Get it on Google Play
Download on the App Store

नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे

या देवी सर्व भुतेशु शक्ती रूपेण संस्थिता | नमः स्तस्ये, नमः स्तस्ये, नमः स्तस्ये  नमो नमः ||

नवरात्र ह्या व्रताची कथा हि प्रभू रामचंद्रांशी संबंधित आहे. म्हणजे त्याला रामायण कालीन इतिहास आहे. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदांनी हे व्रत प्रभूंना सांगितले. रामचंद्रांनीही ते विधिवत केले आणि अष्टमीच्या मध्यरात्री देवीने रामाला दर्शन देऊन," तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा वर दिला". नवरात्र पंचमीला उपांग ललितेची पूजा करतात. म्हणूनच ह्या पंचमीला ललित पंचमी म्हणतात.

प्रचंड दैवी शक्तीची प्रेरणा प्रदान करणारा मंत्र जो केवळ प्रभावी मंत्र नाही तर प्रत्यक्ष महाशक्ती नवदुर्गेची प्रशंसा आहे. नवदुर्गा म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली हिची प्रत्येकी तीन तीन रूप आहेत. ब्रह्म देवाच्या वारामुळे उन्मत्त झालेला जो साधू संतना आणि सज्जनांना त्रास देणाऱ्या मधुकैटभ, महिषासुर, शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा भगवती देवीने निरनिराळे अवतार गेहून वध केले. यांचे स्मरण मानवाला राहावे म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत घटस्थापना केली जाते. घट म्हणजे देवींची स्थापना होय.

आदिमायेच्या दुसरा पहिला अवतार म्हणजेच महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती. या तीनही देवींनी तीन तीनवेळा अवतार घेतला म्हणून ती नवदुर्गा आहे.

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्माण्ड, महागौरी, सिध्दिदात्री या सर्व देवींना देव शरण गेले आणि आपले कार्य करवून घेतले असेच आपण हि तिला शरण जाऊया. आदिशक्तीचे मोहक आणि तितकंच रौद्र रूप म्हणजे दुर्गा. विधी कन्यकेचे रूप पण एकेका नावाबरोबरच तिची छवी बदलत जाते. ती दुर्गा असते तेव्हा अंतिम विजयाचा साक्षात्कार होतो. भद्रकाली म्हणताच अभद्र काळ जाऊन सुमंगळाची चाहूल लागते. आंबे कोण करविला आशा म्हणताच मातृत्व जागे होते. आई भवानी म्हंटल्यावर अस्तित्वाची जाणीव होते. ललिता म्हंटल्यावर चैतन्याचे चांदणे लेऊन येते. लक्ष्मी म्हंटल्यावर नाण्यांचा नाजूक असा खळखळाट ऐकू येतो. सरस्वती म्हणताच मातीचे जडत्व नाहीसे होते. नारायणी म्हंटले कि नारळ पुरुषत्व देणारी मनोहारी स्त्रीचे रूप नजरे समोर दिसते आणि उमा म्हणताच सृष्टीच्या आदिमायेचे सर्वात सुंदर प्रतीक साकारते.

सृष्टीच्या सुंदर्याचे हे देखणे स्वरूप भाद्रपदासारख्या समृद्ध महिन्यात गणरायाच्या मागोमाग गौर बनून अवतरते. रणांगणात चंडी, विद्यादानात सरस्वती आणि वात्सल्यात महालक्ष्मीच रूप धारण करणाऱ्या या स्त्रीरुपी चैतन्याला जेव्हा माहेरपण हवंहवंसं वाटत, तेव्हा ती गौर बनून आपल्या घरात आराम करते.

जगण्याचीच एकेक माळ बहरावी म्हणून नवरात्रीचा उत्सव आपल्या आयुष्यात येते असावा. या नऊ दिवसातला आनंद आपला, जलोष आपला, मोहरी आणि झेंडूच्या फुलाचा सुगंध आपला आणि या सृजनतेच्या वाटेवरचा प्रवासही आपलाच. आपल्याला सीमोल्लंघनापर्यंत पोहोचवणारा आणि आपल्याच सीमा ओलांडून नव्या क्षितिजापर्यंत पोचवणारा हा अतुल्य अनुभव.  

"शक्तीपीठ"

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तिपीठे आहेत. महालक्ष्मी, रेणुका माता आणि भवानी माता, सप्तशृंगी किंवा अंबेजोगाई हि अर्धीपीठे आहेत. पीठ म्हणजे शक्तीची अथवा स्त्रीची पूर्वा-अवस्था. पिठाचा दुसरा अर्थ शक्तिकेंद्र असा होतो. ज्या केंद्रातून शक्ती प्रकट होते तेच मूळ पीठ असते.

