Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

ब्रम्हदेव हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे. तो हिंदूंच्या तीन प्रम्हुख देवतांपैकी ( ब्रम्हा, विष्णू, महेश ) एक आहे. ब्रम्हदेवाला श्रुष्टीचा निर्माता देखील म्हटले जाते. सृष्टीचा निर्माता म्हणजे फक्त जीवसृष्टीचा निर्माता. तिन्ही देवतांमध्ये ब्रम्हदेवाचे चित्रण प्रथम आणि सर्वात वृद्ध देवतेच्या रुपात केले गेले आहे.
नेहमीच देवता आणि दैत्य यांच्यातील चढाओढीने ते ब्रम्हदेवाची तपश्चर्या करून त्याच्याकडून अजरामर होण्याचे वरदान प्राप्त करत असतात. याव्यतिरिक्त सामान्य मनुष्यांनी देखील ब्रम्हदेवाची तपश्चर्या करून अनेक वरदाने प्राप्त केली आहेत. आपण इथे पाहणार आहोत ब्रम्हदेवाचे ते ११ वर ज्यांच्यामुळे देवताच नव्हे तर स्वतः ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना देखील अडचणींना तोंड द्यावे लागले होते.