कटास राज मंदिर, चकवाल
पाकिस्तानात सर्वांत मोठे मंदिर शंकराचे कटासराज मंदिर आहे जे लाहोर पासून २७० किमी अंतरावर चकवाल जिल्ह्यात वसलेले आहे. या मंदिराच्या जवळ एक सरोवर आहे. असे म्हटले जाते की माता पार्वतीच्या वियोगाने जेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यांत अश्रू आले तेव्हा त्यांच्या अश्रुंचे दोन थेंब पृथ्वीवर पडले आणि त्याच दोन थेंबांचे मोठे कुंड तयार झाले. या कुंडाच्या बाबतीत मान्यता आहे की यामध्ये स्नान केल्यास मानसिक शांती मिळते आणि दुःख दारिद्र्य यांच्यापासून मुक्ती मिळते. याबरोबरच इथे एक गुहा देखील आहे. तिच्या बाबतीत म्हटले जाते की या सरोवराच्या किनारी पांडव आपल्या वनवासाच्या दरम्यान आले होते.