Get it on Google Play
Download on the App Store

तारकासुर

तारकासुर असुरांमध्ये सर्वांत शक्तिशाली असुर होता. त्याच्या अत्याचारांमुळे सर्व देवी देवता त्रस्त होते. सर्व ब्रम्हदेवाला शरण गेले. ब्रम्हदेवाने सांगितले की तुम्ही शंकराला प्रार्थना करा, कारण शंकर - पार्वतीचा पुत्रच तारकासुराचा वध करू शकेल. परंतु त्या वेळी भगवान शंकर गहन समाधीत जोते. त्यांची समाधी तोडण्याची हिम्मत कोणीही करू शकत नव्हते. परंतु त्यांची समाधी तोडणे देखील आवश्यक होते, कारण त्यांची समाधी मोडली तरच शंकर-पार्वतीचे मिलन होऊ शकले असते आणि मग त्यांना जो पुत्र होणार होता, तो देवतांचा सेनापती बनणार होता.

तेव्हा देवतांनी युक्ती करून कामदेवाला समाधी भंग करण्यासाठी तयार केले. देवतांच्या सांगण्यावरून कामदेवाने शंकराची समाधी  भंग केली, परंतु त्याला भगवान शंकराच्या क्रोधाचा सामना करावा लागला आणि आपले शरीर गमवावे लागले. त्यांचा क्रोध शांत झाल्यावर सर्व देवता शंकराकडे गेले. त्यांनी शंकराला प्रार्थना केली की तारकासुर आम्हाला फार त्रास देतो आहे. तुमचा पुत्रच केवळ या समस्येतून आम्हाला सोडवू शकतो असे ब्रम्हदेवाचे वरदान आहे.
देवतांच्या प्रार्थनेचा शंकरावर परिणाम झाला. देवतांच्या प्रार्थनेवरूनच  शंकराने पर्वतीशी विवाह केला. शंकर पार्वतीला पुत्र झाला - कार्तिकेय. कार्तिकेय देवतांचा सेनापती बनला. त्याने तारकासुराचा वध करून देवतांना असुरांच्या भीतीतून मुक्त केले.