साधु बेला मंदिर, सुक्कुर
सिंध प्रांतातील सुक्कुर मध्ये बाबा बनखंडी महाराज १८२३ मध्ये आले होते. त्यांनी मेनाक परभातला एका मंदिरासाठी निवडले. आठवे गादिवान बाबा बनखंडी यांच्या मृत्यू नंतर संत हरनाम दास यांनी या मंदिराची निर्मिती १८८९ मध्ये केली. इथे महिला आणि पुरुषांसाठी पूजा करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. इथे तयार होणारा भंडारा संपूर्ण पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.