शुंभ आणि निशुंभ
शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन फारच भयानक दैत्य होते ज्यांनी कठोर तप करून ब्रम्हदेवाकडून वरदान मिळवले होते. दोन्ही भाऊ असे मानत असत की आपला अंत कोणी स्त्री कशी करू शकेल? तिचे इतके सामर्थ्य असूच शकत नाही. म्हणून त्यांनी वरदान मागितले की कोणीही पुरुष, देवता, राक्षस, दानव, असुर त्यांचा वध करू शकणार नाहीत. बस, आणखी काय हवे! या दोन भावांच्या अतंकाने तिन्ही लोकांत हाहाःकार माजला. या दोघांच्या दहशतीचा खात्मा करण्यासाठीच अखेर दुर्गामातेचा अवतार झाला होता. शुंभ - निशुंभ प्रमाणेच धूम्रलोचन, चंड आणि मुंड देखील वरदान प्राप्त भयंकर असुर होते ज्यांचा वध करून माता भगवती "चामुंडा" नावाने प्रसिद्ध झाली.