चंद्र
समुद्र मंथनातून दहाव्या क्रमांकाला निघाला चंद्र. चंद्राला भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले. चंद्र प्रतिक आहे शीतलतेचे. जेव्हा तुमचे मन वाईट विचार, लालसा, वासना, नशा इत्यादींपासून मुक्त होईल तेव्हा ते चंद्राप्रमाणेच शीतल होईल. परमात्म्याला मिळवण्यासाठी असेच मन हवे. असे मन असलेल्या भक्तालाच अमृत (परमात्मा) प्राप्त होते.