आधिकार्यां चे आहे मग आपले काय टाळा चिपड्या वाजवणे नाही तर एक जबाबदार देशाचा नागरिक म्हणून जे चुक आहे अन्याय कारक हे शांत बसून गंमत बघण्यासाठी नाही तर आवाज उठवला पाहिजे संर्घष केला पाहिजे पण आपले उलट आपल्याला बोलता येते लिहीता येते चांगला विचार करता येतो पण प्रत्यक्ष तसे आपल्या कृतीतुन घडते का हे आत्मनिरीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे...!

प्रत्येकाला वाटते आपण समाजासाठी केले पाहिजे पण काय केले पाहिजे हे मात्र कळत नाही मी असे म्हणत नाही की कोणालाच काही कळत नाही सगळे कळते पण वळत नाही परिस्थिती अशी दिसते की माझे पोट भरते आहे मग दुसरा उपाशी मरतो आहे मरु दे कुठे तरी संवेधनशिलता संपते आहे सतत जाणवते एकत्र कुंटूबातून विभक्त कुंटुब झाले नात्यांन मधील दरी संबंध कमी होत आहे पैसे सर्व कमवत आहे पण समाधान विसरत आहे क्षणिक सुख अनुभवत आहे पण भविष्य मात्र आंधारात ठेवत आहे काय राहिला अर्थ असा जगण्याला विचार करा वेळ गेली नाही काही जरी सुरुवात करता आली तर नक्की कर पण शांत बसून वेळ व्यर्थ घालू नका २४ तास प्रत्येकाला वेळ नाही म्हणून पळवाट कढू नका मनात ठरवले तर अशक्य असे काहीच नसते फक्त जिद्द ही मनाची परिर्वतनाच्या ध्यासासाठी देऊ थोडा वेळ आपला उद्याचा बदलत्या समाजासाठी निष्ठेने काम करुन गौरव करु एकात्मतेचा उचलो सर्वजण भार गावाच्या विकासाचा संकल्प करुन घडवून दाखवून देऊ...!

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत अतिथी संपादकिय अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६ अणुक्रमणिका BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील) अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई 'श्रेय'स - अभिषेक ठमके संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील) नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे आहुती - अशोक दादा पाटील गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर चवंडकं - अशोक भिमराव रास्ते अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर बाल मजूर... - अदिती जहागिरदार कविता - वैष्णवी पारसे पाऊस - किरण झेंडे कविता - सुरेश पुरोहित ओळख - प्रशांत वंजारे शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर कविता - स्नेहदर्शन कविता - स्नेहदर्शन कविता - संतोष बोंगाळे कविता - संतोष बोंगाळे