Get it on Google Play
Download on the App Store

मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक)

आज मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे. काही दिवसांपूर्वी मला ‘‘पुन्हा नव्याने सुरूवात’’ ही कादंबरी वाचावयास मिळाली. या अगोदर ‘अग्नीपुत्र’ पुस्तकासाठी जवळपास 5 लाख वाचकांचा प्रतिसाद मिळालेले जगप्रसिद्ध कादंबरीकार श्री. अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांची ही कादंबरी आहे. मी वाचायला सुरूवात केली अतिशय रंजक आणि चित्त थरारक अशी कादंबरी वाचत असताना, मी त्या कादंबरीचाच एक घटक आहे की काय असे मला वाटू लागले. एक - एक पान मी वाचत होतो त्यामध्येच मी रमून गेलो. कादंबरी मी एका बैठकीतच वाचून काढली परंतु कादंबरीचे लेखक अभिषेक ठमके यांची शब्दरचना, शब्दशैली मनाला भाऊन गेली अनेक नवनवीन विचारचक्र माझ्या डोक्यात सुरू झाले आणि खूप काही प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद मिळला.

कादंबरीचे लेखक अभिषेक ठमके यांनी महासागरामध्ये कार्यरत असलेले अनेक सैनिकांचा प्रत्यक्ष अनुभवच प्रत्येकाचा वाचावयास मिळेल. आपण सामान्य व्यक्ती अगदी निवांत, शांत, आणि स्थिर प्रकारचे आयुष्य जगत असतो. परंतु आपली काळजी घेणारे आणि दिवस-रात्र कार्यरत असणारे सैनिक त्यांची काय अवस्था असते याचा आगळा वेगळा अनुभव लेखकाने ‘पुन्हा नव्याने सुरूवात’ या कादंबरीमध्ये सादर केला आहे. मानवाच्या प्रत्येक जडण घडणीमध्ये अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य असते. परंतु हे मान्य करून जो व्यक्ती सततइतरांच्यासाठी कार्यरत असतो तोच ख-या अर्थाने जीवनामध्ये यशस्वी होत असतो. कोणत्याही कठिण प्रसंगी स्वतःवर आत्मविश्वास असणे खूप आवश्यक असते.

ही कादंबरी वाचत असताना मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्या शब्दांमध्ये व्यक्त करणे खरोखरच खूप कठिण आहे. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीमध्ये हरलो, तरी ती भावना जितकी दुर्देवी आणि दुःखदायक असते. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणे, ही भावना जास्त भयंकर असते. सतत प्रयत्न करत राहीले तर यश नक्कीच मिळेल हे देखील सत्य आहे.

‘पुन्हा नव्याने सुरूवात’ ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे लेखकाची लेखन शैली जिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, आणि दोन म्हणजे आपण स्वतः घरामध्ये बसून महासागरामध्ये वावरण्याचा अनुभव त्याच बरोबर तेथील हालचाली आणि त्यांच्यावर योजीले जाणारे उपाय त्यांचे नियोजन करता येईल हे समजू शकते. ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ या कादंबरीचे लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके तसेच कवितासागर प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत अतिथी संपादकिय अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६ अणुक्रमणिका BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील) अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई 'श्रेय'स - अभिषेक ठमके संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील) नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे आहुती - अशोक दादा पाटील गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर चवंडकं - अशोक भिमराव रास्ते अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर बाल मजूर... - अदिती जहागिरदार कविता - वैष्णवी पारसे पाऊस - किरण झेंडे कविता - सुरेश पुरोहित ओळख - प्रशांत वंजारे शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर कविता - स्नेहदर्शन कविता - स्नेहदर्शन कविता - संतोष बोंगाळे कविता - संतोष बोंगाळे