रॉयल मेल शीप टायटॅनिक
आर.एम.एस टायटॅनिक हा सगळ्यात प्रसिद्ध जहाजभंग आहे. जेव्हा टायटॅनिक बुडत होती तेव्हा ते सर्वात मोठं जहाज होतं आणि त्यामुळे तिने लोकांचं अधिक लक्ष वेधलं. ती कोरी करकरीत जलपर्यटनासाठी निघाली होती जेव्हा ती एका बर्फाच्या डोंगरावर आदळली आणि १९१२मध्ये बुडाली.
हे ठिकाण न्यूफाउंडलँड समुद्रकिनाऱ्याच्या आग्नेय दिशेकडून ३७० मैलांवर आहे. हा नाश १९८५मध्ये शोधला गेला होता, तो अजूनही दिसतो पण तो अधिक निकृष्ट होतोय. १५१७ प्रवाश्यांचे उरलेले अवशेष म्हणजे त्यांचे बूट, कारण समुद्री प्राण्यांनी त्यांची शरीरं आणि हाडांचे सापळेदेखील खाऊन टाकले.
हे जहाज पुन्हा उभारण्यासाठी बऱ्याच योजना आखल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातली एकही फळाला आली नाही. धातू खाणारे जंतू अशाच रीतीने तिचे धातू खात राहिले तर एक दिवस हे जहाजही नष्ट होईल. तिचं पाणीदार थडगं सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.