कोल्हापूरला महालक्ष्मी, तुळजापूरला भवानी माता व माहूरला रेणुका माता अशी हि पूर्ण तिने पीठे आहेत. लक्षणी - विष्णू, भवानी - शंकर, रेणुका - जमदग्नी असे विवाह झाल्याने या देवींना पूर्णावस्था प्राप्त झाली. परंतु योगेश्वरी देवी कुवारी किंवा अविवाहित राहिल्याने ते अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.

महालक्ष्मी - ब्रह्म देवाचा मानस पुत्र कोल्हासूर आणि त्याचा पुत्र करवीर यांनी उन्मत्त होऊन साधू-संतना छळण्यास सुरवात केली, त्यावेळी संतांनी शंकराची आराधना केली. नंतर शंकराने करवीरच्या वध केला पण आपल्या पुत्राच्या मृत्यूला महालक्ष्मीचं कारणीभूत आहे असा त्याचा समाज झाला. अश्यातच त्याने महालक्ष्मीला युद्धास प्रचारण केले. लक्ष्मीच्या हातून त्याचा वध झाला आणि जेथे हे युद्ध घडले त्या भूमीला करवीर किंवा कोलापूर असे नाव पडले. कोल्हासुराने बंदी बनवून ठेवलेल्या स्त्रियांना महालक्ष्मीने मुक्त केले या त्यांच्यावर कृपा केली. ह्याच स्त्रिया पुढे चौसष्ठ योगिनी झाल्या व लोकांच्या इच्छा पूर्ण करू लागल्या.

निसर्गशक्तीच्या आधारेच आपण उत्तम जीवन जगतो म्हणून कृतज्ञतेने त्यांचे पूजन केले जाते. धान्य पेरून त्याची रोपे आल्यावर त्यांची सृजनाची शक्ती कार्यान्वित होते. त्याचेच पूजन केले जाते. सृजनाची शक्ती हि सर्व-ष्रेष्ठ शक्ती असते.

नवरात्री उत्सव हा शरद ऋतूत येत असल्याने तिला शारदीय नवरात्र म्हणतात.

नवरात्रीचे प्रकार म्हणजे -

प्रतिपदा ते नवमी - नवरात्री

प्रतिपदा ते सप्तमी - सप्तरात्री व्रत

पंचमी ते नवमी - पंचरात्री व्रत

सप्तमी ते नवमी - त्रिरात्री व्रत

देवीच्या दशमहाविद्या म्हणजे - महाकाली, तारा, धिंनमस्ता, षोडशी माहेश्वरी, भुवनेश्वरी देवी, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमलालया.

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो

अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६

अभिषेक ठमके
Chapters
संपादकांचे मनोगत अतिथी संपादकिय अर्थ मराठी ई दिवाळी अंक २०१६ अणुक्रमणिका BookStruck ई-पुरस्कार २०१६ स्पर्धेचा निकाल आम्ही सोशल सोशल! - निमिष सोनार सेक्स एज्युकेशन - मंगेश सकपाळ शक संवत - डॉ. सुनील दादा पाटील मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी: पुन्हा नव्याने सुरूवात - मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक) भारतीय रुपया - अनिल धुदाट (पाटील) अमेरिकेतील शिक्षण पद्धत - गौरी ठमके तत्त्वप्रकाश - प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य शिक्षणाचा जिझिया कर! - अक्षर प्रभू देसाई 'श्रेय'स - अभिषेक ठमके संभ्रम-ध्वनी - चैतन्य रासकर एक अनुभव - एक धडा : राज धुदाट (पाटील) नवरात्रोत्सव - नीलिमा भडसावळे ऐनापुरे आहुती - अशोक दादा पाटील गावाचे शिवार सरकार दरबारी...! - मयुर बागुल, अमळनेर चवंडकं - अशोक भिमराव रास्ते अशा दुर्दैवी जीवांना दया-मरण द्या - डॉ. भगवान नागापूरकर माहुली गड - श्रीकांत शंकर डांगे स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -वर्षा परब वाचा थोडं ऍडजस्ट करूनच - सागर बिसेन पूर्णेच्या परिसरांत ! - डॉ. भगवान नागापूरकर बाल मजूर... - अदिती जहागिरदार कविता - वैष्णवी पारसे पाऊस - किरण झेंडे कविता - सुरेश पुरोहित ओळख - प्रशांत वंजारे शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर कविता - स्नेहदर्शन कविता - स्नेहदर्शन कविता - संतोष बोंगाळे कविता - संतोष बोंगाळे