Get it on Google Play
Download on the App Store

गयासुर

पौराणिक मान्यता आणि वदन्तांनुसार भस्मासुराच्या वंशजांमधील गयासुर नावाच्या राक्षसाने कठीण तपश्चर्या करून ब्रम्हदेवाकडून वरदान मागितले होते की त्याचे शरीर देवतांच्या प्रमाणे पवित्र व्हावे आणि लोक त्याच्या केवळ दर्शनाने पापमुक्त व्हावेत.
हे वरदान मिळाल्यानंतर स्वर्गाची लोकसंख्या वाढू लागली आणि सर्व काही निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध घडू लागले. लोक न घाबरता पाप करू लागले आणि गायासुराच्या दर्शनाने पापमुक्त होऊ लागले.
यापासून वाचण्यासाठी देवतांनी यज्ञ करण्यासाठी गायासुराकडून पवित्र स्थानाची मागणी केली.
गायासुराने आपले शरीर देवतांना यज्ञासाठी दिले. जेव्हा गयासुर अडवा झाला तेव्हा त्याचे शरीर ५ कोस एवढे पसरले. हीच ५ कोस जागा पुढे जाऊन आजचे गया बनली, परंतु गायासुराच्या मनातून लोकांना पापमुक्त करण्याची इच्छा गेली नाही आणि त्याने देवतांकडून वरदान मागितले की हे स्थान लोकांना तारणारे बनून राहावे.
श्राद्धाच्या माध्यमातून हे स्थान आपल्याला आपल्या पितरांशी जोडते. हेच कारण आहे की आजही लोक आपल्या पितरांना पिंड देण्यासाठी गयाला येतात.