गौरी मंदिर, थारपारकर
पाकिस्तानातील तिसरे विशाल हिंदू मंदिर आहे गौरी मंदिर. हे मंदिर सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात वसलेले आहे. पाकिस्तानात या जिल्ह्यात हिंदू बहुसंख्य आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतांश लोक आदिवासी आहेत. पाकिस्तानात त्यांना थारी हिंदू म्हटले जाते.
गौरी मंदिर मुख्यत्वे करून जैन मंदिर आहे, परंतु तिथे अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिराची स्थापत्य शैली देखील राजस्थान आणि गुजरात यांच्या सीमेवर असलेल्या माउंट अबू मधील मंदिराप्रमाणेच आहे. या मंदिराची निर्मिती मध्ययुगात झाली.
पाकिस्तानातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि कट्टरपंथी लोकांच्या वाढत्या दबावामुळे हे मंदिर अतिशय जीर्ण-शीर्ण अवस्थेत आलेले आहे.